शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
3
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
4
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
5
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
6
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
7
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
8
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
9
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
10
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
11
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
12
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
13
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
14
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
15
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
16
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट
17
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
18
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
19
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
20
४० वर्षीय रणवीरचा २० वर्षीय अभिनेत्रीसोबत रोमान्स; धुरंधरमध्ये झळकलेली सारा अर्जुन कोण?

VIDEO : वाशिमच्या शिक्षकाचा मुंबईत आत्महत्येचा प्रयत्न

By admin | Updated: March 21, 2017 20:40 IST

ऑनलाइन लोकमत मुंबई, दि. 21 - वाशिमच्या क्रांतिवीर लहूजी विद्या मंदिर या शाळेतील भानुदास खंदारे या सहाय्यक शिक्षकाने मंगळवारी ...

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 21 - वाशिमच्या क्रांतिवीर लहूजी विद्या मंदिर या शाळेतील भानुदास खंदारे या सहाय्यक शिक्षकाने मंगळवारी आझाद मैदानात झाडावर चढून फाशी घेण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. गळ्यात दोरी टाकून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या खंदारे यांची आझाद मैदान पोलिसांनी योग्यवेळी समजूत काढून अनुचित प्रकार टाळला.शाळा विनाअनुदानित असताना १९९२ रोजी खंदारे या शाळेत रुजू झाले होते. अनुसुचित जातीच्या प्रवर्गांचे शिक्षक म्हणून संस्थेने त्यांचा प्रस्ताव सादर केला होता. मात्र अकोला शिक्षण विभागाने अप्रशिक्षित असल्याचे कारण देत त्यांचा प्रस्ताव नाकारला. मात्र त्यावेळी अनेक शाळांमध्ये अप्रशिक्षित शिक्षकांना मान्यता दिल्याचे निदर्शनास आणल्यानंतर खंदारे यांना मान्यता मिळाली. १९९७ साली शाळेला अनुदान मिळाले. त्यावेळी खंदारे यांची सेवा कायम करण्याऐवजी मुख्याध्यापकाने त्यांना प्रथामिकहून माध्यमिक वर्गांवर धाडले. शिवाय खंदारे यांच्याजागी दुसऱ्याच शिक्षकाची भरती केली. इथूनच खंदारे यांच्यावरील अन्यायाला सुरूवात झाली.खंदारे यांनी सांगितले की, प्रामाणिकपणे शाळेची सेवा करत होतो. २ जून २००० साली अप्रशिक्षित शिक्षकांना सेवेत घेण्याचा शासन आदेश निर्गमित झाला. त्यावेळी मुख्याध्यापकांनी जाणीवपूर्वक डावलले. त्यामुळे डी.एड.चे शिक्षण घेतले. मात्र त्यानंतरही शिक्षण विभागाने अनुदानित तुकडीवर घेतले नाही. अखेर ३१ मे २००७ रोजी १५ वर्षांची सेवा मान्य करून विभागाने पदाला मान्यता दिली. १ जुलै २०११ रोजी सेवा सातत्य झाल्याचे शिक्षणाधिकारी यांनी पत्र दिले. २१ जानेवारी २०१३ रोजी माध्यमिक वर्गांच्या तुकड्यांना२० टक्के अनुदान मंजूर झाले. त्यामुळे वनवास संपण्याची आशा निर्माण झाली होती. मात्र मुख्याध्यापकांनी येथेही अन्याय करत वेतन फाईल शिक्षण विभागाकडे पाठवलेली नाही. अशा परिस्थिती मुख्याध्यापकावर कारवाई करण्याऐवजी शिक्षण विभाग दोषींना पाठीशी घालत असल्याचा खंदारे यांचा आरोप आहे. म्हणून आत्महत्येचा निर्णयगेल्या २५ वर्षांपासून पगाराच्या प्रतिक्षेत असल्याचे खंदारे यांनी सांगितले. अपार कष्ट घेऊन आई-वडीलांनी इतके शिकवले. आज त्यांच्यासह कुटुंबाची जबाबदारी आहे. आज नाहीतर उद्या पगार मिळेल, या आशेवर संघर्ष करत होतो. त्यासाठी अकोला शिक्षण विभागापासून मंत्रालयाच्या फेऱ्या मारत होतो. मात्र अन्यायाशिवाय पदरात काहीच पडले नाही. घराचे भाडे थकले असून वीजबिल न भरल्याने घरात अंधार आहे. मुलांची फी भरण्याचे पैसे नसल्याने उपाशीपोटी कुटुंब घरात बसून आहे. वृद्ध आई-वडीलही माझ्या नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत. अशा परिस्थिती कोणत्या तोंडाने घरी परतू, हा विचार मनात आल्याने अखेर आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे खंदारे यांनी सांगितले. 

https://www.dailymotion.com/video/x844uj9