शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
2
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
3
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
5
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
6
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
7
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
9
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
10
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
11
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
12
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
13
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
14
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
15
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
16
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
17
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
18
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
19
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
20
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 

VIDEO- पर्यटकांना त्र्यंबकेश्वरच्या निसर्गसौंदर्याची भुरळ

By admin | Updated: July 3, 2017 20:53 IST

अझहर शेख/ऑनलाइन लोकमत नाशिक, दि. 3 - पावसाळा सुरू झाला की सहलींचे बेत आखले जातात. पावसाळी पर्यटनाची संधी जवळपास ...

अझहर शेख/ऑनलाइन लोकमतनाशिक, दि. 3 - पावसाळा सुरू झाला की सहलींचे बेत आखले जातात. पावसाळी पर्यटनाची संधी जवळपास कोणीही दवडू देत नाही, कारण पावसाळ्यात बहरणारे निसर्गसौंदर्याची मोहिनी प्रत्येकालाच पडते. हिरव्यागार वसुंधरेच्या कुशीत वसलेल्या डोंगरांनाही हिरवा साज चढलेला असतो आणि ढग जणू त्यांच्या भेटीसाठी आतुर होऊन डोंगरांना आपल्या कवेत घेत असल्याचा भास होतो. पावसाच्या सरींमुळे हिरवाईने नटलेल्या डोंगरांवरून खळाळणाऱ्या धबधब्यांमुळे सौंदर्यात अधिकच भर पडते. आजूबाजूला वाहणारे ओहोळ, तलाव, नाले जोराचा थंडगार वारा आणि पावसाच्या कोसळणाऱ्या सरी अंगावर झेलत आल्हाददायक वातावरणात चिंब होण्याचा मोह निसर्गप्रेमी आवरू शकत नाहीत.नाशिक जिल्ह्यातील कोकण म्हणून लोकप्रिय असलेले तसेच बारा ज्योर्तिलिंगांपैकी एक धार्मिक तीर्थक्षेत्र असलेल्या त्र्यंबकेश्वरचा परिसर हरित सौंदर्याने नटलेला आहे. संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महराज यांचे समाधीस्थळ, त्र्यंबक राजाचे मंदिर भारतभरात प्रसिद्ध आहे. या ठिकाणी कुंभमेळाही दर 12 वर्षांनी भरतो. यामुळे राज्यातून नव्हे तर परराज्यांमधूनही भाविक मोठ्या संख्येने बारामाही हजेरी लावत असतात. पावसाळ्यात पर्यटकांची संख्या वाढली आहे. धार्मिक पर्यटनाबरोबरच पावसाळी पर्यटनाचाही आनंद नागरिक लुटताना दिसून येत आहे.कुशावर्तच्या तलावासह गोदावरीचे उगमस्थान असलेल्या ब्रह्मगिरी पर्वताने पांघरलेला हिरवा शालू आणि तेथून दिसणारे निसर्गाचे विहंगम दृश्य कॅमेऱ्यात क्लिक करण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत आहे. ब्रह्मगिरी परिसरातील निसर्गसौंदर्याचे चित्रीकरण मनाला मोहिनी घालणारे ठरते. नाशिक शहरापासून अवघ्या 30 किलोमीटर अंतरावरील या परिसरात पर्यटकांची सध्या लगबग पाहावयास मिळत आहे. त्र्यंबकेश्वरच्या वाटेतच पवनपुत्र हनुमानाचे जन्मस्थळ मानल्या जाणाऱ्या अंजनेरी पर्वताच्या परिसरातील निसर्गसौंदर्य बघून पर्यटक वाटेत येथे थांबा घेतल्याशिवाय पुढे मार्गस्थ होत नाहीत. पहिने-पेगलवाडी गावांचा परिसर न्याहाळताना पर्यटकांच्या डोळ्यांची पारणे फिटत आहे. त्र्यंबक-घोटी रस्त्यावरील घाटातून मार्गस्थ होताना ही गावे लागतात. आजूबाजूला पसरलेल्या हरित सौंदर्यामध्ये गावातील टुमदार कौलारू घरे जणू एखाद्या चित्रकाराने कुंचल्यातून कॅनव्हासवर साकारलेले चित्रच भासते.

https://www.dailymotion.com/video/x8456zn