शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी नवी अट; डिजिटल कोर्स उत्तीर्ण होणे आवश्यक
2
रेल्वे इंजिन घसरल्याने हार्बर मार्गावर खोळंबा; पनवेलला जाणाऱ्या लाेकल साडेचार तास ठप्प
3
भारतीय तरुणांना नशेत बुडविण्याचे कारस्थान
4
मी मराठीतूनच शिकलो, मातृभाषेतून शिकल्याने विषयांची समज पक्की होते; सरन्यायाधीश भूषण गवई
5
छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा ‘सीए’त टॉपर; सीए फायनलचा निकाल जाहीर, मुंबईचा मानव शाह देशात तिसरा
6
ठाकरेंच्या एकतेमुळे मविआची एकता धोक्यात? काँग्रेसचा बदलला सूर; वेगळ्या चुलीची शक्यता
7
मतदारयाद्या पुनरावलोकनाच्या काही नियमांत सूट; बिहार निवडणूक; आता बीएलओंवर जबाबदारी
8
दोन ठाकरेंच्या एकत्र येण्याचे असे झाले प्लॅनिंग..!
9
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
10
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
11
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
12
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
13
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
14
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
15
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
16
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
17
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
18
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
19
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
20
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा

व्हॅलेंटाईन डे ? छे..छे..रस्त्यावरच्या वंचितांसाठी ‘रोटी डे’ - गुड न्यूज

By admin | Updated: February 11, 2017 23:48 IST

अखंड वाहू देत माणुसकीचा झरा : कऱ्हाडच्या तीन तरुणींनी साजरा केला अनोखा दिवस; गोरगरीब मनोरुग्ण, उपेक्षितांना दिले जेवण

संजय पाटील ---कऱ्हाड  -फेब्रुवारी हा ‘स्पेशल डे’चा महिना. या महिन्यात नाती वृद्धिंगत करण्यासाठी वेगवेगळ्या दिवसांचं वेगवेगळं महत्त्व ठरवलं गेलंय; पण याच ‘स्पेशल डे’च्या निमित्तानं माणुसकीचं नातं आणखी बळकट करणारा एक दिवस कऱ्हाडच्या तरुणाईनं साजरा केला. या खास दिवसाला त्यांनी नाव दिलं ‘रोटी डे’.माणसांच्या गर्दीत काही ठिकाणी अपेक्षांच्या नजरा कायम भिरभिरत असतात. गर्दीतून वाट काढत हात पसरून या नजरा मदतीची याचना करतात. काहीजण या हातांवर पैसे टेकवतात. मात्र, अनेकवेळा असे हात दुर्लक्षित केले जातात. ‘भिकारी’ म्हणून त्यांना बाजूला सारलं जातं. हेटाळणी केली जाते. आणि कधीकधी अपमानास्पद वागणूकही मिळते. कऱ्हाडच्या काही तरुणींनी मात्र या वंचितांचं दु:ख जाणलं. फक्त एक दिवस का होईना या वंचितांच्या चेहऱ्यावर हसू फुलविण्याचा त्यांनी विचार केला. आणि हा विचार त्यांनी कृतीतही उतरविला. तेजस्विनी शहा ही कऱ्हाडातील उच्चशिक्षित तरुणी. काही दिवसांपासून सोशल मीडियावर ‘स्पेशल डे’च्या व्हायरल होत असलेल्या पोस्ट तेजस्विनीने पाहिल्या. या खास दिवसात एक वेगळा उपक्रम राबविण्याचा तिने विचार केला. तिने ही बाब मैत्रिणींना सांगितली. त्यांनीही त्याला प्रतिसाद दिला. मात्र, करायचं काय, हा प्रश्न त्यांच्यासमोर होता. फळवाटप, खाऊवाटप याहीपेक्षा वंचितांना आपुलकी वाटेल, असा उपक्रम राबविण्याचा विचार करीत असतानाच तेजस्विनीने ‘रोटी डे’ साजरा करण्याचे ठरविले. या दिवसाची रूपरेषा या मैत्रिणींनी तयार केली. ‘रोटी डे’च्या ठरलेल्या दिवशी तेजस्विनी शहा, उमा डुबल, शुभांगी पाटील या तीन तरुणी सकाळीच घराबाहेर पडल्या. घरातून निघताना त्यांनी घरातच बनविलेली रोटी व भाजी घेतली. तसेच पाण्याच्या बाटल्याही सोबत घेतल्या. शहरातील कोल्हापूर नाका, दत्त चौक, बसस्थानक, कृष्णा नाका, मुख्य बाजारपेठ मार्गावर या तरुणी फिरत राहिल्या. ज्याठिकाणी रस्त्याकडेला वंचित किंवा मनोरुग्ण दिसेल त्याठिकाणी थांबून या तिघी त्यांना सोबत आणलेल्या प्लेटमध्ये जेवण वाढत होत्या. एवढेच नव्हे तर त्यांचं जेवण पूर्ण होईपर्यंत त्या त्याचठिकाणी थांबायच्या. कऱ्हाडातील तरुणींनी साजरा केलेला हा ‘रोटी डे’ सध्या कौतुकाचा विषय ठरलाय. मूकबधिर विद्यार्थ्यांना प्रशिक्षण‘रोटी डे’ साजरा करण्याबरोबरच या तरुणींनी मूकबधिर मुलांना झटपट खाद्यपदार्थ बनविण्याचे प्रशिक्षण दिले. संबंधित मुलांना गॅसचा वापर करता येत नाही. तसेच गॅसचा वापर त्यांच्यासाठी धोकादायक ठरू शकतो. त्यामुळे गरज पडली तर आपली भूक कशी भागवता येईल, याची माहिती या तरुणींनी मुलांना दिली. तसेच सॅण्डविच बनविण्याचे प्रशिक्षणही त्यांच्याकडून मुलांना देण्यात आले.‘व्हॅलेंटाईन डे’, ‘रोज डे’, ‘प्रपोज डे’ यासारखे खास दिवस साजरे करण्यापेक्षा उपेक्षितांसाठी काहीतरी करावं, या विचारातून आम्ही ‘रोटी डे’ साजरा केला. ज्यावेळी आम्ही अशा उपेक्षितांना भेटलो, त्यांना जेवण दिलं त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेलं हसू आम्हाला अद्वितीय आनंद देणारं होतं. आम्ही एक दिवसं साजरा केला. मात्र, हा एक दिवस आमच्या आयुष्यातील सर्वात जास्त समाधनाचा दिवस ठरला. - तेजस्विनी शहा, कऱ्हाड कऱ्हाड येथे तरुणींनी उपेक्षितांसमवेत ‘रोटी डे’ साजरा केला.