शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: अमृतसरमध्ये वीज पुरवठा पूर्ववत; अद्यापही रेड अलर्ट कायम
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

उरणचे सर्च आॅपरेशन थांबले

By admin | Updated: September 25, 2016 01:00 IST

तीन दिवसांच्या प्रयत्नांनंतर अखेर पोलिसांनी उरण परिसरातील सर्च मोहीम थांबविली आहे. संशयित दहशतवाद्यांना पाहिल्याच्या विद्यार्थिनीच्या तक्रारीवरून

नवी मुंबई : तीन दिवसांच्या प्रयत्नांनंतर अखेर पोलिसांनी उरण परिसरातील सर्च मोहीम थांबविली आहे. संशयित दहशतवाद्यांना पाहिल्याच्या विद्यार्थिनीच्या तक्रारीवरून पोलिसांनी हे सर्च आॅपरेशन सुरू केले होते. त्याकरिता पोलिसांसह एनएसजी तसेच नेव्हीच्या तुकड्या उरणमध्ये दाखल झाल्या होत्या. संशयित दहशतवाद्यांमुळे गेले तीन दिवस उरण परिसराला छावणीचे रूप आले होते. तिन्ही बाजूला असलेल्या समुद्रासह या परिसरात ओएनजीसी, जेएनपीटी पोर्ट, द्रोणागिरी अशी महत्त्वाची ठिकाणे आहेत. समुद्रमार्गे मुंबईही दहशतवाद्यांच्या निशाण्यावर येऊ शकते. त्यामुळे नवी मुंबई पोलीस, शीघ्र कृती दल, एनएसजी यांच्या तुकड्या उरणमध्ये दाखल झाल्या होत्या. गुरुवार ते शनिवारी संध्याकाळपर्यंत नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने कोम्बिंग आॅपरेशन हाती घेतले होते. त्याकरिता गुन्हे शाखेच्या सर्वच तुकड्यांसह ५० अधिकारी व सुमारे ७०० पोलीस कर्मचारी उरणमध्ये बंदोबस्तावर होते. तर आयुक्त हेमंत नगराळे, सह आयुक्त मधुकर पांडे, गुन्हे शाखा उपआयुक्त दिलीप सावंत व विशेष शाखा उपआयुक्त नितीन पवार हेदेखील तळ ठोकून होते. पोलिसांची विविध पथके तयार करून शीघ्र कृती दलाच्या माध्यमातून करंजा ते मोरा व पिरवाडी ते बोरी पाखडी असे सुमारे २५ किमी.चे क्षेत्र पूर्णपणे पिंजून काढण्यात आले. गुरुवारी संध्याकाळी सुरू झालेले हे कोम्बिंग आॅपरेशन शनिवारी संध्याकाळी पूर्ण झाले. महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी करून वाहनांची झाडाझडती सुरू असतानाच प्रत्येक घराची, रहिवासी सोसायट्यांची, बंद इमारती तसेच पडीक घरांची पाहणी केली जात होती. तसेच दहशतवाद्यांकडून लपण्यासाठी एखादे कुटुंब ओलीस ठेवले जाण्याची शक्यता होती. त्यामुळे पोलिसांनी प्रत्येक रहिवासी सुरक्षित आहे का याची खात्री पटवली. त्याशिवाय सागरी पोलिसांमार्फत बोटीतून सागरी किनारा, जेट्टीचा परिसर पिंजून काढण्यात आला. संशयित दहशतवाद्यांच्या शोधाकरिता पोलिसांचे हे सर्च आॅपरेशन सुरू असताना स्थानिकांचेही त्यांना योग्य सहकार्य लाभले. यामुळे शोधकार्य वेळीच पूर्ण होऊ शकले आहे. या तपासात संशयाचा एकही धागा हाती न लागल्यामुळे शनिवारी रात्रीपासून सर्च आॅपरेशन थांबवण्यात आले. दरम्यान, रहिवाशांवर दहशतीचे सावट अद्यापही कायम असल्यामुळे महत्त्वाच्या ठिकाणी चोख बंदोबस्त व नाकाबंदी सुरूच राहणार आहे. तर शाळादेखील पोलीस बंदोबस्तात सुरू ठेवल्या जाणार आहेत. (प्रतिनिधी)‘त्या’ मुलीची अनेकदा चौकशीसंशयित दहशतवादी पाहिल्याचे सांगणाऱ्या त्या मुलीची दोन दिवसांत पोलिसांच्या विविध पथकांनी चौकशी केली. प्रत्येक वेळी ती वक्तव्यावर ठाम असल्यामुळे पोलिसांनी ही बाब गांभीर्याने घेऊन सर्च आॅपरेशन सुरू केले होते. परंतु भर पावसात चालताना रस्त्यालगत थांबलेल्यांचे संभाषण कितपत ऐकता येऊ शकते, यावरही पोलिसांना संशय होता.