शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
3
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
4
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
5
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
6
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
7
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट
8
अरे बापरे! डोक सटकलं आणि गेम झोनच्या कर्मचाऱ्याचे नाक युवकाने हातोड्याने फोडले
9
११ कोटींची लॉटरी जिंकणारा 'तो' व्यक्ती अखेर सापडला! रस्त्यावर विकत होता कांदे-बटाटे अन्...
10
Smartphones: २४ जीबी रॅम, ७५०० mAh बॅटरी आणि सुपरफास्ट चार्जिंग; जबरदस्त फोन लॉन्च!
11
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
12
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
13
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
14
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
15
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
16
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
17
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
18
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
19
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
20
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  

VIDEO : नाशिकचा ऐतिहासिक मुघलकालीन शहाजहांनी ईदगाह

By admin | Updated: June 21, 2017 18:07 IST

अझहर शेख / आॅनलाइन लोकमत  नाशिक, दि. 21 -  ‘ईद’ हा अरबी भाषेतील शब्द त्याचा अर्थ आनंद (खुशी) असा ...

अझहर शेख / आॅनलाइन लोकमत 
नाशिक, दि. 21 -  ‘ईद’ हा अरबी भाषेतील शब्द त्याचा अर्थ आनंद (खुशी) असा होतो. मुस्लीम बांधव इस्लामी कालगनणेतील नववा महिना ‘रमजानुल मुबारक’मध्ये निर्जळी उपवास करतात. या महिन्याची सांगता रमजान ईद सणाने केली जाते. या सणालाच अरबीमध्ये ‘ईद-ऊल-फित्र’ असे म्हटले जाते. या सणाचे मुख्य वैशिष्ट म्हणजे ईदचे सामुहिक नमाजपठण. या नमाजपठणाची मुख्य पारंपरिक जागा म्हणजे गावाच्या वेशीवरील ‘ईदगाह मैदान’. पैगंबरांच्या शिकवणीनुसार गावाच्या बाहेर वेशीलगत खुल्या आकाशाखाली मोकळ्या पटांगणात रमजान ईद, व बकरी ईदचे नमाजपठण करण्याची प्रथा आजही सर्वत्र पाळली जाते. नाशिकमध्ये त्र्यंबकरस्त्यावर हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानाला लागून ईदगाह मैदान उपलब्ध आहे. या मैदानात ऐतिहासिक शहाजहांनी ईदगाहची मुघलकालीन वास्तू लक्ष वेधून घेते. या वास्तूचे वैशिष्ट म्हणजे सुमारे सातशे ते आठशे वर्षे जूनी दगडी बांधकाम असलेली व मुघलकालीन स्थापत्यक लेचा नमुना आहे. जास्त लांबी-रुंदीच्या भिंतीच्या स्वरुपात असलेल्या या वास्तूचे गोलाकार दोन्ही बाजूला असलेले बुरूच व मध्यभागी असलेले दोन मनोरे आकर्षक ठरतात. यामुळे वास्तूचे सौंदर्य अधिकच खुलते.
 
 
  मुहम्मद तुघलकाच्या आगोदर इगतपुरी येथे आलेले हजरत सय्यद सद्रोद्दीन हे सुफी संत आणि हजरत सय्यद सादिकशाह हुसेनी यांनी ईदगाहची निर्मिती केली असल्याचे जुणे जाणकार व मुस्लीम समाजाचे धार्मिक नेते हाजी सय्यद मीर मुख्तार अशरफी सांगतात. ईदगाहच्या वास्तूची मुहूर्तमेढ रोवल्यानंतर काही महिन्यांनी नाशिकमध्ये तत्कालीन गुलशनाबादेत मुघल राजा शहाजहांन आपल्या सैन्यासह दाखल झाला. त्यावेळी सुफी संत हुसेनी बाबा आणि शहाजहांन यांची भेट झाली. दरम्यान, त्याचे सैन्य ईदगाह मैदानावर विश्रांतीसाठी थांबलेले होते, असे सांगितले जाते. त्या काळात त्याने इदगाहच्या वास्तूचे नुतनीकरण करत मुघल स्थापत्यकलेनुसार त्याचे बांधकाम केल्याने हा ईदगाह पुढे ‘शहाजहांनी’ नावाने ओळखला जाऊ लागला.या ईदगाह मैदानावर वर्षभरातून दोन वेळा नाशिकमधील मुस्लीम समुदाय नमाजपठणासाठी एकत्र येतो. रमजान ईद व बकरी ईदच्या निमित्ताने या ठिकाणी पार पडणाऱ्या सामुहिक नमाजपठणाचा सोहळा डोळ्यांची पारणे फेडणारा ठरतो. यावेळी शहर-ए-खतीब पदवी असलेले हाजी हिसामुद्दीन अशरफी यांच्या नेतृत्वाखाली मागील अनेक वर्षांपासून मुस्लीम समुदाय या ठिकाणी नमाजपठण करीत आहेत. त्या आगोदर त्यांचे वडील खतीब मुनिरोद्दीन यांच्याकडे ही जबाबदारी होती. त्यांचे उत्तराधिकारी म्हणून हिसामुद्दीन यांनी त्यांच्या निधनानंतर जबाबदारी सांभाळली आहे.
 
सुमारे पाच हजाराहून अधिक नागरिक या मैदानात यावेळी जमलेले असतात. काळानुरूप मैदानाची क्षमता वाढती लोकसंख्या व शहरीकरणामुळे कमी पडू लागली आहे. या सोहळ्यासाठी दरवर्षी दोन वेळा महानगरपालिकेच्या वतीने मैदानाचे सपाटीकरण केले जाते तसचे शुचिर्भूत होण्यासाठी नागरिकांकरिता दोन्ही प्रवेशद्वारांवर तात्पुरत्या स्वरुपात पाण्याचे नळही बसविले जातात. हा अगळावेगळा सोहळा नागरिकांसाठी एक वेगळीच अनुभूती देणारा ठरतो. सोहळ्यानंतर शहरातील मान्यवर गुलबपुष्प देत अलिंगन देऊन शुभेच्छा देतात. यावेळी राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन ईदगाहवर सहज घडते. येत्या सोमवारी (दि.२६) साजरी होणाऱ्या रमजान ईदनिमित्त शहाजहांनी ईदगाह सज्ज झाला असून ईदगाह समितीकडून आकर्षक रंगरंगोटी वास्तूला करण्यात आल्याने सौंदर्य अधिकच वाढले आहे.                       
https://www.dailymotion.com/video/x84563e