शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
3
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
4
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
5
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
6
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
7
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
8
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
9
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
10
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
11
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
12
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
13
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
14
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
15
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
16
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
17
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
18
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
19
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
20
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?

सफाई कामगारांना मोठा दिलासा; वसई विरार मनपाकडून ६ अत्याधुनिक मशीनची खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 22:40 IST

वसई विरार महापालिका घनकचरा व्यवस्थापन विभागाने अत्याधुनिक सक्शन कम जेटींग मशीनची खरेदी केली असल्याची माहिती देण्यात आली.

आशिष राणे, लोकमत न्यूज नेटवर्क   वसई:वसई विरार शहर महापालिका हद्दीतील गटारे व शौचालय सफाईचे काम करणाऱ्या  सफाई कामगारांसाठी केंद्र सरकारच्या वतीने विविध प्रकारच्या आरोग्य सुरक्षा म्हणून वसई विरार महापालिका घनकचरा व्यवस्थापन विभागाने अत्याधुनिक सक्शन कम जेटींग मशीनची खरेदी केली असल्याची माहिती घनकचरा विभागाच्या वतीनं जनसंपर्क अधिकारी गणेश पाटील यांनी लोकमतला दिली असून यापुढे पालिकेतील सफाई कामगार हे या अत्याधुनिक मशीन द्वारेच शहरात साफसफाई करणार असे स्पष्ट केलं आहे.  

या संदर्भात अधिक माहिती देताना पाटील यांनी सांगितले की, वसई विरार शहर महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागा मार्फत शासनाचे गृहनिर्माण व शहरी कामकाज मंत्रालयाद्वारे शहरातील सफाई कामगारांकरिता The Prohibition of Employment as Manual Scavengers and their Rehabilitation Act 2013 अन्वये सफाई मित्र सुरक्षा चॅलेंज योजने अंतर्गत गटार सफाई व शौचालय सफाईचे काम करणाऱ्या सफाई कामगारांच्या उदधाराकरिता विविध योजना राबविण्यात येत आहेत. 

दरम्यान महानगरपालिकेतील सफाई कामगारांच्या सुरक्षिततेकरिता शहरातील सर्व प्रकारच्या गटारांची स्वच्छता करणे कामी महानगरपालिकेने 06  अत्याधुनिक सक्शन कम जेटींग मशीन खरेदी केलेल्या आहेत. या मध्ये कोणत्याही सफाई कामगाराला आता प्रत्यक्ष गटारामध्ये न उतरता सक्शन कम जेटींग मशीनद्वारेच गटारा मधील गाळ सफाई करण्यात येणार आहे.

तसेच सार्वजनिक शौचालय, खाजगी घरे व इमारतीच्या शौचालयाच्या शौचटाक्या सफाई करिता 5  सक्शन मशीन (मैला टॅकर) प्रस्तावित असून महानगरपालिकेकडून त्या लवकरच खरेदी करण्यात येणार असल्याचे ही महापालिका घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीनं सांगण्यात आले त्यामुळे आता सफाई कामगारांना या आरोग्याच्या दृष्टीने अपायकारक कामातून मुक्तता मिळाल्याने या निर्णयामुळे दिलासा मिळाला आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार