शहरं
Join us  
Trending Stories
1
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
2
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
3
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
4
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
5
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
6
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
7
Accident: लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
8
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
9
निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
10
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
11
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
12
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
13
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
14
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
15
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
16
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
17
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
18
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
19
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
20
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
Daily Top 2Weekly Top 5

'सध्यातरी' शब्दात अडकले वडेट्टीवार; मग म्हणाले, "मुद्दाम बोललो..., जेलमध्ये जाईन, पण भाजपमध्ये जाणार नाही...!" नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2025 16:53 IST

तुम्ही 'सध्यातरी', असे का म्हणत आहात? असा प्रश्न केला असता, वडेट्टीवार म्हणाले, "तुम्ही मला पकडणार होते, म्हणूनच मी 'सध्यातरी' हा शब्द वापरला...

मी एक नाही दहा वेळा बोललो आहे, मी जेलमध्ये जाण्यासाठी तयार आहे. वर्षभरासाठी, दोन वर्षासाठी जेलमध्ये राहू, पण भाजपमध्ये जाणार नाही, असे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी म्हटले आहे. एवढेच नाही तर, विरोधक म्हणून लढू तर द्या, सर्वच भाजपमध्ये गेले तर मग लढणार कोण? असा सवालही त्यांनी यावेळी केली. त्यांच्या भाजपमध्ये जाण्यासंदर्भात सातत्याने होणाऱ्या चर्चेसंदर्भात विचारले असता, ते बोलत होते.  

तुम्ही भाजपमध्ये जाणार अशी चर्चा सातत्याने सुरू असते. यात खरेच काही तथ्य आहे का? असा प्रश्न विचारला असता, एबीपी माझासोबत बोलताना वडेट्टीवार म्हणाले, "जो आक्रमक असतो, त्याला बदनाम करण्यासाठी एक टोळी तयार करण्यात आली आहे. ती टोळी अशा प्रकारच्या अफवा वारंवार पसरवत असते. मी एक डायलॉग म्हणत असतो, मी सुधीर भाऊंना नेहमी म्हणत असतो, 'त्यांचे आमदारकीचे वय झाले एकतीस आणि सुधीर भाऊंना विचारत नाही देवेंद्र फडणवीस.' आता माझ्या आमदारकीला २८-२९ वर्ष झाले आहेत. मला कळत नाही, मी पहिल्या रांगेत बसणारा माणून मी तीसऱ्या रांगेत कशाला जाईन?"

'सध्यातरी' मी कुठल्याही सापळ्यात नाही. त्यामुळे... -वडेट्टीवार पुढे म्हणाले, "मी एवढी वर्षे विविधी पदांवर काम करतो आहे. विरोधी पक्ष नेता म्हणून, मंत्री म्हणून, राज्य मंत्री म्हणून, विविधी समित्यांवर काम करतोय. मी विधान परिषदेत राहिलो आहे. विधानसभेत मी सहा वेळा निवडून आलो आहे. आता आणखी काय हवे? ज्यांना, कुठल्यातरी पदाची, कुठल्या तरी गोष्टींची अपेक्षा आहे, कुठल्या तरी सापळ्यात अडकण्याची भीती आहे, त्यांचा विचार असा असू शकतो. 'सध्यातरी' मी कुठल्याही सापळ्यात नाही. त्यामुळे मी सुरक्षित आहे आणि गुरगुरतो आहे, असे मला वाटते."

'सध्यातरी' शब्दात अडकले वडेट्टीवार -यावर, तुम्ही 'सध्यातरी', असे का म्हणत आहात? असा प्रश्न केला असता, वडेट्टीवार म्हणाले, "तुम्ही मला पकडणार होते, म्हणूनच मी 'सध्यातरी' हा शब्द वापरला. कारण मी मुद्दामच तुमच्याकडे चेंडू फेकला. 'सध्या तरी' म्हणजे, याचा अर्थ एवढाच समजा की, सध्यातरी मी सुरक्षित आहे, पण नव्याने काही शडयंत्र झाले आणि कुठल्या तरी एजन्सीचा वापर झाला तर, जो काही विषय आहे, त्याला उद्देशून मला बोलायचे होते."

"मी एक नाही दहा वेळा बोललो आहे" -"मी एक नाही दहा वेळा बोललो आहे, मी जेलमध्ये जाण्यासाठी तयार आहे. काय करतील? वर्षभर ठेवतील जेलमध्ये, काही आरोप होतील, सार्वजनिक जीवनात आरोप होत असतात, राजकारणात आरोप होत असतात. त्यामुळे जाऊ आपण, ती तयारी आहे. पण माझे नाव पक्ष बदलण्याच्या यादीत येऊ नये. असे मला वाटते. वर्षभरासाठी, दोन वर्षासाठी जेलमध्ये राहू पण भाजपमध्ये जाणार नाही. विरोधक म्हणून लढू तर द्या, सर्वच भाजपमध्ये गेले तर मग लढणार कोण?" असा प्रश्नही त्यांनी यावेळी केला.

English
हिंदी सारांश
Web Title : Wadettiwar Denies BJP Switch, Ready for Jail, Explains 'Currently'

Web Summary : Vijay Wadettiwar refuted rumors of joining BJP, stating he's prepared for jail but won't switch parties. He clarified his use of 'currently,' hinting at potential political maneuvers against him. He affirmed his commitment to the Congress party and opposition role.
टॅग्स :Vijay Vadettiwarविजय वडेट्टीवारcongressकाँग्रेसBJPभाजपा