वसई : नालासोपारा गासमधील अनधिकृत करारी कॉम्प्लेक्स या इमारतीला एक महिन्याच्या आत जमीनदोस्त करण्याची नोटीस वसई-विरार महापालिकेच्या साहाय्यक आयु्क्तांनी बिल्डरला बजावली आहे. सर्व्हे क्रमांक ३६२ हिस्सा क्र. २ या जागेत महापालिकेची कोणतीही परवानगी न घेता करारी कॉम्प्लेक्स ही बहुमजली इमारत बांधण्यात आली आहे. या प्रकरणी तक्रार आल्यानंतर साहाय्यक आयुक्तांनी नोटीस बजावली आहे. एक महिन्याच्या आत हे संकुल स्वखर्चाने पाडावे. अनधिकृत बांधकाम थांबवण्यात यावे. तेथील वापर थांबवण्यात यावा. रहिवाशांना ताबा देण्यात येऊ नये, असे नोटिसीत बिल्डरला बजावण्यात आले आहे. इमारत स्वखर्चाने पाडण्यात आली नाही, तर महापालिकेमार्फत ती पाडण्यात येईल. त्यासाठी होणारा खर्च वसूल करण्यात येईल. तसेच दखलपात्र गुन्हा दाखल करून दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असेही नोटिसीत बजावण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
अनधिकृत इमारतीला वसई पालिकेची नोटीस
By admin | Updated: March 22, 2017 02:21 IST