शहरं
Join us  
Trending Stories
1
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
2
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
5
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
6
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
7
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
8
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
9
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
10
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
13
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
14
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
15
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
16
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
19
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
20
आरारारा खतरनाक! 'या' देशात भाडे तत्वावर मिळतो बॉयफ्रेंड; मोजावे लागतात 'इतके' पैसे

ज्येष्ठ दिग्दर्शक जब्बार पटेल यांना राजर्षी शाहू पुरस्कार जाहीर, कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी केली घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 15:43 IST

सध्या ते महात्मा जोतिबा फुले यांच्यावर चित्रपट बनवत आहेत

कोल्हापूर : गेली ५० वर्षे राजकीय, क्रांतिकारी, पुरोगामी नाटके आणि चित्रपटांच्या माध्यमातून रसिक श्रोत्यांना अंतर्मुख करणारे ज्येष्ठ चित्रपट नाट्य दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांना यंदाचा ३९ वा राजर्षी शाहू पुरस्कार जाहीर झाला आहे. १ लाख रुपये, स्मृतिचिन्ह आणि मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. ट्रस्टचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांच्या नावाची घोषणा केली.शाहू जयंतीदिनी म्हणजेच २६ जूनला सायंकाळी ६ वाजता शाहू स्मारक भवनात खासदार शाहू छत्रपती यांच्या हस्ते पुरस्कार वितरण होईल. अध्यक्षस्थानी पालकमंत्री प्रकाश आबिटकर असतील.मूळचे पंढरपूर (जिल्हा सोलापूर) येथील डॉ. जब्बार पटेल यांचा महाविद्यालयीन जीवनापासूनच रंगभूमीशी नाते आहे. विजय तेंडुलकर लिखित ‘अशी पाखरे येती’ या नाटकापासून त्यांनी दिग्दर्शनाला सुरुवात केली. ‘घाशीराम कोतवाल’ या ऐतिहासिक, राजकीय, क्रांतिकारी नाटकाने त्यांना खरी ओळख दिली. १९७५ मध्ये त्यांनी ‘सामना’ या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शन केले. ‘तीन पैशाचा तमाशा’ हे पु.ल. देशपांडे यांचे नाटक ‘जैत रे जैत’, ‘सिंहासन’, ‘उंबरठा’ या चित्रपटांनी त्यांची ख्याती आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचविली.‘एक होता विदूषक’, ‘मुक्ता’ या चित्रपटांसाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाले. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर आधारित चरित्रपट, ‘यशवंतराव चव्हाण’ हा चित्रपट आणि पु.ल. देशपांडे, कुसुमाग्रज, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, संतूरवादक पं. शिवकुमार शर्मा यांच्या जीवनावरही माहितीपट बनविला.सध्या ते महात्मा जोतिबा फुले यांच्यावर चित्रपट बनवत आहेत. त्यांनी संगीत नाटक अकादमी, नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा, फिल्म ॲन्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे संचालक, पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीचे कार्यकारी संचालकपद भूषविले आहे.

सध्या पुरोगामीत्व मोठ्या संक्रमणातून जात आहे. अशा परिस्थितीत शाहू महाराजांची आठवण इतक्या चांगल्या प्रकारे जपली जात आहे हे कौतुकास्पद आहे. पुरोगामी, प्रजेच्या कल्याणाची भावना असणारे, रयतेसाठी झटणारे राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या नावे मला जाहीर झालेला हा पुरस्कार माझी जबाबदारी वाढवणारा आहे. त्याबद्दल मी कायम ऋणीच राहीन. - जब्बार पटेल, ज्येष्ठ दिग्दर्शक

टॅग्स :kolhapurकोल्हापूरJabbar Patelजब्बार पटेल