शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

मोदींचा विजय तोतयेगिरीतून --अवि पानसरे व्याख्यानमाला

By admin | Updated: December 11, 2014 23:47 IST

कुमार केतकर : व्याख्यानास उस्फूर्त प्रतिसाद

कोल्हापूर : प्रगतीच्या मूलभूत विचारांपासून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी ‘अच्छे दिन’ आणि ‘स्वच्छ भारत’ अभियानाची नौटंकी या देशात सुरू आहे. लोकसभा निवडणुकीतील मोदींचा विजय तोतयेगिरीतूनच झाला आहे. मोदींच्या नौटंकीचा इंटरव्हल वर्षभरानंतर होणार आहे. ‘अच्छे दिन’ अजूनही दिसत नाहीत; त्यामुळे जनतेने या नौटंकीतील तोतयेपण वेळीच उघडे पाडले नाही, तर या देशात अनपेक्षित स्थिती निर्माण होईल, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांनी केले. श्रमिक प्रतिष्ठानच्यावतीने येथील शाहू स्मारक भवनमध्ये आज, गुरुवारी झालेल्या अवि पानसरे व्याख्यानमालेत ते बोलत होते. ‘लोकशाहीची वाटचाल’ हा व्याख्यानाचा विषय होता. अध्यक्षस्थानी अर्थतज्ज्ञ डॉ. जे. एफ. पाटील होते. व्याख्यानाचा उद्या समारोप आहे. सुमारे सव्वा तासाच्या व्याख्यानात केतकर यांनी भाजपचे सरकार सत्तेत कसे आले याची कारणमीमांसा केली. सोशल मीडियामुळे मोदींचा विजय झाला असे म्हणणे चुकीचे असून, त्यांचा विजय व्हावा यासाठी धर्मनिष्ठ विचारांची पेरणी दहा वर्षांपासून सुरू होती. त्याचेच फलित लोकसभा निवडणुकीत दिसले. साध्वी निरंजन ज्योती यांचे वक्तव्यदेखील याच विचारातून असल्याचे केतकर यांनी सांगितले. ते म्हणाले, लोकसभा निवडणुकीत मोदींना मिळालेला विजय हा त्यांना दिग्विजयी ठरवीत नाही. स्वातंत्र्याच्या अगोदरपासून या देशाचा विकास घडवून आणण्यासाठी भारतीयांनी स्वीकारलेल्या विचारांचा चक्काचूर या निवडणुकीत झाला. ‘मेक इन इंडिया’च्या नावाखाली कॉर्पोरेट भांडवलशाहीचे आणि आक्रमक हिंदुत्वाचे आव्हान भारतीय लोकशाहीपुढे आहे. निवडणूक काळात पाकविरोधी युद्धाची भाषा करणारे मोदी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना शपथविधीला बोलावतात, हा विरोधाभास जनतेने लक्षात घेतला पाहिजे. सध्या सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकीत काश्मीरमध्ये जाऊन तिथल्या फुटीरतावादाला खतपाणी घालण्याचे काम मोदींकडून सुरू आहे. डॉ. जे. एफ पाटील म्हणाले, भारतीय लोकशाही चारित्र्य हरवत चालली आहे. घटनेने प्रस्तावनेत नमूद केलेल्या सामाजिक कराराचा भंगच होत आहे. राजकीय पक्षांनी साटेलोटे करून जनतेला फसविण्याचा खेळ करून राजकारणाची अल्पाधिकार बाजारपेठच केली आहे. व्याख्यान ऐकण्यासाठी प्रचंड गर्दी झाली. सभागृहाच्या बाहेरही लोक उभे होते.