शहरं
Join us  
Trending Stories
1
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
2
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
3
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
4
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
5
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
6
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
7
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
8
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
9
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
10
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
11
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
12
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
13
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
14
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
15
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
16
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
17
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
18
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
19
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
20
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय

१२ ते १५ वयोगटासाठी लसींची ऑर्डर; केंद्र सरकारला हवेत कोरबेव्हॅक्सचे पाच कोटी डोस

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2022 12:05 IST

लसीकरण मोहिमेत कोव्हिशिल्ड, कोव्हॅक्सिन व स्पुतनिक ही लस दिली जात आहे. यातील ‘कोव्हॅक्सिन’ व ‘झायडस’सोबतच ‘बॉयलॉजिकल ई’ कंपनीची ‘कोरबेव्हॅक्स’ ही भारतात तयार होणारी तिसरी लस आहे.

सुमेध वाघमारे -

नागपूर: कोरोनाविरुद्धच्या लसीकरणात ३ जानेवारीपासून सुरू झालेल्या १५ ते १८ वयोगटांतील लसीकरणामुळे आणखी गती आली आहे. आता केंद्र सरकारने ‘बॉयलॉजिकल ई’ कंपनीच्या ‘कोरबेव्हॅक्स’ लसीचे ५ कोटी डोस विकत घेण्यासाठी संबंधित कंपनीला ऑर्डर दिली आहे. ‘कोरबेव्हॅक्स’ लसीची मानवी चाचणी नागपूर मेडिकलसह देशात दहा ठिकाणी झाली. ५ ते १८ वयोगटात झालेल्या या चाचणीमुळे लवकरच १२ ते १५ वयोगटात लसीकरणाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.लसीकरण मोहिमेत कोव्हिशिल्ड, कोव्हॅक्सिन व स्पुतनिक ही लस दिली जात आहे. यातील ‘कोव्हॅक्सिन’ व ‘झायडस’सोबतच ‘बॉयलॉजिकल ई’ कंपनीची ‘कोरबेव्हॅक्स’ ही भारतात तयार होणारी तिसरी लस आहे. या लसीची पहिली आणि दुसरी मानवी चाचणी १८ वर्षांवरील स्वयंसेवकांवर यशस्वी झाल्यानंतर डिसेंबर महिन्यात पुणे व नागपूर मेडिकलमध्ये चाचणी झाली. इंजेक्शनच्या स्वरुपात दिल्या जाणाऱ्या या लसीच्या चाचणीच्या निष्कर्षानंतरच केंद्र सरकारने ‘कोरबेव्हॅक्स’ लसीचे ५ कोटी डोस विकत घेण्याची ऑर्डर दिली आहे. 

अशी झाली मानवी चाचणी -‘कोरबेव्हॅक्स’ लसीची मानवी चाचणी ५ ते १२ व १३ ते १८ या दोन वयोगटांत घेण्यात आली. पहिल्या डोसनंतर दुसरा डोस २८ दिवसांनंतर देण्यात आला. दोन्ही डोस ‘०.५ एमएल’चे होते. तिसरा डोस म्हणजे ‘बूस्टर’ डोसची चाचणी अद्यापही सुरू आहे. दुसऱ्या डोसच्या ४२ दिवसांनंतर तिसरा डोस दिला जात आहे.

- संबंधित कंपनीने हे डोस फेब्रुवारी महिन्याच्या शेवटपर्यंत उपलब्ध करून देण्याची हमी दिली आहे. यामुळे मार्च महिन्यापासून १२ ते १५ वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला सुरुवात होण्याची शक्यता वाढली आहे.

३ मार्चनंतर होऊ शकते लसीकरण सुरू! -२ ते १८ वयोगटात नागपुरात घेण्यात आलेल्या मानवी चाचणीचे संयोजक व बालरोग तज्ज्ञ डॉ. वसंत खळतकर यांनी सांगितले, १५ ते १८ वयोगटात कोव्हॅक्सिन लस दिली जात आहे. आतापर्यंत जवळपास ८० टक्के किशोरवयीन मुलांना ही लस देण्यात आली. २० टक्के मुले शिल्लक आहेत. ते संपल्यावर साधारण ३ मार्चपासून १२ ते १५ या वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसnagpurनागपूर