ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ५ - मुंबईच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे महत्वाचे अंग असलेल्या बेस्टलाही मुसळधार पावसाचा फटका बसला आहे. अनेक सखल भागात पाणी साचल्याने बेस्टने आपल्या बसेस दुस-या मार्गावर वळवल्या आहेत.
बीपीटी कॉलनी येथील मुलजी राठोड चौक, सायन, किंग्ज सर्कल, हिंदामाता, प्रतिक्षा नगर आणि नॅशनल कॉलेज बांद्रा येथील रस्त्यावर पाणी साचले आहे. शहर आणि उपनगरात पावसामुळे बेस्ट बसेसच्या तीस मार्गावरील वाहतूक बदलण्यात आली आहे.
बेस्टच्या ज्या मार्गावरुन प्रवाशांना इच्छित स्थळी पोहोचण्यासाठी रोज अर्धा तास लागतो. तिथे दोन-दोन तास प्रवाशांना बसमध्ये रखडून रहावे लागत आहे.