शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

अवकाळीचा तडाखा : सव्वादोन लाख शेतकऱ्यांचा भरपाईसाठी अर्ज, यावर चर्चा होणार का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2023 05:34 IST

राज्यात होळीच्या काळात तसेच गेल्या आठवड्यात दोनवेळा अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले.

पुणे : राज्यात गेल्या पंधरवड्यात दोनदा झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. याची नुकसानभरपाई मिळण्यासाठी पंतप्रधान पीक विमा योजनेत सहभागी झालेल्या सुमारे सव्वादोन लाख शेतकऱ्यांनी विमा कंपन्यांकडे अर्ज केला आहे.राज्यात होळीच्या काळात तसेच गेल्या आठवड्यात दोनवेळा अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले.

काढणीला आलेल्या पिकांना फटका बसल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला. अनेक जिल्ह्यांमध्ये गहू, हरभरा काढणीला आला होता, तर काही शेतकऱ्यांच्या काढणीला केलेल्या पिकांवर पावसाचे पाणी फिरल्याने पिकांचे नुकसान झाले आहे. काढणीला आलेल्या द्राक्ष, आंबा, केळी, मोसंबी या फळपिकांचा जमिनीवर सडा पडला. त्यामुळे शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाले आहे.

जिल्हानिहाय स्थानिक आपत्तीसाठी अर्ज नगर १,१२६, नाशिक २१६, चंद्रपूर ११, कोल्हापूर १, जालना ११,८८२, गोंदिया ५, सोलापूर १,१९२, जळगाव ६१७, सातारा ४, छ. संभाजीनगर ६,८९५, भंडारा १३, वाशिम १,३४१, बुलढाणा ३,०२५, नंदुरबार १,७३३, सांगली ३०१, यवतमाळ १६,०१९, अमरावती १,८४८, गडचिरोली ७, धाराशिव ५,२२४, लातूर १३,७६४, परभणी ६,०१०, वर्धा ३४०, नागपूर ४०४, हिंगोली २,०८०, अकोला २,९१६, धुळे ३,६७०, पुणे ६७, नांदेड ५६,३३५, बीड २१,७६३, एकूण १,६०,८०९

जिल्ह्यानुसार काढणीपश्चात नुकसान अर्जनगर २१७, नाशिक ३४, चंद्रपूर २, जालना १,७७९, गोंदिया ८, सोलापूर १,६०७, जळगाव ४३७, सातारा ८, वर्धा १,७५६, बुलढाणा ३,९३४, नंदुरबार १६२, सांगली ३१, यवतमाळ १३,६९५, अमरावती १,६३०, गडचिरोली २९, धाराशिव ३,४२३, लातूर ८,९८५, परभणी ७,४६४, वर्धा १०१, नागपूर ११५, हिंगोली २,०८६, अकोला १,६२२, धुळे १६१, पुणे ८, बीड ४,७४१, एकूण ५६,७२२.

राज्यातून १ लाख ६० हजार ८०९ अर्ज विमा कंपन्यांकडे आले आहेत. नुकसानभरपाईचा अर्ज आल्यानंतर त्याचे तत्काळ सर्वेक्षण करण्यात येते. त्यानुसार आतापर्यंत १ लाख ५ हजार २४१ अर्जदारांचे सर्वेक्षण झाले आहे, तर ५५ हजार ५६८ अर्जांचे सर्वेक्षण झालेेले नाही.

काढणीपश्चात नुकसान झालेल्यांमध्ये ५६ हजार ७२२ अर्ज आले आहेत. त्यापैकी २७ हजार ५२४ अर्जांचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून, २९ हजार १९८ अर्जांचे सर्वेक्षण अपूर्ण आहे. यात सर्वाधिक १३ हजार ६९५ अर्ज यवतमाळमधून आले आहेत. त्याखालोखाल ८ हजार ९८५ अर्ज लातूरमधून आले आहेत.

उभ्या पिकांचे नुकसान झाल्यास भरपाईसाठी उत्पादन खर्चाच्या तुलनेत ४०, ६०, ७५, ८५ व १०० टक्के भरपाई मिळते. त्यामुळे शेतकऱ्यांनी वेळेत अर्ज करावा. नुकसान झालेली बहुतेक पिके काढणीच्या अवस्थेत असल्याने शेतकऱ्यांना भरपाई चांगली मिळणार आहे.- विनयकुमार आवटे, मुख्य सांख्यिक, कृषी विभाग

टॅग्स :Farmerशेतकरी