शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
2
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाख मोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
3
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
4
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
5
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
6
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
7
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ
8
क्या बात! रितेश देशमुखच्या आईसाहेबांनी बल्बच्या प्रकाशात घेतलं ड्रॅगन फ्रूटचं पीक; सूनबाईंना कौतुक, शेअर केला व्हिडीओ
9
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
10
Viral Video : नवी नवरी सोबत बॉयफ्रेंडलाही घेऊन आली; सासरच्या घरात कुठे लपवला व्हिडीओ बघाच
11
...तर १ जानेवारी २०२६ पासून तुमचं पॅन बंद होईल; बँक व्यवहारांसह सर्व महत्त्वाची कामं अडकतील
12
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
13
Claudia Sheinbaum: सुरक्षा भेदून क्लाउडिया शीनबामपर्यंत पोहोचला; भररस्त्यात स्पर्श आणि चुंबनाचा प्रयत्न!
14
भाजीवाल्याने मित्राकडून पैसे उधार घेतले अन् जिंकले ११ कोटी; आता देणार मोठं 'थँक यू' गिफ्ट
15
Numerology: अंकशास्त्रानुसार आपल्यासाठी कोणत्या जन्मतारखेची व्यक्ती परफेक्ट जोडीदार असते?
16
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
17
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
18
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
19
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पॉवरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
20
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?

परिवहन विभागातील निम्मी पदे रिक्त : वाहनांची संख्या वाढल्याने यंत्रणेवरील ताण वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2017 02:56 IST

राज्यात वाहनांच्या नोंदणीपासून तपासणी, कर वसुली, परवाने देणे अशी अनेक महत्त्वाची कामे करणाºया परिवहन विभागातील जवळपास निम्मी पदे रिक्त आहेत. वाहनांची संख्या झपाट्याने वाढत असताना रिक्त पदांमुळे यंत्रणेवरील ताण वाढून कामाची गती मंदावल्याचे चित्र पहायला मिळत आहे.

राजानंद मोरे पुणे : राज्यात वाहनांच्या नोंदणीपासून तपासणी, कर वसुली, परवाने देणे अशी अनेक महत्त्वाची कामे करणाºया परिवहन विभागातील जवळपास निम्मी पदे रिक्त आहेत. वाहनांची संख्या झपाट्याने वाढत असताना रिक्त पदांमुळे यंत्रणेवरील ताण वाढून कामाची गती मंदावल्याचे चित्र पहायला मिळत आहे.राज्यात परिवहन विभागाची एकूण १५ प्रादेशिक परिवहन कार्यालये व ३५ उप प्रादेशिक परिवहन कार्यालये आहेत. या कार्यालयांमार्फत वाहनांची नोंदणी करणे, वाहन कर व प्रवासी कर वसुली, चालक परवाने देणे, प्रवासी-माल वाहतुक परवाने देणे, वाहनांची तपासणी, वाहनांच्या वायुप्रदूषणावर नियंत्रण ठेवणे अशी सर्व प्रकारच्या वाहनांशी संबंधित विविध कामेकेली जातात. तसेच राज्याच्या सीमेलगत एकूण २२ तपासणीनाके आहेत. या नाक्यांवर प्रामुख्याने परप्रांतातून येणाºया वाहनांची तपासणी व कर वसुली करण्याची कामे विभागाला करावी लागतात.विभागाला वर्ग १ ते ४ पर्यंत सप्टेंबर महिनाअखेरीस ५ हजार१०० पदे मंजूर आहेत. त्यामध्ये वर्ग तीनची सर्वाधिक ३५६६ तर वर्ग एकची १०६१ पदे आहेत. वर्ग दोनची पदे ४६ असून वर्ग चारची ४२७आहेत. एकूण मंजूर पदांपैकी सध्या केवळ २ हजार ८१७ पदे भरलेली असून तब्बल २ हजार २८३ पदे रिक्त आहेत. वर्ग एकच्या ४२६ रिक्त पदांमध्ये सर्वाधिक ३७३ पदे मोटार वाहन निरीक्षकांची आहेत. वर्ग तीनमधील सहायक मोटार वाहन निरीक्षकांच्या १३०० पैकी तब्बल १ हजार जागा रिक्त आहेत.सप्टेंबर अखेरपर्यंत वर्गनिहाय पदांची स्थिती-वर्ग मंजूर पदे भरलेली पदे रिक्त पदे रिक्त पदांची टक्केवारीवर्ग -१ १०६१ ६३५ ४२६ ४०.१५वर्ग -२ ४६ २० २६ ५६.५२वर्ग -३ ३५६६ १९५३ १६१३ ४५.२३वर्ग -४ ४२७ २०९ २१८ ५१.०५एकूण ५१०० २८१७ २२८३ ४४.७६

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळ