शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

वसई परिवहन सेवा महागणार

By admin | Updated: July 19, 2016 03:48 IST

वसई विरार महानगरपालिकेने परिवहनच्या बस तिकीटात दोन ते पाच रुपयांनी दरवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

शशी करपे,

वसई- वसई विरार महानगरपालिकेने परिवहनच्या बस तिकीटात दोन ते पाच रुपयांनी दरवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांना वाहनांऐवजी वाहन भत्ता देऊन त्यातही दरमहा पाच ते ३५ हजार रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवारच्या महासभेत हे दोन्ही प्रस्ताव चर्चेला येणार असून त्यावर शिक्कामोर्तबही होणार आहे. ३ आॅक्टोबर २०१२ पासून वसई विरार पालिकेने बुम तत्वावर परिवहन सेवा सुुरु केली असून त्याचे कंत्राट मे. भगिरथी ट्रान्स कार्पोरेशन प्रा. लि. या कंपनीला दिले आहे. सध्याचे परिवहन सेवेचे प्रवासी भाडे मुंबई महानगर परिवहन प्राधिकरण क्षेत्रातील इतर परिवहन सेवांच्या दरापेक्षा कमी असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. पालिकेने दरवाढीचा प्रस्ताव प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने मंजुरी दिल्याने पालिकेने हा निर्णय घेतला आहे.दरवाढ करताना दोन किलोमीटर पर्यंतचे दर तसेच ठेवण्यात आहेत. दोन ते चार किलोमीटरपर्यंतच्या प्रवासाचे दर आठ रुपयांवरून दहा रुपये करण्यात येणार आहे. चार ते सहा किलोमीटर पर्यंत ९ ऐवजी १३ रुपये भाडे आकारले जाणार आहे. सहा ते आठ किलोमीटरर्पंत ११ ऐवजी १५ रुपये आकारले जाणार आहेत. आठ ते दहा किलोमीटरसाठी १३ ऐवजी १७ रुपये अशी वाढ करण्यात येणार आहे. दहा ते १२ किलोमीटर अंतराच्या सध्याच्या १६ रुपयांच्या तिकीटाचे दर २१ रुपये होणार आहेत. तर बारा ते १४ किलोमीटर प्रवासासाठी १९ ऐवजी २१ रुपये मोजावे लागणार आहेत. त्यामुळे शहर अंतर्गत प्रवासी वाहतूक महागणार आहेत. एकीकडे, प्रवासी दरवाढ करणाऱ्या महापालिकेने अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांच्या वाहन भत्त्यात भरघोस वाढ करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. भाडेतत्त्वावरील वाहनांवर जास्त खर्च होत असल्याने आता आयुक्त, महापौर, उपमहापौरांसह अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांना दरमहा वाहन भत्ता दिला जाणार आहे. यापूर्वीही पदाधिकाऱ्यांना वाहनांऐवजी वाहन भत्ता दिला जात होता. वाहन भत्त्यात आणखी काही अधिकाऱ्यांचाही समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे तो एक चर्चेचा विषय ठरलेला आहे. याबाबत आता जनतेची प्रतिक्रिया दरवाढ अमलात आल्यानंतरच कळू शकणार आहे. >सहाय्यक आयुक्त, उप अभियंता, प्रभारी सहाय्यक आयुक्त , नगर सचिव, वैद्यकीय अधिकारी व विभाग प्रमुख यांनाही वाहन भत्ता लागू करण्यात आला आहे. या सर्वांना आता वाहन भत्यापोटी दरमाह ३५ हजार रुपये मिळणार आहेत. प्रत्येक अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांना वाहने पुरवल्यास पालिकेच्या खर्चात होणारी वाढ लक्षात घेऊन वाहन भत्ता पुरवण्याचा निर्णय घेतल्याचे सांगून आयुक्तांनी हा प्रस्ताव मंगळवारच्या महासभेत आणला आहे. >बड्यांचे बडे हिशेबपूर्वी आयुक्तांना वाहन भत्यापोटी दरमहा ४० हजार रुपये मंजूर करण्यात आले होते. आता त्यात ३५ हजार रुपांची वाढ करून वाहन भत्ता ७५ हजार रुपये करण्यात येणार आहे. महापौरांना पूर्वी ४५ हजार रुपये वाहन भत्ता दिला जात होता. आता त्यात ३० हजार रुपयांची वाढ करून ७५ हजार रुपये करण्यात येणार आहे. उपमहापौरांना आता ४० हजार रुपयांऐवजी ६५ हजार रुपये भत्ता दिला जाणार आहे. स्थायी समिती सभापतींना दरमहा ४० हजार रुपयांऐवजी ४५ हजार रुपये वाहन भत्ता लागू होईल. विरोधी पक्षनेता आणि सभागृह नेत्याच्या वाहन भत्त्यात ८ हजार रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.त्यामुळे तो ३७ हजार रुपयांवरून ४५ हजार रुपयांवर जाणार आहे. सर्व सभापतींच्या सध्याच्या ३५ हजार रुपयांंच्या भत्त्यांमध्ये पाच हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे. उप आयुक्तांनाही पाच हजार रुपये अधिक मिळणार असून त्यांचा दरमहा वाहन भत्ता ४५ हजार रुपये होणार आहे.