...तर चेकचे महत्त्वच उरणार नाही , ‘कॅट’चा अंदाज; डिजिटल व्यवहारच वाढतील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2017 03:06 AM2017-11-18T03:06:20+5:302017-11-18T03:07:22+5:30

 ... the value of the check will not be significant; Digital transactions will increase | ...तर चेकचे महत्त्वच उरणार नाही , ‘कॅट’चा अंदाज; डिजिटल व्यवहारच वाढतील

...तर चेकचे महत्त्वच उरणार नाही , ‘कॅट’चा अंदाज; डिजिटल व्यवहारच वाढतील

Next

मुंबई : डिजिटल बँकिंगमुळे व्यवहार एका क्लिकवर होतात. त्यामुळे नजीकच्या काळात धनादेशाचे महत्त्वच उरणार नाही. परिणामी, ‘चेक बाउन्स’ची प्रकरणेही होणार नाहीत, असे मत अ.भा. व्यापारी महासंघाने (कॅट) व्यक्त केले आहे.
डिजिटल बँकिंगमध्ये व्यापा-यांनी सहभागी व्हावे, यासाठी कॅट प्रयत्न करीत आहे. ‘कॅट’चे सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल यांनी केंद्र सरकार डिजिटल बँकिंगला प्रोत्साहन देण्यासाठी धनादेश बंद करण्याची शक्यता आहे, असे मत मांडले, पण चेकचे महत्त्व कमी होईल, ते पूर्णपणे बंद होतील, असे नव्हे, असा अंदाज कॅटचे अध्यक्ष बी. सी. भरतीया यांनी व्यक्त केला.
चेक लगेच बंद होणार नाहीत. वाढते डिजिटायझेशन पाहता त्यांचे महत्त्व कमी होत जाईल. सरळ व्यवहार करणारे एनईएफटी, आरटीजीएस करून रक्कम पाठवतील, असे भरतीया म्हणाले.

Web Title:  ... the value of the check will not be significant; Digital transactions will increase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :digitalडिजिटल