शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

भरती-ओहोटीचे सर्वेक्षण वाढवणवासियांनी उधळले; आयटीडीसी पथकाला पिटाळले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2025 06:05 IST

या प्रस्तावित बंदरासाठी वाढवण, वरोर समुद्रकिनाऱ्यावरील भरावाचे कॉन्ट्रॅक्ट आयटीडीसी या नामांकित कंपनीला मिळाले आहे. 

डहाणू : डहाणूच्या पश्चिम किनारपट्टीवरील प्रस्तावित वाढवण बंदर प्रकल्पासाठी शासकीय हालचालींना पुन्हा वेग आला आहे. त्यानिमित्ताने वाढवण-वरोर समुद्रकिनाऱ्यावर भरती-ओहोटी रेषेचे बुधवारी ड्रोनद्वारेे केलेे जाणारे सर्वेक्षण उधळून लावण्यात आले. सर्वेक्षणासाठी भल्या पहाटे प्रचंड पोलिस बंदोबस्तात आलेल्या आयटीडीसीच्या सर्वेक्षण पथकास वाढवण आणि  परिसरातील ग्रामस्थांसह बंदर विरोधी संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करीत अक्षरश: पिटाळून लावले.

या प्रस्तावित बंदरासाठी वाढवण, वरोर समुद्रकिनाऱ्यावरील भरावाचे कॉन्ट्रॅक्ट आयटीडीसी या नामांकित कंपनीला मिळाले आहे. 

कंपनीतर्फे येथील पर्यावरणीय स्थिती जाणून घेऊन त्याप्रमाणे आराखडा बनण्यासाठी समुद्राला पाच दिवस येणाऱ्या मोठ्या भरती-ओहोटीचे ड्रोनद्वारे सर्वेक्षण होणार आहे, अशी माहिती स्थानिक भूमिपुत्रांना मिळताच त्यांनी वाढवण बंदर विरोधी संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांसह घटनास्थळी धाव घेत पथकावर प्रश्नांची सरबत्ती केली. कागदपत्रांचीही मागणी केली. तसेच त्यांचे काम उधळून लावत त्यांना पिटाळून लावले.

शासनाचे नागरी विरोधाकडे दुर्लक्ष

प्रस्तावित वाढवण बंदर हे जगातील सर्वांत मोठे दहापैकी एक बंदर ठरणार असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतला महत्त्वाकांक्षी प्रकल्प समजला जातो. या प्रकल्पात केंद्राची ७४ टक्के, तर राज्य सरकारची २६ टक्के भागीदारी आहे. 

हे बंदर जवाहरलाल नेहरू पोर्ट ऑथोरिटीद्वारे उभारणार असल्याने त्यांनी आवश्यक असणारी निरनिराळी कंत्राटे वेगवेगळ्या कंपन्यांना  दिलेली आहेत; परंतु या वाढवण बंदरामुळे येथील पर्यावरण, मासेमारी व्यवसाय, तसेच समुद्री जीवसृष्टीला धोका निर्माण होणार असल्याने अनेक वर्षांपासून या प्रकल्पाला येथील नागरिकांकडून कडाडून विरोध होत आहे.

किनारपट्टीवर पोलिस छावणी

दरम्यान, हे सर्वेक्षण होणार असल्याने पालघर पोलिसांनी बुधवारी चिंचणीपासून ते डहाणूखाडीपर्यंतच्या परिसरात नाक्या-नाक्यावर पोलिस बंदोबस्त ठेवला होता. त्यामुळे किनारपट्टीला पोलिस छावणीचे स्वरूप आले होते.

टॅग्स :agitationआंदोलनpalgharपालघर