शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
16
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
17
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
18
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
19
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
20
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय

VIDEO : वसतीगृहातील ऋणी आणि पूजा अडकल्या रेशीम गाठीत

By admin | Updated: May 31, 2017 18:56 IST

ऑनलाइन लोकमत   कोल्हापूर, दि. ३१ - अधूनमधून कोसळणा-या हलक्या पावसाच्या सरी, सनई चौघडाचे सूर, व-हाडी मंडळींची लगबग, सोबतीला ...

ऑनलाइन लोकमत
 
कोल्हापूर, दि. ३१ - अधूनमधून कोसळणा-या हलक्या पावसाच्या सरी, सनई चौघडाचे सूर, व-हाडी मंडळींची लगबग, सोबतीला वाद्यवृंद व सजलेले वधू-वर,संस्थेतील मुली व उपस्थित पाहुण्यांचा ओसांडून वाहणारा उत्साह अशा मंगलमयी वातावरणात बुधवारी तेजस्विनी महिला वसतीगृहातील ‘ऋणी’ आणि ‘पूजा ’ या दोन कन्यांचा विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला.
कसबा बावडा येथील त्र्यंबोली मंगल कार्यालयात दुपारी १२ वाजून ३७ मिनिटांच्या मुहूर्तावर झालेल्या विवाह सोहळ्यात संस्थेची कन्या पूजा हिचे पालकत्व स्विकारलेल्या विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील व त्यांच्या पत्नी रुपाली यांनी; तर दुसरी कन्या ऋणी हिचे कन्यादान जिल्हा पोलिस अधीक्षक संजय मोहीते यांनी केले. उपस्थितांचे स्वागत जिल्हा महिला व बालविकास अधिकारी एस. डी. मोहिते व अधिक्षीका ज्योती पाटील यांनी केले. 
वयाच्या पाचव्या वर्षी मातृछत्र हरपलेली व रेल्वे स्थानकात वडिलांची चुकामुक झालेली पूजा शर्माला पोलिसांच्यामार्फत नाशिक येथील बालगृहात दाखल केले. त्यानंतर सांगली येथील वेलणकर  बालकाश्रमात दाखल केले. या संस्थेत तिने राहून १२ वी पर्यंतचे शिक्षण घेतले. बारावीनंतर तिने प्रयोगशाळा तपासणीस (एमएलटी) चे प्रशिक्षणही पूर्ण केले. याशिवाय तिने ब्युटीपार्लर, रेडिओ जॉकी, कराटे, घरगुती उपकरण दुरुस्ती, रेक्झीन बॅग शिलाई आदीचे प्रशिक्षण घेतले. वयाची १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर ती कोल्हापूरातील तेजस्विनी महिला वसतीगृहात दाखल झाली. पूजाच्या इच्छेनूसार तिला पॅथॉलॉजी लॅबमध्ये नोकरी मिळाली असून ती आता स्वत:च्या पायावर उभी राहीली. शासनाच्या माहेर योजनेचा लाभ संस्थेने पूजाला दिला. पूजाच्या इच्छेनुसार तिचा विवाह औरंगाबादमधील शकुंतला व श्रीराम भराडिया यांचा मुलगा रितेश यांच्याशी झाला. रितेश हे एका खासगी कंपनीत वरिष्ठ लेखाधिकारी आहेत. या विवाहामुळे  पूजाला लहानपणी हरवलेले कुटूंबाचे छत्र भराडिया कुटूंबाच्या रुपाने पुन्हा एकदा मिळाले. 
संस्थेची दुसरी कन्या ऋणी हिला जेव्हापासून कळते तेव्हापासून ती शासकीय वसतीगृहात राहत आहे. मिरज येथील संस्थेत ती लहानाची मोठी झाली. शिक्षणाची आवड नसल्याने ती घरकामात अधिक लक्ष घालू लागली. त्यामुळे घरकामातही तरबेज झाली. तिच्या इच्छेनुसार तिचा विवाह जयसिंगपूरमधील शोभा व नेमगोंडा पाटील यांचा मुलगा बाहुबली यांच्याशी झाला. बाहुबली हे तालुका खरेदी विक्री संघात नोकरी करत आहेत. ऋणीलाही पाटील कुटुंबीयांच्या रुपाने मायेची उब व कुटुंबाचे छत्र मिळाले.  
या विवाह सोहळ्यास प्रशिक्षणार्थी सहायक पोलिस अधीक्षक भाग्यश्री नवटक्के, पोलीस निरीक्षक दिनकर चौगले, प्रविण चौगुले, शहर वाहतुक शाखेचे पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ, सहायक पोलिस निरीक्षक रिझवाना नदाफ,यांच्यासह विविध शासकीय कार्यालयाचे प्रमुख, सामाजिक कार्यकर्ते आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
https://www.dailymotion.com/video/x8450dw