शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांचे छळवणूक प्रकरण : वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राध्यापक निलंबित

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2017 16:47 IST

वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयातील मेकॅनिकल विभागाकडील प्रा. व्ही. बी. स्वामी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

सांगली, दि. 31 -  वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयातील मेकॅनिकल विभागाकडील प्रा. व्ही. बी. स्वामी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. प्रा. स्वामी यांच्यावर विद्यार्थ्यांची छळवणूक, विद्यार्थिंनीशी वाईट वागणूक, तोंडी परीक्षेत विद्यार्थ्यांना नापास करण्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. गेल्याच आठवड्यात प्रा. स्वामी यांच्यावर छळाचा आरोप करुन एका विद्यार्थ्याने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. या घटनेची गंभीर दखल घेत महाविद्यालयाचे संचालक डॉ. जी. व्ही. परिशवाड यांनी स्वामी यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. 

गेल्या आठवड्यात दिगंबर भांगे या मेकॅनिकल विभागाच्या तिस-या वर्षात शिकणा-या विद्यार्थ्याने हाताची नस कापून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्याच्या मित्रांनी त्याला उपचारासाठी विश्रामबाग येथील खासगी रुग्णालयात दाखल केले होतो. ‘अपलाईड थर्मो डायनॅमिक्स’ या विषयात तो नापास झाला होता. या विषयाचे प्राध्यापक व्ही. बी. स्वामी यांच्या दडपणामुळेच त्याने हे कृत्य केल्याचा आरोप करून विद्यार्थ्यांनी आंदोलन हाती घेतले होते. विद्यार्थ्यांनी एक दिवस मॅकेनिकल विभागावर बहिष्कार टाकून प्रा. स्वामी यांच्यावर कारवाईची मागणी केली होती. 

या घटनेची दखल घेत संचालक डॉ. परिशवाड यांनी विद्यापीठ अधिनियमानुसार चौकशी समिती नियुक्त करण्याचे आश्वासन दिले होते. तसेच सम्यक विद्यार्थी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख अमोल वेटम, अनिकेत भंडारे, प्रसन्नजित एरंडोलीकर, रोहन बनसोडे, प्रतिक विटेकर, ऋषभ वडगावे, प्रथमेश भोसले, प्रसन्नजीत कांबळे आदींनी जिल्हाधिकारी, पोलीस प्रमुख व संचालकांना निवेदन देऊन प्रा. स्वामी यांच्यावर कारवाईची मागणी केली होती.अखेर संचालक परिशवाड यांनी स्वामी यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. परिशवाड म्हणाले की, प्रा. स्वामी यांच्याबद्दल विद्यार्थ्यांच्या अनेक तक्रारी होत्या. त्याची दखल घेत कारवाई  केली आहे. या तक्रारींच्या चौकशीसाठी समिती नियुक्त करण्यात आली असून त्याचा अहवाल लवकरच प्राप्त होईल, असे सांगितले.  प्राध्यापकावर गंभीर आरोपमेकॅनिकल विभागात  सहाय्यक प्राध्यापक असलेले स्वामी हे चार वर्षापूर्वी वालचंद महाविद्यालयात रुजू झाले होते. त्यांच्यावर विद्यार्थ्यांनी गंभीर आरोप केले आहेत. निलंबनाची कारवाई करतानाही त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. त्यात विद्यार्थ्यांचा छळ, त्यांना धमकी देणे, विद्यार्थिंनी अवांतर वेळेत केबीनमध्ये बोलावून वाईट वागणूक देणे, तोंडी परीक्षेत विद्यार्थ्यांना वारंवार नापास करणे, असे गंभीर आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आले आहेत.