शहरं
Join us  
Trending Stories
1
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
2
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
3
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
4
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
5
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
6
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
7
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
8
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
9
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
10
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
11
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
12
बाबो! क्रिती सनॉनने मुंबईत खरेदी केलं पेंटहाऊस, किंमत ऐकून पायाखालची जमीनच सरकेल
13
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
14
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
15
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
16
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
17
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
18
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
19
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
20
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा

VIDEO - `वाय-फाय शुभारंभात आर्चीसोबत बीडकर झिंगाट!

By admin | Updated: August 6, 2016 15:41 IST

येथील पालिकेच्या वतीने शनिवारी शहरवासियांसाठी मोफत वायफाय सुविधेचा प्रारंभ करण्यात आला.

संजय तिपाले, ऑनलाइन लोकमत
बीड, दि. 6 -  येथील पालिकेच्या वतीने शनिवारी शहरवासियांसाठी मोफत वायफाय सुविधेचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी ‘सैराट’फेम रिंकू राजगुरू (आर्ची)ची प्रमुख उपस्थिती होती. तिची एक झलक पाहण्यासाठी तरुणाई अक्षरश: सैराट झाली होती.
 
शहरातील सिद्धीविनायक कॉम्लेक्स समोरील डीपीरोडवर हा सोहळा दुपारी बारा वाजता अभूतपूर्व उत्साहात पार पडला. यावेळी आ. जयदत्त क्षीरसागर, माजी आ. सय्यद सलीम, गटनेते डॉ. भारतभूषण क्षीरसागर, नगराध्यक्षा डॉ. रत्नमाला दुधाळ, उपनगराध्यक्ष नसीमोद्दीन इनामदार यांच्यासह पालिकेचे सभापती, नगरसेवकांची उपस्थिती होती. संगणकावर ‘क्लिक’ करुन वायफाय सेवेचा प्रारंभ झाला.
 
यावेळी आ. जयदत्त क्षीरसागर म्हणाले, जग हे वैश्विक खेडे असून वायफायसारख्या सुविधेमुळे विद्यार्थी, तरुणांना जगाशी स्पर्धा करणे सुकर होणार आहे. वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर शहरवासियांच्या गरजा पूर्ण करण्यावर भर आहे. त्यासाठी पालिका कटीबद्ध असून मूलभूत सुविधांसोबत आता इंटरनेटसारखी सुविधा देण्यातही अग्रेसर आहे. आर्चीचा आदर्श घेऊन बीडच्या मुलींनीही नाट्य, कला क्षेत्रात पुढे जावे, असे आवाहन त्यांनी केले.
 
डॉ. भारतभूषण क्षीरसागर म्हणाले, बीडमध्ये वायफाय सुविधा देण्यास व त्याच्या प्रारंभ कार्यक्रमास आर्चीला आणण्यास विरोध झाला; परंतु आधुनिक तंत्रज्ञानाशिवाय आता पुढे जाता येणार नाही. त्यामुळे विरोध झुगारुन वायफाय सुविधा उपलब्ध केली. आर्चीकडून खूप काही शिकण्यासारखे आहे. अतिशय कष्टातून तिने कमी वयात यश संपादन केले. बीडच्या तरुणाईपुढे आयकॉन असावा, त्यामुळे तिला खास बीडकरांच्या भेटीला आणल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. विकासाला विरोध करणाºयांनी स्वत: एक तरी काम केले का? याचे उत्तर द्यावे, अशा शब्दांत त्यांनी विरोधकांचा समाचार घेतला. 
 

मराठीत सांगितलेलं कळत नाही का...
 
अभिनेत्री रिंकू राजगुरु मंचावर अवतरताच उपस्थित तरुणांनी ‘आर्ची.. आर्ची... असा पुकार केला. त्यानंतर तिने हात उंचावून सर्वांना अभिवादन केले. यावेळी तिच्यासोबत सेल्फी घेऊन हा क्षण अविस्मरणीय करण्यासाठी बच्चेकंपनींसह तरुणाईची अक्षरश: उडी पडली होती. आर्चीची एक झलक डोळ्यात साठवून ठेवण्यासाठी महिलांनीही लक्षणीय गर्दी केली होती. तिच्या भाषणाची सर्वांनाच उत्कंठा होती; परंतु तिने अवघ्या दोन मिनिटांचा संवाद साधला. ‘बीडकरांनो नमस्कार, असे म्हणत तिने संवादास सुरुवात केली. ती म्हणाली, वायफाय सुविधेचा उद्घाटनाला येता आले, याचा आनंद  वाटला. खूप चांगला उपक्रम आहे, असे सांगून तिने बीडकरांना शुभेच्छाही दिल्या. जाताना ‘थँक यू’ म्हणायलाही ती विसरली नाही. शेवटी तिने ‘सैराट’मधील प्रसिद्ध डायलॉग सादर केला. ‘मराठीत सांगितलेलं कळत नाही, का इंग्लिशमध्ये सांगू’ असे म्हणत तिने निरोप घेतला. यावेळी तरुणार्इंनी एकच जल्लोष केला.