शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

खंजीर खुपसण्याचा प्रयत्न केला तर..; सुजात आंबेडकरांचा महाविकास आघाडीला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2024 08:57 IST

जर यावेळी महाविकास आघाडीने खोडसाळपणा केला तर जनता माफ करणार नाही हे याद राखा असं त्यांनी म्हटलं. 

पुणे - Sujat Ambedkar on Mahavikas Aghadi ( Marathi News ) देशात लोकसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्यात. अशावेळी युती आणि आघाडीच्या जागावाटपाच्या चर्चा अंतिम टप्प्यात आल्यात. महाविकास आघाडीची आज जागावाटपावर बैठक होणार आहे. तत्पूर्वी वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांनी महाविकास आघाडीला इशारा दिला आहे. यावेळी पाठीत खंजीर खुपसण्याचा प्रयत्न केला तर याद राखा असं सुजात आंबेडकरांनी म्हटलं आहे. 

पुण्यातील मेळाव्यात सुजात आंबेडकर म्हणाले की, एक महिन्यात लोकसभेच्या निवडणुका लागणार आहेत. या निवडणुकीबाबत बरीच चर्चा सुरू आहे. एकीकडे युती तर दुसरीकडे आघाडीची बोलणी सुरू आहेत. वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीसोबत घेणार की नाही अशी चर्चा आहे. ही वंचित बहुजन आघाडी सातत्याने लोकशाही टीकवण्यासाठी, संविधान वाचवायला, मोदी-शाह, आरएसएसला छातीवर लढलोय, केवळ लढलो नाही तर त्यांना पुरुन उरलोय अशा वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडी घेत नाही. जर यावेळी महाविकास आघाडीने खोडसाळपणा केला तर जनता माफ करणार नाही हे याद राखा असं त्यांनी म्हटलं. 

तसेच जर तुम्ही युती करताना मागून काही कटकारस्थान रचलं. पाठीत खंजीर खुपसण्याचा प्रयत्न केला तर तो खंजीर तुम्ही फक्त एका पक्षाच्या नव्हे, एका नेत्याच्या नव्हे तर बाबासाहेबांना मानणाऱ्या बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली काम करत असलेल्या मोठ्या समुदायाच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम करताय, हे लक्षात ठेवावे. महायुतीतही सगळं काही सुरळीत चाललंय असं नाही असंही सुजात आंबेडकरांनी सांगितले. 

दरम्यान, अजितदादांची लोक लढलेले शिंदेंच्याविरोधात, शिंदे गटाचे लोक लढलेले अजितदादांविरोधात, कोणती जागा कुणाला सुटेल यावरून वाद आहेत. त्यातून गोळीबार होतायेत. कधी फेसबुक लाईव्हमध्ये तर कधी उल्हासनगरच्या पोलीस ठाण्यात गोळीबार होतोय. या परिस्थितीत माझ्या तरूण, विद्यार्थी, युवक आणि नवमतदारांना आवाहन आहे की, युती आणि आघाडीच्या भानगडीत सगळे सत्तेच्या मागे लागलेले असताना वंचित बहुजन आघाडी किमान समान कार्यक्रम ठेवते. आम्ही सत्तेत आलो तर विकासासाठी काय करू हे आम्ही तुमच्यासमोर ठेवतो असं सुजात आंबेडकरांनी जनतेला सांगितले. 

टॅग्स :Vanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीMahavikas Aghadiमहाविकास आघाडी