शहरं
Join us  
Trending Stories
1
Kalyan Building Collapses: कल्याण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
2
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
3
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
4
१७ वर्षीय आयुष म्हात्रेनं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा; पण फिफ्टी आड आला माफाका
5
सातारा: जेवणाचा डब्बाच डोक्यात मारला, प्रेमसंबंधास अडथळा ठरत असल्याने तरुणाचा खून
6
क्षुल्लक मुद्द्याला जास्त महत्व देऊ नका, हे प्रकरण इथेच थांबवा; सरन्यायाधीश गवई यांचे आवाहन
7
पाकिस्तानची पोलखोल करण्यासाठी भारताचे शिष्टमंडळ तयार; कोण कुठे जाणार? पाहा...
8
Viral Video: आधी देवाला हात जोडले, नंतर मंदिरातील दानपेटी नेली चोरून
9
पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरचे प्रमोशन; पराभूत जनरलला सरकारने बनवले 'फील्ड मार्शल'
10
छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळात एन्ट्रीने नाशिकचा दबदबा, पण पालकमंत्रिपदाचा पेचही वाढला?
11
IPL 2025: आता पाऊस पडल्यानंतरही सामने रद्द होणार नाहीत, आयपीएलमध्ये नवा नियम लागू!
12
"पती नेत्यांना पुरवतो २० वर्षांच्या मुली, मला…’’, महिलेच्या आरोपांनी या राज्यातील राजकारण तापले   
13
Thane: कल्याणमध्ये चार मजली इमारतीत स्लॅब कोसळून भयंकर दुर्घटना, चार जणांचा मृत्यू 
14
ठरलं ! जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर रंगणार IPL फायनल; या मैदानात होणार प्लेऑफ्सचे २ सामने
15
पाकिस्तानने आपल्याच नागरिकांवर केला ड्रोन हल्ला, चार मुलांचा मृत्यू
16
"सरन्यायाधीश गवई यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात प्रोटोकॉलचा भंग करणाऱ्यांवर करावाई करा’’, काँग्रेसचं राष्ट्रपतींना पत्र  
17
पहलगाम हल्ल्यानंतर भारतासमोर नवे आव्हान; दहशतवाद्यांकडून इंडियन आर्मी युनिफॉर्मचा वापर
18
"...तेव्हाच आम्ही हस्तक्षेप करू’’, वक्फ सुधारणा कायद्यावरील सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट 
19
'ऑपरेशन सिंदूर’ला छोटीशी लढाई म्हणत मल्लिकार्जुन खर्गेंचा मोदींना सवाल, म्हणाले...   
20
"हे खूपच धक्कादायक..."; मॉर्फ केलेले फोटो, खोट्या बातम्या पाहून प्रिती झिंटा भडकली, म्हणाली...

ज्यूससाठी फळांऐवजी रंग, स्वादाचा वापर

By admin | Updated: April 28, 2016 03:48 IST

शीतपेय, फळांचा ज्यूस, लिंबू सरबत, बर्फाचे गोळेविक्रत्यांनी सध्या शहरात ठिकठिकाणी ठाण मांडले आहे.

आकाश गायकवाड,

डोंबिवली-शीतपेय, फळांचा ज्यूस, लिंबू सरबत, बर्फाचे गोळेविक्रत्यांनी सध्या शहरात ठिकठिकाणी ठाण मांडले आहे. आंबा, सफरचंद, अननस, चिकू, खरबूज आदी फळांचा ज्यूस ते १० रुपयांत विकत आहेत. त्यामुळे तेथे ग्राहकांची गर्दी होत आहे. परंतु,ज्यूससाठी फळांऐवजी रंग आणि स्वादाचा वापर होत आहे. त्याचेप्रमाण अधिक असल्याचे आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो, असे जाणकारांनी सांगितले. अन्न व औषध प्रशासनाचे अशा विक्रेत्यांकडे दुर्लक्ष होत आहे.वाढत्या तापामानामुळे लाहीलाही होत आहे. त्यावर मात करण्यासाठी थंड पेये व पदार्थांना मोठी मागणी आहे. सध्या शहरातील चौकाचौकांतील आणि रेल्वेस्थानका बाहेरील हातगाडीचालकांकडे १० ते १५ रुपयांत ज्यूस विकत आहेत. घशाची कोरड भागवण्यासाठी नागरिक हमखास फळांचे रस, गोळा सरबत आणि लिंबू सरबत त्यांच्याकडे पिताना दिसतात. नागरिकही ‘स्वस्त आणि मस्त’ असा विचार करून आर्वजून या सरबतांचा आस्वाद घेतात. मात्र, सरबतासाठी वापरले जाणारे पाणी शौचालय, अन्य ठिकाणच्या दूषित पाण्याचा अथवा बोअरवलचा वापर केला जात आहे. तसेच साखरेपेक्षाही कैक पटींनी गोड असणाऱ्या सॅक्रि नच्या द्रव्याचा वापर सरबत गोड बनवण्यासाठी केला जातो. सरबतासाठी वापरला जाणारा बर्फतर घाणीत कुठेही ठेवला जातो. त्यामुळे बोअरवेलच्या किंवा दूषित पाण्याची चव अथवा रंग समजत नाही. कधीकधी सरबत बनवण्यासाठी लागणारे लिंबू निकृष्ट दर्जाचे, डागळलेले आणि खराबही असतात. ज्यूस रंग आणि रसायनयुक्त स्वाद वापरला जातो. कारण ज्यूसविक्रेते कधीही प्रत्यक्षात फळे वापरताना दिसत नाहीत. त्यांच्या मिक्सरमध्ये अगोदरच दूध व त्यात फळाचा स्वाद व रंग टाकून कृत्रिम ज्यूस बनवून ठेवला जातो. फळांचा अर्कलागावा म्हणून खरबूज किंवा कलिंगडाचे तुकडे त्यात टाकले जातात. आंब्याचा हंगाम असला तरी बाजारात पुरेशी आवक झालेली नाही. त्यामुळे एक डझन आंबे किमान ४०० ते ५०० रुपयांना मिळत आहेत. मग १० ते १५ रुपयांत ज्यूस विकण्यासाठी विक्रेते खरबुजाचा वापर करतात. त्यात आंबा आणि अन्य फळांचा स्वाद टाकतात. परंतु, दूषित पाणी आणि हानिकारक रसायनांमुळे ज्यूस प्यायल्यास गॅस्ट्रो, कावीळ, डायरिया, टायफॉइड, यासांरख्या रोगांचा प्रादुर्भाव होऊ शकतो. त्यामुळे अशा हातगाड्यांवर ज्यूस व लिंबू सरबत आवडीने पिणाऱ्यांनी काळजी घ्यायला हवी.