शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Corona Vaccination: राज्यात कोरोना लसींचा तुटवडा; आरोग्यमंत्र्यांच्या जालन्यात मात्र १० दिवसांचा साठा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2021 12:00 IST

Corona Vaccination: जालना जिल्ह्याला ठरलेल्या कोट्याच्या तुलनेत तीनपट अधिक लसींचा पुरवठा

मुंबई: राज्यात कोरोना लसींचा तुटवडा जाणवत असल्यानं लसीकरण मोहिमेला ब्रेक लागला असताना जालना जिल्ह्यात मात्र लसींचा अधिकचा साठा शिल्लक आहे. जिल्ह्याला १० दिवस पुरेल इतका अतिरिक्त साठा उपलब्ध आहे. आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे जालना जिल्ह्याचे आहेत. लसींचा तुटवडा असल्यानं राज्याच्या अनेक जिल्ह्यांत लसीकरण मोहीम थांबवावी लागली असताना आरोग्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात मात्र लसींचा मुबलक साठा असल्याचं वृत्त 'इंडियन एक्स्प्रेस' वृत्तपत्रानं दिलं आहे.कडक लॉकडाऊनच्या दिशेने वाटचाल?; कोरोनाचा विस्फोट, गेल्या 24 तासांत तब्बल 3,82,315 नवे रुग्ण सापडलेडॉ. राजेश टोपे विधानसभेत जालना जिल्ह्यातल्या घनसावंगी मतदारसंघाचं प्रतिनिधीत्न करतात. ३१ मार्चला केंद्राकडून राज्याला २६.७७ लाख लसींचे डोस मिळाले. यापैकी ६० हजार डोस जालना जिल्ह्याला मिळाले. विशेष म्हणजे जिल्ह्याचा कोटा १७ हजार इतकाच होता. मात्र प्रत्यक्षात त्याच्या तिपटीहून अधिक डोस जिल्ह्याला मिळाले. "कोरोनाविरुद्धच्या लढ्याची जबाबदारी गडकरींकडे सोपवा", भाजपा खासदाराची मागणीसुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, टोपेंनी आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांना स्वत:च्या जिल्ह्याला अधिकचा लस पुरवठा करण्यास सांगितलं होतं. मात्र लसींच्या पुरवठ्यात कोणत्याही जिल्ह्याला प्राधान्य दिलं गेलं नसल्याचा दावा टोपेंनी केला. जालना जिल्ह्याला लसीचे अधिकचे डोस मिळाले असल्यास ते लसीकरण मोहिमेला प्रोत्साहन देण्यासाठी दिले गेले असावेत, असंदेखील टोपे पुढे म्हणाले.लसीकरणचा वेग वाढवण्यासाठी आम्ही प्राथमिक आरोग्य केंद्रं आणि उपकेंद्रांना लसींचं वाटप केलं आहे, असं टोपेंनी सांगितलं. राज्याच्या तुलनेत जालन्यातील लसीकरणाचा वेग कमी असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. राज्यातील इतर जिल्ह्यात सरासरी २७ टक्के लोकांचं लसीकरण होत असताना जालन्यात मात्र हीच टक्केवारी १८.१ टक्के असल्याची आकडेवारी टोपेंनी दिली.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसRajesh Topeराजेश टोपे