शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
2
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
3
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
4
राहुल गांधींनी ज्या ब्राझिलियन मॉडेलचा उल्लेख केला तो फोटोग्राफर निघाला; पहा मॅथ्यूज फरेरो नेमके कोण? 
5
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
6
Health Tips: शरीरावर असलेले लाल चामखीळ कशाचे लक्षण? त्यात काही काळजीचे कारण असते की... 
7
Plane Crash: उड्डाणानंतर काही मिनिटांतच विमान कोसळलं; भयानक घटना कॅमेऱ्यात कैद!
8
१ फोटो, १ मतदारसंघ अन् १०० मते...; राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'नं निवडणूक आयोगाची उडाली झोप
9
UPI की Net Banking? पर्सनल लोनचा EMI भरण्यासाठी सर्वात प्रभावी पर्याय कोणता? जाणून घ्या फायदे आणि तोटे
10
सुंदर पिचाईंची मोठी घोषणा; Googleची अंतराळात झेप, सौर उर्जेवर चालणाऱ्या AI डेटा सेंटरची यशस्वी चाचणी
11
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनलेल्या जोहरान ममदानींचं बॉलिवूडशी खास नातं, आई प्रसिद्ध दिग्दर्शिका
12
Rahul Gandhi : कधी सीमा, कधी स्वीटी, कधी सरस्वती... हरियाणात एका तरुणीची २२ मतं, राहुल गांधींचा मोठा दावा
13
“मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर अनेकांची वक्रदृष्टी, पंचांग काढून राहु-केतु...”; ठाकरेंचा टोला
14
थंडीच्या दिवसांत घरातील फ्रीजचं तापमान नेमकं किती ठेवावं? एका चुकीमुळे भरमसाठ वाढू शकतं बिल!
15
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
16
Devendra Fadnavis: "विकास सोडून फक्त विधानेच!" उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर फडणवीसांची तिखट प्रतिक्रिया
17
BSNL Recharge Plan: ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचा रिचार्ज प्लान आहेत बेस्ट; मिळणार जबरदस्त बेनिफिट्स, जाणून घ्या
18
Bilaspur Train Accident : सीटमध्ये पाय अडकलेला, डोळ्यांसमोर मृतदेहांचा खच...; बिलासपूर अपघाताचं भीषण दृश्य!
19
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
20
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...

कौतुकास्पद! "IAS बनून जनतेची सेवा करण्याचं ध्येय", UPSC परिक्षेत ठाण्याची लेक राज्यात प्रथम

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2023 16:51 IST

UPSC 2022 Topper : ठाण्याची कश्मिरा संखे यूपीएससी परिक्षेत राज्यात प्रथम आली. 

kashmira kishor sankhe । मुंबई: केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) नागरी सेवा परीक्षा २०२२ चा निकाल आज म्हणजेच मंगळवारी जाहीर केला. दिल्लीच्या इशिता किशोरने देशात पहिला क्रमांक पटकावला आहे, तर ठाण्याच्या कश्मिरा संखे हिने राज्यात पहिला क्रमांक मिळवला. कश्मिरा संखे हिचा देशात २५वा क्रमांक आला आहे. देशात ५४ वा क्रमांक पटकावणारी ऋचा कुलकर्णी राज्यात दुसऱ्या क्रमांकाची मानकरी ठरली आहे. 

राज्यात पहिला क्रमांक मिळवल्यानंतर कश्मिरा संखेने आनंद साजरा केला. एवढं मोठं यश मिळेल याची अपेक्षा नव्हती, पण यावेळी करायचंच असा आत्मविश्वास बाळगला होता. निकाल लागल्यानंतर सुरूवातीला विश्वास बसला नाही पण नंतर २५वा क्रमांक पाहून समाधान वाटल्याचे कश्मिराने सांगितले. ती एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलत होती.  व्यवसाय सांभाळत मिळवले यश तसेच लहानपणापासूनच यूपीएससी करायची आवड होती. आईने वर्तमनापत्र दाखवली, त्यातून शिकत गेले, असे कश्मिराने सांगितले. लक्षणीय बाब म्हणजे कश्मिरा ही स्वत: एक डॉक्टर असून डेंटिस्ट आहे. तिने डॉक्टरचा व्यवसाय सांभाळून हे यश मिळवले. आरोग्य क्षेत्रात राहून देखील लोकांची सेवा करता येते पण प्रशासकीय सेवेच्या माध्यमातून अधिक लोकांपर्यंत पोहचता येत असल्याचे तिने यावेळी सांगितले. राज्यात प्रथम आलेल्या कश्मिरा संखेचे आयएएस अधिकारी होण्याचे ध्येय आहे. 

"मला यशाची पूर्ण खात्री होती", UPSC 2022 ची 'टॉपर' इशिता किशोरचं IAS बनण्याचं स्वप्न

IAS बनण्याचे ध्येय - कश्मिरा २०२० पासून यूपीएससीची परीक्षा देत असलेल्या कश्मिराला तिसऱ्या प्रयत्नात यश मिळाले. विशेष बाब म्हणजे पहिल्या दोन प्रयत्नात तिला प्रिलिम्स परीक्षा देखील क्लिअर झाली नव्हती. मात्र, जिद्दीच्या जोरावर ठाण्याच्या या लेकिनं तिसऱ्या प्रयत्नात प्रिलिम्स, मेन्स परीक्षेसह मुलाखतीचाही गड सर केला. आपल्या या यशाचं श्रेय कश्मिराने आपल्या आईवडलांना दिले असून भविष्यात नागरिकांची सेवा करणार असल्याचे म्हटले आहे.  

    

 

  

टॅग्स :thaneठाणेupscकेंद्रीय लोकसेवा आयोगMumbaiमुंबईdocterडॉक्टर