शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
2
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
3
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
6
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
7
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
8
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
9
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
10
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
11
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
12
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
13
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
14
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
15
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
16
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
17
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
18
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
19
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
20
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!

ज्येष्ठ अभिनेते अविनाश खर्शीकर यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2020 03:00 IST

खर्शीकर यांनी चित्रपट, मालिका आणि रंगभूमी अशा तिन्ही माध्यमांमध्ये काम केले. त्यांच्या अनेक नाटकांना रसिकांची पसंती मिळाली.

ठाणे : ज्येष्ठ अभिनेते अविनाश खर्शीकर यांचे गुरुवारी सकाळी साडेदहा वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते ७२ वर्षांचे होते. गेल्या वर्षी त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली होती. त्यावेळी त्यांची प्रकृती चिंताजनक होती. या गंभीर परिस्थितीतूनही ते बरे होऊन बाहेर आले होते. मात्र, गुरुवारी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, जावई असा परिवार आहे.जवाहरबाग स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. ते चार वर्षांपूर्वी ठाण्यात राहायला आले होते. खर्शीकर यांनी चित्रपट, मालिका आणि रंगभूमी अशा तिन्ही माध्यमांमध्ये काम केले. त्यांच्या अनेक नाटकांना रसिकांची पसंती मिळाली. तुझे आहे तुजपाशी, सौजन्याची ऐशीतैशी, वासूची सासू, अपराध मीच केला ही त्यांची नाटके प्रचंड गाजली होती. त्यांच्या सगळ्या नाटकांचे मिळून जवळपास २२ हजारांहून अधिक प्रयोग झाले होते.मराठी सिनेसृष्टीतील देखण्या अभिनेत्यांपैकी ते एक होते. त्यांनी १९७८ मध्ये ‘बंदिवान मी या संसारी’ या मराठी सिनेमाच्या माध्यमातून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. जसा बाप तशी पोरं, आधार, आई थोर तुझे उपकार, माझा नवरा तुझी बायको, चालू नवरा भोळी बायको, माफीचा साक्षीदार यासारख्या अनेक सिनेमांमधील त्यांच्या भूमिका गाजल्या होत्या. ९०च्या दशकात अभिनयासोबतच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचीही तितकीत चर्चा सिनेसृष्टीत होती. सदाबहार खर्शीकर यांनी दैनंदिन मालिका ‘दामिनी’त महत्त्वाची भूमिका साकारली होती. अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, प्रशांत दामले यांच्यासोबत अनेक चित्रपटांत त्यांनी काम केले होते.दामिनी या मालिकेत मी खर्शीकर यांच्यासोबत काम केले होते. ते दिसायला तरुण होते. त्यामुळे ते माझ्यापेक्षा वयाने मोठे असूनही मी त्यांच्या वडिलांची भूमिका केली होते.- उदय सबनीस, ज्येष्ठ अभिनेतेमंगळवारी आम्ही दोघांनी मालिका, नाटक आणि जाहिरातींच्या चित्रीकरणावर चर्चा केली होती. लॉकडाऊननंतर ते त्यांच्या कामाला सुरुवात करणार होते. अचानक सकाळी त्यांच्या निधनाची बातमी आली आणि धक्काच बसला.- विजू माने, दिग्दर्शक