शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायल इराणच्या अण्वस्त्र ठिकाणांवर हल्ले करण्याच्या तयारीत; अमेरिकन गुप्तचरांच्या दाव्याने खळबळ
2
मोठा खुलासा! हेर तारिफने दिलेल्या माहितीवरूनच पाकिस्तानने सिरसावर डागले होते क्षेपणास्त्र
3
अंतरिम दिलासा हवा असेल तर मजबूत युक्तिवाद सादर करा; वक्फ सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
4
Operation Sindoor : सुवर्ण मंदिरात एअर डिफेन्स गन तैनात केली होती? भारतीय सैन्याने दिली माहिती
5
वेगवान वाऱ्यासह कोसळलेल्या पावसानं ठाणे, रायगड, पालघरला झोडपलं; कोकण रेल्वेलाही फटका
6
'आतापर्यंतचे पेपर चांगले गेले, उद्या गावाकडे येणार...'; गायत्रीने सकाळी केला आईला शेवटचा काॅल..!
7
मुसळधारेने दाणादाण,  राज्यात वीज पडून ४ ठार; मान्सूनपूर्व वादळी पावसाने राज्याला झोडपले
8
भारत-पाक संघर्षावेळीही ज्योती ‘आका’च्या संपर्कातच एनआयए, आयबीकडून चौकशीतून निष्पन्न
9
आजचे राशीभविष्य २१ मे २०२५ : अचानक धनलाभ, मित्रांंसाठी खर्च कराल...
10
आंदोलनाची धार कमी झाल्यानंतर भुजबळांना मिळाली मंत्रिपदाची संधी; धनंजय मुंडेंचे दोर कापले
11
गावालाच जवानांचा वेढा, ५ जहाल माओवादी ताब्यात; तीन महिलांचा समावेश, ३६ लाख रुपयांचे होते बक्षीस
12
कल्याणमध्ये स्लॅब कोसळून सहा ठार; सहा जखमी; मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाखांचे अर्थसहाय्य
13
राज्यात पाच वर्षांत ३५ लाख घरे; झोपडपट्टीमुक्त शहरांचा संकल्प 
14
Pune Rains: पुण्यात पावसाचा हैदोस! अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली, घरात शिरले पाणी
15
वैभव सूर्यंवशीनं धरले MS धोनीचे पाय; मग रंगली स्फोटक बॅटरमध्ये दडलेल्या संस्कारी मुलाची चर्चा
16
कामात दिरंगाई झाली तर अधिकाऱ्यांवर कारवाई; पालकमंत्री बावनकुळे यांचा इशारा
17
कहानी पुरी फिल्मी है : चिमुकले गाडीत, आई फलाटावर पाणी भरत राहिली अन् ट्रेन मुंबईच्या दिशेने निघाली
18
मुंबईसह उपनगराला पावसाने झोडपले! गोरेगाव, मालाडमध्ये तुफान पाऊस, अंधेरी भुयारी मार्ग बंद
19
RR vs CSK : धोनीसमोर संजू ठरला भारी! विजयासह राजस्थाननं शेवट केला गोड

वसईत वऱ्हाडाची बोट उलटली

By admin | Updated: February 29, 2016 04:46 IST

पाणजू गावात लग्नाचे वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या बोटीत क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसल्याने ती नागाव खाडीकिनारी उलटून झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला. २१ प्रवासी जखमी झाले असून, त्यातील ५ जण अत्यवस्थ आहेत.

