शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना शिविगाळ, अपशब्द, भाजपा आणि काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले, पाटण्यात तुफान राडा 
2
इस्रायलचा येमनवर सर्वात मोठा हल्ला, एकाच हल्ल्यात हुथी पंतप्रधान, संरक्षणमंत्री आणि लष्करप्रमुखांच्या मृत्यूचा दावा 
3
'तू काळी, माझ्या मुलाला सोड, त्याच्यासाठी चांगली मुलगी शोधू'; इंजिनिअर शिल्पाने पती, सासरच्यांमुळे मृत्युला कवटाळलं
4
वैष्णोदेवी भूस्खलनात ६ भाविकांचा मृत्यू; अनेक बेपत्ता, कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर
5
मांत्रिकाच्या सांगण्यावरुन आजोबाने दिला नातवाचा बळी; मृतदेहाचे तुकडे करुन नाल्यात फेकले...
6
जिओ, एअरटेल आणि VI चे एका वर्षासाठी सर्वात स्वस्त प्लॅन! कोण देतंय बंपर ऑफर?
7
पंतप्रधान नरेंद्र मोदींसंदर्भात अपशब्द बोलणाऱ्या विरोधात मोठी कारवाई; पोलिसांनी उचललं!
8
"मी लग्न करेन तेव्हा..." कृष्णराज महाडिकांसोबतच्या 'त्या' फोटोवर पहिल्यांदाच बोलली रिंकू राजगुरू
9
भलताच ट्विस्ट! ७ दिवस बेपत्ता असलेली श्रद्धा सापडली, बॉयफ्रेंड भेटला नाही म्हणून मित्राशी लग्न
10
आयेशा खानने मारला मोदक अन् पुरणपोळीवर ताव, नेटकऱ्यांनी केल्या भन्नाट कमेंट्स
11
जालना हादरले! भीषण अपघातात विहिरीत पडलेल्या कारमधील चौघांचा मृत्यू
12
Manoj Jarange Patil Morcha Update Live: "आंदोलनाची परवानगी वाढवून द्या, मी इथून उठणार नाही"; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
13
Ukrain Navy ship Video: युक्रेनवर रशियाचा 'प्रहार', मोठी युद्ध नौका उडवली, हल्ल्याचा व्हिडीओ समोर
14
टेस्ट ड्राइव्हच्या बहाण्याने दोन जण फॉर्च्यूनर घेऊन पळाले, सोबत गेलेल्या कर्मचाऱ्याला चालत्या गाडीतून फेकलं अन्...
15
Ganesh Chaturthi 2025: बाप्पाच्या सेवेनंतर तुम्हाला कधी 'असा' अनुभव आलाय का?
16
"आरक्षणाचा गुलाल डोक्यावर पडल्याशिवाय आता इथून हलायचं नाही..."; मनोज जरांगे यांचा निर्धार
17
दोन दिवसांच्या घसरणीनंतर बाजारात पुन्हा तेजी! 'या' सेक्टरने दिला सर्वाधिक आधार
18
Ratnagiri: गणेशोत्सवाला गालबोट! विसर्जनादरम्यान दोन जण जगबुडी नदीत बुडाले; एकाचा मृत्यू
19
Manoj Jarange: "मी शेवटपर्यंत मॅनेज होणार नाही", मनोज जरांगेंचा सरकारला इशारा!
20
विराटचं 'ते' वाक्य अन् मोहित सुरींना सुचला 'सैयारा'मधला 'तो' सीन, किंग कोहलीकडून मिळाली प्रेरणा

अप्पर तुडीलमध्ये पाणीटंचाई

By admin | Updated: June 27, 2016 02:09 IST

गेला आठवडाभरापासून महाड तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावली असली तरी अनेक गावांमध्ये पाणीटंचाई आहे.

