शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

कॉसमॉस बँकेच्या निवडणुकीत उत्कर्ष पॅनेलचे निर्विवाद वर्चस्व; सहकार पॅनेलचा धुव्वा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2019 20:51 IST

दि कॉसमॉस को-ऑपरेटीव्ह या मल्टी शेड्युल्ड बँकेच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक (२०२०-२०२५) निवडणूक

ठळक मुद्देमुकुंद अभ्यंकर, मिलिंद काळे यांच्यावर मतदारांनी ठेवला विश्वासविद्यमान सात संचालकांसह माजी सहकार आयुक्त चंद्रकांत दळवी निवडणुकीच्या रिंगणात बँकेच्या पुण्यासह गुजरात, मध्यप्रदेश, तेलंगणा, आंध्रप्रदेश, तामिळनाडू आणि कर्नाटक या राज्यात शाखा

पुणे : दि कॉसमॉस को-ऑपरेटीव्ह या मल्टी शेड्युल्ड बँकेच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक (२०२०-२०२५) निवडणूकीमधे डॉ. मुकुंद अभ्यंकर यांच्या उत्कर्ष पॅनेलने कृष्णकुमार गोयल यांच्या सहकार पॅनेलचा धुव्वा उडवित सर्व जागांवर विजय संपादन केला. डॉ. अभ्यंकर यांना सर्वाधिक ५ हजार २२ मते मिळाली. सहकार क्षेत्रातील या अग्रणी बँकेचीनिवडणूक २२ डिसेंबर रोजी झाली. शुक्रवारी (दि. २७) कर्वे रस्त्यावरील हर्षल हॉलमधे मतमोजणी झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून शैलेश कोतमिरे यांनी काम पाहिले. या निवडणुकीत सहकार पॅनेलकडून विद्यमान सात संचालकांसह माजी सहकार आयुक्त चंद्रकांत दळवी निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यानंतरही, सहकार पॅनेलच्या एकाही सदस्याला विजय मिळविता आला नाही. मतदारांनी बँकेचे समुह अध्यक्ष डॉ. अभ्यंकर आणि विद्यमान अध्यक्ष मिलिंद काळे यांच्यावर विश्वास ठेवला. विद्यमान अध्यक्ष काळे यांच्या काळातच कॉसमॉस बँकेवर ९४ कोटी रुपयांचा सायबर हल्ला झाला होता. सभासदांना लाभांश देणे बँकेला शक्य झाले नव्हते. विरोधकांनी निवडणुकीत हा प्रचाराचा मुद्दा केला होता. उत्कर्ष पॅनेलमधील काही व्यक्तींच्या वयाचा मुद्दा देखील उपस्थित केला होता. उत्कर्ष पॅनेलने उच्चशिक्षित तरुणांना संधी दिली. उच्चशिक्षित व्यक्तींच्या हाती सत्ता देण्याचे आवाहन केले होते. त्याला मतदारांनी चांगला प्रतिसाद दिला.बँकेच्या पुण्यासह गुजरात, मध्यप्रदेश, तेलंगणा, आंध्रप्रदेश, तामिळनाडू आणि कर्नाटक या राज्यात शाखा आहेत. बँकेचे एकूण ८० हजार सभासद असून, त्यातील ५९ हजार जणांना मतदानाचा अधिकार होता. त्यातील ३६ हजार सभासद पुणे आणि ८ हजार उर्वरीत राज्यात आहेत. तर, परराज्यातील सभासद मतदारांची संख्या १५ हजार आहे. ------------

विजेत्या उत्कर्ष पॅनेलमधील उमेदवारांना मिळालेली मते

डॉ. मुकुंद अभ्यंकर              ५०२२मिलिंद काळे                       ४९६३अ‍ॅड. प्रल्हाद कोकरे              ४३९५यशवंत कासार                    ४२९७सचिन आपटे                     ४६६३अजित गिजरे                    ४३१७मिलिंद पोकळे                  ४२५४राजेश्वरी धोत्रे                   ४३९७जयंत बर्वे                          ४७०२प्रवीणकुमार गांधी            ४३९०नंदकुमार काकिर्डे            ४३७३अरविंद तावरे                 ४२४०अ‍ॅड. अनुराधा गडाळे      ४३३३------------

टॅग्स :PuneपुणेbankबँकElectionनिवडणूक