शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
2
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
4
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
5
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
6
Viral Video: "ही कार आहे... बाईक नाही!" नको त्या कारणावरून जोडप्यामध्ये पेटला वाद, व्हिडीओ व्हायरल
7
पदकं फेकली, प्रमाणपत्रं फाडली, भाजपा खासदारांच्या क्रीडा महोत्सवात खेळाडूंचा संताप, कारण काय?
8
"दोषींना शिक्षा झालीच पाहिजे..."; बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येवरून भारताने सुनावलं
9
थरकाप उडवणारा VIDEO! चिनी शस्त्रांची पुन्हा पोलखोल, थायलंड विरोधात वापरताना रॉकेट सिस्टिमचाच स्फोट; कंबोडियाच्या 8 जवानांचा मृत्यू
10
GenZ पिढीच्या मुलांवर माझा विश्वास, हीच मुलं भारताला 'विकसित राष्ट्र' बनवतील- पंतप्रधान मोदी
11
४५ वर्षाचा गड कोसळला, भाजपानं रचला इतिहास; १ मत फिरवलं अन् 'या' महापालिकेत बसवला महापौर
12
भाजपा आमदारांच्या ‘ब्राह्मण भोजना’मुळे उत्तर प्रदेशच्या राजकारणात खळबळ, भाजपामध्ये चाललंय काय? 
13
काही केलं तरी रात्री झोपच येत नाही? मग करा 'हे' एक छोटसं काम; १० मिनिटांत व्हाल डाराडूर
14
Shehnaaz Gill : "इथे सगळे राक्षस, मी खूप स्ट्रगल...", शहनाज गिलची झाली फसवणूक, इंडस्ट्रीबद्दल मोठा खुलासा
15
उद्धव ठाकरेंच्या भेटीत काय ठरले? जागावाटपाबाबत बैठकीत चर्चा झाली का?; जयंत पाटील म्हणाले...
16
अडीच वर्षातील काम जनता विसरणार नाही; शिवसेनेत येताच प्रकाश महाजनांचे शिंदेंबाबत कौतुकोद्गार
17
रिपल इफेक्ट : ग्राहकांच्या सवयी बाजाराच्या हालचालींवर कशा परिणाम करतात?
18
"राजकारण बंद करेन, पण आता..."; काँग्रेसमध्ये प्रवेश करताच प्रशांत जगतापांनी मांडली भूमिका
19
पाकिस्तानला अजूनही 'ऑपरेशन सिंदूर'ची भीती! सीमेवर अँटी-ड्रोन सिस्टीम बसवले
Daily Top 2Weekly Top 5

वंचित आघाडी देणार छगन भुजबळांना समर्थन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2019 20:22 IST

लोकसभेच्या नाशिक मतदारसंघात माजी मंत्री छगन भुजबळ निवडणूक लढणार असल्यास त्यांना वंचित बहुजन आघाडीचे समर्थन राहील.

अकोला : लोकसभेच्या नाशिक मतदारसंघात माजी मंत्री छगन भुजबळ निवडणूक लढणार असल्यास त्यांना वंचित बहुजन आघाडीचे समर्थन राहील. ते रिंगणात नसल्यास वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार मैदानात उतरणार असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे नेते माजी आमदार हरिदास भदे यांनी येथे सांगितले. सोबतच लोकसभा निवडणुकीबाबत २३ जानेवारी रोजी वंचित बहुजन आघाडीची भूमिकाही स्पष्ट केली जाईल, असेही यावेळी सांगण्यात आले. शासकीय विश्रामगृहात सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर, जिल्हाध्यक्ष प्रदीप वानखडे, प्रवक्ते डॉ. धैर्यवर्धन पुंडकर, अ‍ॅड. संतोष रहाटे, दीपक गवई, डॉ. प्रसन्नजित गवई यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते माजी मंत्री छगन भुजबळ यांच्याशी औरंगाबाद येथे वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांची भेट झाली. यावेळी माजी आमदार हरिदास भदे, अमित भूईगळ, किसन चव्हाण उपस्थित होते. नाशिक लोकसभा मतदारसंघात भुजबळ निवडणूक लढणार आहेत का, याविषयी त्यांच्याशी चर्चा झाली. त्यावेळी भुजबळ यांच्यासारखा ओबीसी नेता संसदेत असणे सध्याच्या घडीला आवश्यक आहे. ते संसदेत असतील तरच ओबीसींच्या समस्यांचा ताकदीने पाठपुरावा करू शकतात, असा ठाम विश्वास वंचित बहुजन आघाडीला आहे. त्यामुळेच ते निवडणूक लढणार असतील तर नाशिक मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचे त्यांना समर्थन राहणार आहे. भुजबळ यांच्याशिवाय इतर उमेदवार रिंगणात असेल तर त्याच्याविरोधात वंचित बहुजन आघाडीचा उमेदवारही लढणार असल्याचे त्यांना सांगण्यात आले. त्यावर भुजबळ यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही, असे भदे यांनी स्पष्ट केले. वंचित बहुजन आघाडीला सोबत घ्यायचे असेल तर १२ जागांच्या मागणीचा विचार व्हायला हवा. त्यावर काँग्रेसकडून कुणीही बोलायला तयार नाही. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या सभांची घोडदौड सुरूच आहे. त्यातून कोणाला किती जनाधार आहे, हे दिसतच आहे. त्यातून मतदारांना तिसºया पर्यायाची गरज असल्याचे दिसत आहे, असेही भदे म्हणाले. - सरकारने सर्वच समाजाची फसवणूक केलीभाजप सरकारने धनगर, ओबीसी, कोळी, धोबी, बंजारा या समाजाच्या मागण्यांना आश्वासनाचे गाजर देत फसवणूक केली. त्यामुळे यासह अनेक समाज नाराज आहेत. न्यायापासून वंचित सर्व समाजाला उमेदवारी मिळण्याची भूमिका वंचित बहुजन आघाडीची असल्याचेही भदे म्हणाले.

टॅग्स :Chagan Bhujbalछगन भुजबळPoliticsराजकारण