शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO: एकनाथ शिंदेंच्या हॉटेल रुममधला 'तो' संवाद व्हायरल, 'त्या' आमदाराला काढणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2022 08:43 IST

शिवसेना नेते एकनाथ शिंदे हे बंडखोर आमदारांसह आसाममधील गुवाहाटीस्थित रेडिसन ब्लू हॉटेलमध्ये थांबले आहेत. याठिकाणाहूनच शिंदे आपल्या भूमिका ट्विटरच्या माध्यमातून जाहीर करत आहेत.

मुंबई-

शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल दुपारी साडेपाच वाजता राज्यातील जनतेला संबोधित केल्यानंतर रात्री आठ वाजताच्या सुमारास 'वर्षा' निवासस्थान सोडलं आणि 'मातोश्री'वर रवाना झाले. उद्धव ठाकरेंच्या भावनिक आवाहनानंतरही आज शिवसेनेचे आणखी सहा आमदार नॉट रिचेबल असल्याची माहिती समोर आली आहे. तर त्यातील तीन आमदार नुकतेच मोठ्या बंदोबस्तात गुवाहाटीच्या रेडिसन ब्लू हॉटेलमध्ये शिंदे गटात सामील झाले आहेत. 

'ज्यांना जायचंय त्यांनी जा...'; उद्धव ठाकरेंच्या या वक्तव्यानंतर आणखी ६ आमदार नॉट रिचेबल

शिवसेना नेते एकनाथ शिंदे हे बंडखोर आमदारांसह आसाममधील गुवाहाटीस्थित रेडिसन ब्लू हॉटेलमध्ये थांबले आहेत. याठिकाणाहूनच शिंदे आपल्या भूमिका ट्विटरच्या माध्यमातून जाहीर करत आहेत. त्यांच्या सोबतीला शिवसेनेचे इतरही आमदार आहेत. काल विधिमंडळातील प्रतोद म्हणून आमदार सुनील प्रभू यांनी जारी केलेल्या पत्राला फेटाळत याच हॉटेलमधून एकनाथ शिंदे यांनी सुनील प्रभू आता शिवसेनेचे प्रतोद राहिलेले नसल्याचं जाहीर केलं होतं. बंडखोर आमदारांच्या सहीसह एक पत्रक जारी करत नवा प्रतोद म्हणून रायगडमधील महाडचे आमदार भरत गोगावले यांची प्रतोदपदी नियुक्ती करण्यात आली. 

फडणवीसही नॉट रिचेबल... पण मीडियासाठी, सागर बंगल्यावर ठरवताहेत रणनीती

भरत गोगावलेंचा प्रतोद पदासाठीचा फॉर्म भरतानाचा व्हिडिओ आता समोर आला आहे. एकनाथ शिंदे यांच्या टिमनं हा व्हिडिओ शूट केल्याचं सांगितलं जात आहे. या व्हिडिओमध्ये आवाजही ऐकू येत आहे. यात ठाण्यातील आमदार प्रताप सरनाईक शिवसेनेचे प्रतोद म्हणून नियुक्त करण्यात आलेले भरत गोगावले यांच्याशी संवाद साधत आहेत. या संवादाचे आता अनेक अर्थही काढले जात आहेत. 

व्हिडिओतील संवाद नेमका काय?

प्रताप सरनाईक- प्रतोदाचं काम काय हे माहित्येत ना? जबाबदारी वाढलीय आता तुमची. फार मोठी जबाबदारी तुमच्यावर आहे. शिवसेना पक्षाची जबाबदारी तुमच्यावर आहे. सर्व आमदारांना व्यवस्थित टिकवून ठेवा. त्यांना बोलायला द्या. मागच्या प्रतोदासारखं (सुनील प्रभू) करू नका...

प्रताप सरनाईक- ते मुंबईतील लोकांना जास्त बोलायला द्यायचे. 

(इतक्यात रायगडमधील कर्जतचे आमदार महेंद्र थोरात तिथं येतात)

प्रताप सरनाईक- या...हे आता प्रतोद आहेत. कुणाला पक्षात ठेवायचं. कुणाला काढायचं...

महेंद्र थोरवे- तुम्ही ठरवा...

प्रताप सरनाईक- नाही, यांना (भरत गोगावले) अधिकार दिलेले आहेत. सुनील प्रभूपासून सुरुवात करणार आहेत. 

वरील संवाद सुरु असताना एकनाथ शिंदे, संजय शिरसाट, बच्चू कडू देखील तिथं उपस्थित असल्याचं दिसून येत आहे. 

शिवसेनेचे आणखी ६ आमदार नॉट रिचेबलशिवसेनेचे ज्येष्ठ आमदार दीपक केसरकर, मंत्री दादा भुसे, आमदार संजय राठोड, दादरमधील आमदार सदा सरवणकर, कुर्ला विभागातील आमदार मंगेश कुडाळकर आणि चांदिवली विभागाचे आमदार दिलीप लांडे हे नॉट रिचेबल असून सूरतमार्गे गुवाहटीला रवाना झाल्याचे सांगण्यात येत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी नागरिकांशी संवाद साधताना केलेल्या भाषणात बंडखोर आमदार आणि त्यांच्या निमित्ताने उपस्थित झालेल्या प्रश्नांना उत्तरे दिली. शिवाय, एकनाथ शिंदे यांना समोरासमोर चर्चेला येण्याचे आवाहनही केले. मुख्यमंत्र्यांच्या या भाषणानंतर लागोपाठ दोन ट्विट करत एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले. गेल्या अडीच वर्षांत महाविकास आघाडी सरकारचा फायदा फक्त घटक पक्षांना झाला आणि शिवसैनिक भरडला गेला, असं एकनाथ शिंदे म्हणाले. पक्ष आणि शिवसैनिक टिकविण्यासाठी अनैसर्गिक आघाडीतून बाहेर पडणे अत्यावश्यक असल्याचे एकनाथ शिंदे यांनी सुनावले आहे.

गटनेता आणि प्रतोद नियुक्ती३१ ऑक्टोबर २०१९ रोजी एकनाथ शिंदे यांची गटनेतेपदी निवड करण्यात आली होती. एकनाथ शिंदे हेच पक्षाचे गटनेते असतील, असा ठराव संमत करण्यात आला. त्यासोबतच, पक्षाचे विधिमंडळ प्रतोद म्हणून आमदार भरत गोगावले यांची एकमताने नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे सुनील प्रभू यांना तत्काळ प्रभावाने प्रतोद पदावरून हटविण्यात येत असल्याचेही या प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेShiv Senaशिवसेनाpratap sarnaikप्रताप सरनाईक