दासगांव : गेला आठवडाभरापासून महाड तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावली असली तरी अनेक गावांमध्ये पाणीटंचाई आहे. आजही महिलावर्ग पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करत आहेत. महाड तालुक्यातील खाडी पट्टा विभागातील अप्पर तुडील या गावामध्ये आजही भीषण पाणीटंचाई असून मात्र या गावातील अनेक तरुणवर्ग आपल्या स्वखर्चाने वाड्यांवर मोफत पाणी पोहोचवण्याचे काम करत आहेत. याच गावचे नागरिक आज जिल्हा परिषद सदस्य असून पाणी समस्या दूर न करू शकल्याने नागरिकांकडून यांच्या विरोधात नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. मात्र पाण्याची झळ बसलेल्या जवळपास १०० मुस्लीम महिलांनी ग्रामसभेत हजेरी त्यांनी आपली व्यथा यावेळी मांडली. आतापर्यंतच्या इतिहासात ग्रामसभेत पहिलीच मुस्लीम महिलांची एवढ्या मोठ्या संख्येत हजेरी आहे. अप्पर तुडील या गावाची स्वतंत्र नळ पाणीपुरवठा योजना आहे. ही योजना गावाशेजारी असणाऱ्या विहिरीवरून घेण्यात आली आहे. मात्र गेल्या वर्षीपर्यंत या योजनेमधून अप्पर तुडीलमध्ये पाणी मुबलक मिळत होते. यंदा विहीर आटल्याने मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच या गावाला पाणीटंचाईची झळ बसली. या नळपाणी पुरवठा योजनेवर आंबेवाडी, चाळणीकोंड, कातळकोंड, अप्पर तुडील मोहल्ला अशा जवळपास ४ हजार लोकसंख्येच्या असलेल्या वाड्या अवलंबून आहेत.अचानक मे महिन्यातच पाणी गेल्याने या ठिकाणी भीषण पाणीटंचाई निर्माण झाली. हे पाहता या गावचे समाजसेवक रिहान फैरोज खान देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली युसूफ देशमुख, नदीम खान देशमुख, नदीम खानदेशी, अब्दुल्ला कझी यांनी गावाला पाणीपुरवठा करण्याचा एकमताने निर्णय घेत, गेल्या दीड महिना झाला तरी अप्पर तुडीलमधील ४ हजार लोकसंख्येला अहोरात्र पाणीपुरवठा करत आहेत.गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी चार गाड्यांचा वापर केला असून एक पिकअप जीप, दोन ४0७ तर एक ७०९ अशा गाड्यांमधून जवळपास सहा हजार लिटर पाणी मोफत वाडी वाडीवर हे नागरिक स्वत: वाटप करत आहेत. मात्र लागणारे पाणी हे रिहान देशमुख यांनी स्वत:च्या घरी असलेल्या बोअरवेलमधून देत आहेत. गाड्यांमध्ये लागणाऱ्या डिझेलला हेच नागरिक आपल्या खिशातून पैसा टाकत आहेत. मात्र याच गावचे नागरिक इब्राहिम झमाने हे जिल्हा परिषद सदस्य असून यांनी या भीषण पाणीटंचाईसंदर्भात कोणतेच पाऊल न उचलल्याने मात्र येथील नागरिकांकडून यांच्याविरोधात नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. (वार्ताहर)>पाणीटंचाईची महिलांना झळअप्पर तुडील या गावामध्ये यंदा पाणीटंचाईची झळ मोठ्या प्रमाणात महिलावर्गाला बसली असून मोठ्या प्रमाणात मुस्लीम महिलांना याचा त्रास झाला आहे. त्यामुळे अप्पर तुडीलच्या इतिहासात पहिलीच ग्रामसभा गुरुवारी झाली. यावेळी जवळपास १०० मुस्लीम महिलांनी पाणीप्रश्न दूर करण्यासाठी या ग्रामसभेला हजेरी लावत जुना गैरहजेरीचा इतिहास मोडला. जून महिन्याच्या सुरुवातीपासून आजपर्यंत महाड तालुक्यात ३२६ मिमी पावसाची नोंद आहे. मात्र एवढा पाऊस लागून देखील अनेक गावांची पाणीटंचाई समस्या दूर झालेली नाही. अप्पर तुडील या गावात पाण्यासाठी नागरिकांनी केलेली मदत कौतुकास्पद असून परिसरात खाडी पट्टा विभागात त्यांचे कौतुक करण्यात येत आहे.