शशी करपे, वसईपाणजू गावात लग्नाचे वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या बोटीत क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसल्याने ती नागाव खाडीकिनारी उलटून झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला. २१ प्रवासी जखमी झाले असून, त्यातील ५ जण अत्यवस्थ आहेत. त्यात ३ मुलींचा समावेश आहे. ही घटना रविवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली. बोट किनाऱ्यावर उभी असतानाच कलंडल्याने मोठी जीवितहानी टळली. या घटनेनंतर पाणजू गावासह नवरदेवाच्या गावी शोककळा पसरली असली तरी हे दोनही विवाह संपन्न झाले. दरम्यान, या अपघाताची गंभीर दखल घेत पालघर जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. या गावात आज जयवंत भोईर आणि रवींद्र भोईर यांच्या मुलींचे विवाह होते. जयवंत भोईर यांच्या मुलीचे दुपारी दीडच्या सुमारास लग्न लागणार होते. गावात ये-जा करण्यासाठी एकच अधिकृत बोट आहे. मात्र, लग्नाला येणाऱ्यांची गर्दी पाहून भोईर यांनी गावातील दोन-तीन खाजगी बोटी ठेवल्या होत्या. सकाळी ११ वाजल्यापासून वऱ्हाडी यायला सुरुवात झाली. त्यामुळे जेट्टीवर मोठी गर्दी होती. दिलीप मोरेश्वर पाटील यांच्या बोटीत चढण्यासाठी लोकांनी एकच गर्दी केली होती. त्यामुळे ३० प्रवासी वाहून नेण्याची क्षमता असलेल्या बोटीत ७०च्या आसपास लोक चढले. त्यामुळे ती कलंडली. त्यामुळे हाहाकार उडाला. किनाऱ्यावर अडीचशे-तीनशे वऱ्हाडींची गर्दी होती. तसेच पाणजू आणि नागाव परिसरातील मच्छीमार तिथे होते. आरडाओरड, गोंधळ आणि रडारड सुरू झाल्यानंतर सावध झालेल्या अनेकांनी मागचापुढचा विचार न करता पाण्यात उड्या मारून बुडालेल्यांना वाचविण्यास सुरुवात केली. दुसरीकडे, घटनेची माहिती मिळाल्यानंतर वसई विरार अग्निशमन दलाचे जवान आणि ८ अ‍ॅम्ब्युलन्स अवघ्या १० मिनिटांत घटनास्थळी पोहोचल्या. मदतकार्य वेळेवर झाल्याने बुडालेल्यांना लगेचच बाहेर काढून हॉस्पिटलमध्ये दाखल केले गेले.>> चिखलामुळे अडथळे, स्कूबा डायव्हिंगचा बचावकार्यात वापरवसई : गावात दोन लग्ने आणि क्रिकेटचे सामने होते. त्यामुळे गावात येण्यासाठी नागाव जेट्टीवर मोठी गर्दी होती. बोट उलटल्यानंतर सर्वांनीच मदतीसाठी धाव घेतल्याने मोठी जीवितहानी झाली नाही. प्रवासी वाहतुकीचा परवाना नसलेल्या बोटीतून क्षमतेपेक्षा जास्त, ७०च्या आसपास प्रवासी भरले गेले होते. भरतीची वेळ, गढूळ पाणी आणि चिखल असल्याने अग्निशमन दलाच्या जवानांना अडथळा येत होता. पण, गावकऱ्यांच्या मदतीने बचावकार्य सुरळीत पार पडले. अग्निशमन दलाने स्कूबा डायव्हिंगच्या माध्यमातून सर्च आॅपरेशन केले. तसेच घटनास्थळी ८ अ‍ॅम्ब्युलन्स ठेवण्यात आल्या होत्या. त्यामुळे अनेकांचे प्राण वाचले, अशी माहिती पालिका फायरब्रिगेडचे प्रमुख भरत गुप्ता यांनी दिली. घटनेची माहिती मिळताच प्रांताधिकारी, तहसीलदार, डीवायएसपी यांनी आपल्या पथकासह घटनास्थळी पोहोचून मदतकार्याला हातभार लावला. आमदार