शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील मोठा दुवा निखळला; ज्येष्ठ पत्रकार दिनू रणदिवे यांना मान्यवरांनी वाहिली श्रद्धांजली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2020 04:40 IST

संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनातील शिलेदार, जेष्ठ पत्रकार दिनू रणदिवे यांचे दादर येथील निवासस्थानी वृद्धापकाळाने निधन

मुंबई : संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनातील शिलेदार, जेष्ठ पत्रकार दिनू रणदिवे यांचे दादर येथील निवासस्थानी मंगळवारी सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनाने संयुक्त महाराष्ट्र चळवळीतल मोठा दुवा निखळला, अशा भावना व्यक्त करीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.संघर्षमय प्रवास पत्रकारितेच्या क्षेत्रातील प्रत्येकासाठी प्रेरणादायी पत्रकारितेच्या माध्यमातून गरीब, श्रमिक वर्गावरील अन्यायाला वाचा फोडणारे आणि त्यांच्यासाठी प्रत्यक्ष मैदानात येऊन झगडणारे ज्येष्ठ पत्रकार दिनू रणदिवे गेल्याचे कळले आणि खूप दु:ख झाले. ठाकरे परिवाराशी त्यांचा स्नेह होता. संयुक्त महाराष्ट्र लढा ज्यांनी लढला, त्यासाठी कारावासही भोगला अशा दिनू रणदिवे यांचा संघर्षमय जीवन प्रवास हा पत्रकारितेच्या क्षेत्रातील प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या जाण्याने संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील एक मोठा दुवा निखळला आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.- उद्धव ठाकरे, मुख्यमंत्रीएक लढवय्या पत्रकार गमावलामहाराष्ट्र राज्य स्थापनेच्या पूर्वीपासून ते आजपर्यंत अशा एका प्रदीर्घ कालखंडाचे दिनू रणदिवे हे सजग साक्षीदार होते. आपल्या सशक्त लेखणीच्या माध्यमातून त्यांनी गरीब व उपेक्षित वर्गाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. गेल्या सहा दशकांमध्ये रणदिवे यांनी राज्यातील अनेक सामाजिक चळवळींमध्ये सक्रिय सहभाग घेतला. महाराष्ट्राच्या पत्रकारितेचा इतिहास रणदिवे यांच्या गौरवशाली योगदानाच्या उल्लेखाशिवाय अपूर्ण राहील. त्यांच्या निधनामुळे राज्याने एक लढवय्या पत्रकार गमावला आहे.- भगतसिंह कोश्यारी, राज्यपालमहाराष्ट्र लढवय्या पत्रकाराला मुकलागोवा मुक्ती संग्राम, संयुक्त महाराष्ट्र चळवळ अशा लढ्यांमध्ये प्रत्यक्षात सहभागी होत आपल्या लिखाणाच्या माध्यमातून हा लढा पेटवत ठेवणाऱ्या ज्येष्ठ पत्रकार रणदिवे यांच्या निधनाने महाराष्ट्र एका लढवय्या पत्रकाराला मुकला आहे.- जयंत पाटील, मंत्री,प्रदेशाध्यक्ष - राष्ट्रवादी काँग्रेसपत्रकारांसाठी होते दीपस्तंभज्येष्ठ पत्रकार, स्वातंत्र्यसैनिक रणदिवे यांच्या निधनाने आपण एक ध्येयवादी पत्रकार व संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील शिलेदार गमावला आहे. रणदिवे यांनी पत्रकारितेत मोलाचे योगदान दिले. गोवा मुक्ती संग्राम तसेच संयुक्त महाराष्ट्र चळवळीतही त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला होता. पत्रकारांसाठी ते एक दीपस्तंभच होते. त्यांनी दलित, आदिवासी व श्रमिकांच्या प्रश्नांसाठीही नेहमी आवाज उठवला. दिनू रणदिवे यांना भावपूर्ण श्रद्धांजली. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी रणदिवे कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी आहे.- बाळासाहेब थोरात, महसूलमंत्री,अध्यक्ष - महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीआंबेडकरी चळवळीने मार्गदर्शक गमावलादिनू रणदिवे हे पत्रकारितेतील आदर्श व्यक्तिमत्त्व होते. गाढे अभ्यासक, मार्गदर्शक होते. त्यांच्या निधनाने संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा ऐतिहासिक साक्षीदार अभ्यासक आणि आंबेडकरी चळवळीचा पाठीराखा हरपला आहे. त्यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळ, गिरणी कामगारांचे लढे यांचे वार्तांकन केले. त्यांच्या पत्रकारितेचा वसा हा वंचित-शोषित घटकांना, उपेक्षित वर्गाला, श्रमिकांना न्याय मिळवून देणारा होता. माझे नेतृत्व घडविण्यात दिनू रणदिवे यांच्यासारख्या पत्रकारांचा वाटा मोठा आहे. त्यांच्या निधनाने केवळ पत्रकारिता क्षेत्राची हानी झाली नसून आंबेडकरी चळवळीने सच्चा मित्र गमावला आहे.- रामदास आठवले, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री, रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षबांगलादेश युद्धाचे वार्तांकन करणारे पहिले मराठी पत्रकार‘संयुक्त महाराष्ट्र पत्रिके’चे संपादक म्हणून दिनू रणदिवे यांनी तुरुंगवास भोगला. बांगलादेश युद्धाचे वार्तांकन करणारे ते पहिले मराठी पत्रकार होते. १९७३ च्या रेल्वे संपातले दिनू रणदिवे यांचे वार्तांकन अजोड होते. त्यांच्या लेखामुळे शिवसेनेच्या पहिल्या हल्ल्याचा अनुभव मला मिळाला. अंतुलेंचा सिमेंट भ्रष्टाचार शौरी यांच्याआधी त्यांनी चव्हाट्यावर आणला.- निखिल वागळे, ज्येष्ठ पत्रकार