शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

कृषी क्षेत्रात ‘एआय’चा वापर; तंत्रज्ञानासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात निधीची तरतूद

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2025 06:33 IST

या परिसंवादात कोकणातील रायगड, पालघर, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील प्रगतिशील शेतकरी सहभागी झाले होते

अलिबाग - शेतकरी शेतात नवे-नवे प्रयोग करून शेतीचे उत्पन्न वाढवत असतात. मात्र, कृषी विद्यापीठाकडे याची माहिती नसते. कृषी विद्यापीठ आणि शेतकरी यांच्यात समन्वयाचा अभाव आहे. कृषी विद्यापीठाला आंतरराष्ट्रीय स्तरावर न्यायचे आहे. तंत्रज्ञानामध्ये आपण मागे आहोत. शेतीसाठी ए. आय. तंत्रज्ञानाचा वापर वाढला पाहिजे, यासाठी अर्थसंकल्पात निधीची तरतूद केली जाणार आहे. शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत ए. आय. तंत्रज्ञान पोहोचविण्याचा मानस असल्याचे कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी व्यक्त केला. 

अलिबाग जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समिती भवनात कोकण विभागीय प्रगतिशील आणि प्रयोगशील शेतकरी यांचा परिसंवाद कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांच्या संकल्पनेतून १० फेब्रुवारी रोजी आयोजिला होता. 

प्रगतिशील शेतकरी परिसंवादात सहभागी या परिसंवादात कोकणातील रायगड, पालघर, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील प्रगतिशील शेतकरी सहभागी झाले होते. समारोपाप्रसंगी कृषिमंत्री कोकाटे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. शेतकऱ्यांनी मांडलेल्या समस्या, प्रश्नाचे निरसन मंत्री कोकाटे यांनी केले. यावेळी व्यासपीठावर कृषी आयुक्त सुरज मांढरे, कृषी संचालक रफिक नाईकवडी, कृषी सह. संचालक अंकुश माने, कृषी रत्न पुरस्कार प्राप्त शेतकरी शेखर भडसावळे, अनिल पाटील, आत्मा प्रकल्प संचालक वंदना शिंदे उपस्थित होते.

मांडल्या समस्यापरिसंवादात आंबा, काजू, नारळ, चिकू, फणस, सुपारी,  भात उत्पादक शेतकरी, कृषी पर्यटन, सेंद्रिय शेती करणाऱ्या प्रयोगशील शेतकऱ्यांनी अनेक सूचना मांडल्या. विविध योजनांची थकीत अनुदाने, खतांचे लिंकिंग, पीकविमा, पायाभूत आणि काढणीपश्चात सुविधांचा अभाव, पीकनिहाय अडीअडचणी, पीक क्लस्टर आदी महत्त्वपूर्ण विषयांसह शेतीतील आव्हाने, समस्या यावेळी सहभागी झालेल्या शेतकऱ्यांनी मांडल्या. 

चार तास चालली बैठकचार तास चाललेल्या या बैठकीत कृषिमंत्री कोकाटे यांनी शेतकऱ्यांचे सर्व म्हणणे ऐकून घेतले. ज्या ठिकाणी बदल शक्य आहेत, त्या विभागाशी चर्चा करून सुधारणा करण्यात येईल. तसेच ज्या योजना किंवा धोरणे केंद्र सरकारशी संबंधित आहेत, त्यासाठी केंद्र सरकारकडे शिफारस व पाठपुरावा करण्यात येईल, असे आश्वासन दिले.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रManikrao Kokateमाणिकराव कोकाटे