शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत पॅलेस्टिनींसह इतर ७ देशांवर प्रवास बंदी; डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय
2
LIC ची कोणत्या कंपनीत किती गुंतवणूक? सरकारनं दिली महत्त्वाची माहिती; टाटा, रिलायन्स, अदानीसह कोणत्या कंपन्या?
3
कॅरेबियन समुद्रात अमेरिकन युद्धनौकांनी 'या' देशाला घेरले; ट्रम्प यांनी दिला थेट युद्धाचा इशारा
4
ब्रिटनमध्ये 'नो एन्ट्री' : व्हिसाचे नियम कडक; ६७ टक्क्यांची मोठी कपात, आयटी, हेल्थ प्रोफेशनल्सना मोठा झटका!
5
प्रदूषणावरून संसदेत राजकीय 'युद्धबंदी'! जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये भारताचा वरचा क्रमांक
6
'धुरंधर'च्या यशात अक्षय खन्ना कुठे गायब? अलिबागच्या घराची केली वास्तुशांती; व्हिडीओ व्हायरल
7
ठाकरे बंधू जाहीरनामा, युती एकाच दिवशी जाहीर करणार? शिवाजी पार्क येथे प्रचाराची सांगता सभाही एकत्रित..?
8
१५ दिवसांत १४ हत्या, १७ अल्पवयीन आरोपींचा समावेश; राजधानी दिल्ली वाढत्या गुन्हेगारीनं हादरली
9
दोस्ती कुणाची? कुस्ती कुणाशी? महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीचा बिगुल
10
कोवळ्या वयात मित्राला संपवण्याची मानसिकता येते कुठून? मुलांच्या मानसिक आरोग्यावर तातडीने लक्ष देण्याची गरज
11
आजचे राशीभविष्य, १७ डिसेंबर २०२५: चांगली बातमी मिळेल,शक्यतो आज वाद टाळावेत
12
ममता बॅनर्जी यांच्या मतदारसंघातून तब्बल ४५ हजार मतदार हटवले; सत्ताधारी TMC राबवणार मोहीम
13
मुंबईत दोन मोठे विमानतळ, मात्र स्टेट हँगरच नाही; सरकारलाही भाड्याने घ्यावे लागते हँगर!
14
'गांधीजी का ये अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान'; विरोधकांचा तीव्र आक्षेप, खासदारांची निदर्शने
15
अनंत अंबांनींच्या वनताराला भेटीने मेस्सी आनंदी; प्राण्यांची काळजी घेण्याची पद्धत पाहून प्रभावी
16
१९९७ पासून केलेल्या विकासकामांची यादी, उद्धवसेनेच्या विकासकामांचे श्रेय घेऊ नका : आ. आदित्य ठाकरे
17
मंत्री कोकाटेंची २ वर्षांची शिक्षा कायम; सवलतीच्या घरांसाठी खोटी कागदपत्रे, कोट्यातून फ्लॅट लाटणे भोवले
18
धुक्यात थांबला होता 'काळ' : ७ बस, ३ कार एकमेकांना धडकून १३ जण खाक
19
दुचाकी, ट्रॅक्टरसह साडेतीन एकर शेतीही विकली, तरीही व्याजाचा डोंगर वाढताच... सावकाराचा तगादा; शेतकऱ्याने विकली किडनी
20
नॅशनल हेराल्ड केस : ईडीला धक्का; राहुल, सोनिया गांधी यांना दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

“जालिंदर सुपेकरांनी तुरुंगात ३०० कोटी मागितले, १०० टक्के फॉल्टी”; सुरेश धस यांचा मोठा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2025 12:16 IST

Vaishnavi Hagawane Case: नैतिकता राहिलेली नाही. गोष्टी किती खालच्या थराला गेल्यात याचे हे उदाहरण आहे. जालिंदर सुपेकरबाबत अनेक तक्रारी माझ्यापर्यंत आल्या आहेत, असे सुरेश धस यांनी म्हटले आहे.

Vaishnavi Hagawane Case: वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात बावधन पोलिसांकडून तपासाला वेग आला आहे. या प्रकरणामुळे राज्यभरात संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणात नवनवीन खुलासे समोर येत आहेत. राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. महिला आयोगाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. यातच बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे प्रकरण लावून धरणारे भाजपा नेते सुरेश धस यांनी आता वैष्णवी हगवणे प्रकरणात मोठे आरोप केले आहेत. 

बीडमध्ये एका सभेत बोलत असताना सुरेश धस म्हणाले की, आयजी पोस्टवर असलेला माणूस रोख १ लाख रुपये चेकद्वारे घेतो. ५० हजारांचा मोबाइल घेतो, यापेक्षा दुर्दैव काय असावे. जालिंदर सुपेकरबाबत अनेक तक्रारी माझ्यापर्यंत आल्या आहेत. जेलमध्ये आरोपींना ३०० कोटी रुपये दे, असे म्हटल्याची तक्रार माझ्याकडे आली आहे. नातेवाईकांच्या सुनेकडून पैसे मागता, याचा अर्थ सुपेकर हा १०० टक्के फॉल्टी आहे, असा दावा सुरेश धस यांनी केला आहे. 

नैतिकता नावाची गोष्ट राहिलेली नाही

पुढे बोलताना सुरेश धस म्हणाले की, नैतिकता नावाची गोष्ट राहिलेली नाही. गोष्टी किती खालच्या थराला गेल्यात याचे हे उदाहरण आहे. हगवणे कुटुंबाची १५० कोटींची मालमत्ता आहे. आता ही प्रॉपर्टी जाळायची की पेटवायची. असे लोक तुरुंगातून कितीही वर्षांनी बाहेर आले तरी समाज त्यांच्यावर शेण हाणणार आहे. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या घरावर जाऊन शेण फेकले. शिवसेना शिंदे गट आणि भाजपाच्या काही कार्यकर्त्यांनी टोमॅटो फेकले. नुसते टोमॅटो हाणून उपयोग नाही, यांच्यावर कवटं हाणायला हवेत, या शब्दांत सुरेश धस यांनी संताप व्यक्त केला. 

दरम्यान, भविष्यात कुणी केले नाही, तर आष्टी मतदारसंघाने याबाबत तयारीत राहावे. हगवणे कुटुंब जामिनावर सुटले तर त्यांच्यासाठी एक गाडी आणि कवटं तयार ठेवा. सापडले तर सुपेकरांबाबतही हेच करायला हवे, असे धस म्हणाले. दुसरीकडे, वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाशी संबंध आढळून आल्यानंतर गृह विभागाने जालिंदर सुपेकर यांच्यावर कारवाई केली होती. तसेच वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात निलेश चव्हाणला ७ जून पर्यंत पोलीस कोठडी तर सुशील आणि राजेंद्र हगवणे यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. 

 

टॅग्स :Suresh Dhasसुरेश धसVaishnavi Hagawane Death Caseवैष्णवी हगवणेBJPभाजपा