हितेंद्र ठाकूर, माजी महापौर नारायण मानकर, मदन किणी, शिवसेनेचे विवेक पाटील, काँग्रेस वसई शहर अध्यक्ष मायकल फुर्ट्याडो, डॉमनिक डाबरे आदी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी आणि हॉस्पिटलमध्ये मदतकार्यात सहभागी झाले होते. गरज पडली तर बाहेरचे डॉक्टर मागवा. कितीही खर्च झाला तरी मागेपुढे पाहू नका. पण, एकाचेही प्राण जाता कामा नयेत, असे आमदार ठाकूर हॉस्पिटल प्रशासनाला सांगत होते. लग्न लागले साधेपणानेरामचंद्र म्हात्रे यांचा दुर्दैवी मृत्यू आणि पाच जणांच्या प्रकृतीला असलेला धोका वगळता सुदैवाने मोठ्या संकटातून सुटका झालेल्या पाणजू आणि बऱ्हामपूर गावकऱ्यांचा जीव भांड्यात पडला. नवरदेव दीपेश पाटील हा अपघात झाला त्याच वेळी नागाव किनाऱ्यावर येऊन पोहोचला होता. त्यामुळे गावातील लग्नाचे विधी थांबविण्यात आले. त्यानंतर मुहूर्त साधून नागावकिनारी अगदी साधेपणाने दीपेश पाटील आणि निशा भोईर यांचा विवाह पार पडण्यात आला; तर संध्याकाळी रवींद्र भोईर यांच्या मुलीचे लग्नही साधेपणाने उरकण्यात आले. .............................................पाणजू पुलाचा प्रश्न ऐरणीवरपाणजू : चारही बाजूंनी खाडीने वेढलेल्या पाणजू गावात ये-जा करण्यासाठी वाहतुकीचे अन्य साधन नाही. गावात असलेली एकमेव फेरीबोट हेच काय ते साधन आहे. पावसाळ्यात हाही मार्ग बंद असतो. तेव्हा जुन्या रेल्वेमार्गावरून जीवघेणी ३-४ किलोमीटरची पायपीट करून नागाव रेल्वे स्टेशन गाठावे लागते. विद्यार्थी, तरुणी, महिला, वृद्ध आणि रुग्णांची त्यामुळे फारच गैरसोय होत असते. ४ हजार लोकसंख्या असलेले पाणजू गाव प्राथमिक सुविधांपासून आजही वंचित आहे. आजच्या अपघातानंतर हा प्रश्न पुन्हा चर्चेला आला आहे. या दुर्घटनेची गंभीर दखल घेऊन सरकारने आणखी मोठ्या अपघाताची वाट न पाहता एमएमआरडीएमार्फत होऊ घातलेले पुलाचे काम तातडीने सुरू केले पाहिजे; तसेच आजच्या अपघातातील मृत आणि जखमींच्या नातेवाइकांना तातडीने आर्थिक मदत दिली पाहिजे. - विलास भोईर, उपसरपंच, पाणजू ग्रामपंचायतदुर्घटनेत रामचंद्र बाबाजी म्हात्रे (५४, रा. दिवाणमान, वसई) यांचा मृत्यू झाला. २१ जण जखमी झाले असून, त्यातील ५ जणांची प्रकृती गंभीर आहे. त्यामधील फाल्गुनी पाटील, प्रीती वर्तक, दीपांशू घरत व एका लहान मुलीची प्रकृती गंभीर असून, त्यांच्यावर नालासोपारा येथील अलायन्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरूआहेत. जखमींपैकी मधुकर तांगडी, भावना शिंदे, नीलेश पाटील, मोहिनी पाटील, प्रतिभा घरत, आनंद लोकम, भीमा पाटील, हर्षांगी शिंंदे, संजीत पाटील यांच्यावर वसई येथील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. तर बिंदू हरिदास, हितांशी पाटील, गीता पाटील, नलिनी पाटील, नूतन भरत घरत, प्रतीक्षा डी. वर्तक, भरत भोईर, करुणा धनाजी पाटील, दिलीप वर्तक यांच्यावर कार्डिनल ग्रेशस हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. - आणखी वृत्त/३