ऑनलाइन लोकमतवाशीम, दि. 26 - चंद्रमोळी झोपडीत वास्तव्य करीत आपल्या वडिलांच्या पारंपारिक व्यवसायाला हातभार लावून शिक्षण घेणाऱ्या व एम. फिलमध्ये गोल्ड मेडल मिळून मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान झालेला विजय आजही हॉटेल चालवून आपल्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाह व शिक्षण पूर्ण करीत आहे.वाशीम येथील दत्तनगर भागात राहणाऱ्या विजय शंकर वानखेडे नामक युवकाने अकोला नाकास्थित रस्त्यावर चहाची टपरी सुरू करून त्यामधून मिळणाऱ्या कमाईतून शिक्षण व आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहे. विजयने गोंडवाना विद्यापीठातील गडचिरोली येथून केलेल्या एम.फिल सोशलवर्क मध्ये घेण्यात गोल्डमेडल प्राप्त केले.तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्याहस्ते त्याला सन्मानित करण्यात आले होते. त्यानंतरही उच्चशिक्षित असतांना सुध्दा हॉटेलवर काम करण्याबाबत मनात किंतु-परंतु नसून या व्यवसायामुळेच माझे शिक्षण झाले. त्यामध्ये लज्जा वाटण्याचे काय कारण, असे अभिमानाने विजय सांगतो.
VIDEO- मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान झालेला गोल्ड मेडलिस्ट चालवितो हॉटेल!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2016 17:58 IST