शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019 : सांगलीतून स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून लढणार वसंतदादांचे नातू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2019 13:24 IST

राजकीय गोंधळ आणि नाराजीनाट्यानंतर अखेर वसंतदादांचे नातू व कॉंग्रेस नेते विशाल पाटील यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या चिन्हावर सांगली लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतची अधिकृत घोषणा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांच्यामार्फत आज दुपारी होणार आहे.

ठळक मुद्देस्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून लढणार वसंतदादांचे नातूउमेदवारी निश्चित : राजू शेट्टींकडून थोड्या वेळात घोषणा शक्य

सांगली : राजकीय गोंधळ आणि नाराजीनाट्यानंतर अखेर वसंतदादांचे नातू व कॉंग्रेस नेते विशाल पाटील यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या चिन्हावर सांगली लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतची अधिकृत घोषणा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांच्यामार्फत आज दुपारी होणार आहे.संपूर्ण राज्यात सांगली लोकसभा मतदारसंघाच्या जागेवरून बराच खल झाला. ही जागा कॉंग्रेसला मिळणार की स्वाभिमानी शेतकरी संघटनेला, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. गुरुवारी याबाबतचा निर्णय घेताना कॉंग्रेसने ही जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला दिल्याचे जाहीर केले. तत्पूर्वी वसंतदादा घराण्याने स्पष्टपणे नाराजी व्यक्त करीत कॉंग्रेसलाच ही जागा मिळावी म्हणून राजकीय दबावतंत्र वापरले, मात्र त्याचा फारसा उपयोग झाला नाही.

दरम्यान कॉंग्रेस नेते व माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील यांनी पक्षाचा राजीनामा देत राजकारणापासून अलिप्त राहण्याचा निर्णय घेतल्याने वातावरण अधिक तापले होते. त्यांचे कनिष्ठ बंधू विशाल पाटील यांनीही दादा गटाचा स्वतंत्र मेळावा घेऊन लोकसभा निवडणूक मैदानात उतरण्याचा निर्धार व्यक्त केला.

प्रसंगी बंडखोरी करण्याबाबत त्यांच्या समर्थकांनी त्यांना सल्ला दिला होता. त्यामुळे विशाल पाटील बंडखोरी करणार का, असा प्रश्नही उपस्थित होत होता. त्यांनी थेट आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेमार्फत निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.वसंतदादा घराण्यातील व्यक्ती प्रथमच अन्य पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवित आहे. इतिहासात प्रथमच असा प्रकार घडत असल्याने राजकीयदृष्ट्या ही घटना महत्त्वपूर्ण बनली आहे. त्यामुळे ही लढत आता राज्यात लक्षवेधी ठरणार आहे. सांगली लोकसभा मतदारसंघात भाजपतर्फे खासदार संजयकाका पाटील, वंचित बहुजन आघाडीतर्फे प्रकाश शेंडगे तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून विशाल पाटील अशी तिरंगी लढत होणार आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकsangli-pcसांगलीRaju Shettyराजू शेट्टीSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटना