शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
2
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
3
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार
4
प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले, आई बनली हैवान; पोटच्या पोराला कायमचं संपवलं
5
बाजारात आज पुन्हा तेजी! हिरो-सिप्लासह 'या' क्षेत्रात चांगली वाढ, तर अदानी-ITC ठरले फ्लॉप
6
'आमच्याकडे ब्रह्मोस आहे', शाहबाज शरीफ यांच्या विधानावर असदुद्दीन ओवैसी संतापले
7
लेक हुशार, डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहिलं, पण वडिलांना नव्हतं मान्य! दूधातून गुंगीचं औषध दिलं अन्...
8
चीन-अमेरिका सैन्यात समुद्रात चकमक, ट्रम्पच्या धोकादायक जहाजाला क्षेत्राबाहेर हाकलून लावलं...
9
जुलैमध्ये 'या' कारचं नशीब अचाकनच 'चमकलं'; खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी; 4 महिन्यांचा विक्रम मोडला!
10
'चंद्राबाबू नायडू राहुल गांधींच्या संपर्कात; म्हणून ते...', जगन मोहन रेड्डींचा मोठा दावा
11
जत्रेतील आकाश पाळण्याला लटकली महिला, पाहणाऱ्यांच्या तोंडचं पळालं पाणी, अखेर...  
12
ना विद्युतीकरणाची गरज, ना पर्यावरणाची हानी; भारताचे पहिले हायड्रोजन ट्रेन इंजिन तयार, पहा फोटो
13
ठाकरे बंधूंच्या युतीला काँग्रेसचा ग्रीन सिग्नल? संजय राऊत म्हणतात, “आमची चर्चा झाली आहे...”
14
२२ वर्षांच्या आनंदमयी बजाजची मोठी भरारी! तब्बल २.५ अब्ज डॉलरचा व्यवसाय सांभाळणार
15
"मी बिपाशापेक्षा उत्तम...", मृणाल ठाकूरने तुलना करताच नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले...
16
'क्रिमीलेअर'बाबत केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; उत्पन्नाची मर्यादा बदलणार?
17
पाकिस्तानातून अवैधपणे शस्त्रास्त्रे पुरवणाऱ्या सलीम पिस्तुलला मुसक्या बांधून आणलं भारतात
18
केवळ आठवणीतच राहणार 'ही' १३३ वर्ष जुनी कंपनी? बंद होण्याच्या मार्गावर, प्रत्येक घराशी आहे हिचं नातं
19
'इंडियन आयडॉल'चा विजेता, २० वर्षांचं करिअर; अभिजीत सावंतला पहिल्यांदाच मिळाली मोठी संधी
20
मोहम्मद रिझवान बॉल सोडायला गेला अन् क्लीन बोल्ड झाला! अंपायरनं अशी उडवली खिल्ली (VIDEO)

अनपॅकिंग द स्टुडिओ!

By admin | Updated: November 1, 2015 00:45 IST

छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयात आयोजित ‘अनपॅकिंग द स्टुडिओ : सेलीब्रेटिंग द जहांगीर सबावाला बिक्वेस्ट’च्या माध्यमातून उलगडला आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून प्रेरणा

विशेष /- स्नेहा मोरे

छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयात आयोजित ‘अनपॅकिंग द स्टुडिओ : सेलीब्रेटिंग द जहांगीर सबावाला बिक्वेस्ट’च्या माध्यमातून उलगडला आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून प्रेरणा घेत लवकरच वस्तुसंग्रहालयात जहांगीर सबावाला यांचा जीवनपट उलगडणारे कायमस्वरूपी दालन सुरू होणार आहे. जहांगीर सबावाला यांचे स्नेही आणि कवी रणजीत होस्कोटे यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या ‘अनपॅकिंग दी स्टुडिओ’ या प्रदर्शनाद्वारे सबावालांची एक अत्यंत खासगी व जिव्हाळ्याची जागा अर्थात त्यांचा स्टुडिओ कलारसिकांना पहिल्यांदाच दाखविला जात आहे. हे प्रदर्शन ३ डिसेंबरपर्यंत सर्व कलारसिकांसाठी छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयात खुले राहील.या प्रदर्शनाचे दोन भाग आहेत; त्यात एक भाग आलब्रेख्त ड्यूरर् ते उलाफूअ एलीएसन् या कलाकारांच्या स्टुडिओंमध्ये नित्यनेमाने काम करणाऱ्याच्या पाच शतकांच्या दीर्घ परंपरेचा आहे. तर सबावालांच्या सर्जनात्मक प्रवासातून घडून आलेला युरोपीय अ‍ॅटलीयर ते परंपरा घनवादी परंपरा या बदलाच्या टप्प्यांचा आहे.या प्रदर्शनाची कल्पना पाच विभाग असलेल्या निबंधाच्या स्वरूपात करण्यात आली असून, त्याद्वारे या वस्तुसंग्रहालयाच्या इतिहासाची व योगायोगाने त्याच्याशी जोडल्या जाणाऱ्या निरनिराळ्या संदर्भांची चर्चा करण्यात आली आहे. यांपैकी काही चित्रे १९३०च्या दशकात या वस्तुसंग्रहालयाच्या संग्रहात सामावल्यानंतर पहिल्यांदाच प्रदर्शित केली जात आहेत. सबावाला यांची काही अखेरची चित्रे, त्यांच्याविषयी इतरांनी लिहिलेल्या लेखांचा व त्यांनी स्वत: केलेल्या लिखाणांचा समृद्ध संग्रह, जुनी छायाचित्रे, पुस्तके, १९४०च्या दशकातील पोर्टफोलिओ आणि स्केचबुक्स इ. बहुमूल्य वस्तू त्यांची पत्नी शिरीन सबावाला यांनी संग्रहालयाला भेट दिल्या आहेत.इमॅजिनेशन्स चेंबर‘इमॅजिनेशन्स चेंबर्स’ या विभागात स्टुडिओच्या प्रवासाचे वर्णन तीन टप्प्यांत करण्यात आले. स्टुडिओच्या बंदिस्त जागेत काम करणाऱ्या कलाकारांच्या कार्यपद्धतीचा पहिला टप्पा आहे. तर ईवा हेस्स, अँडी वॉरहॉल, डनियल ब्युरहेन्न इ. कलाकारांचा ‘पोस्ट स्टुडिओ’ दुसरा टप्पा आहे; आणि कलाकार जेथे जाईल तेथील आजूबाजूचा परिसर स्टुडिओमध्ये परिवर्तित होऊ लागला, यालाच ‘पोस्ट-पोस्ट स्टुडिओ’ म्हणतात तो तिसरा टप्पा होय. सबावालांची स्टुडिओमध्ये काम करण्याची पद्धत, लंडन आणि पॅरिस येथील कला शिक्षणाची पार्श्वभूमी याचे प्रतिबिंब येथे पाहायला मिळते.स्केच, ड्राफ्ट, इमेजया विभागात सबावालांच्या कार्यपद्धतीचा नेमका अनुभव कलारसिकांना येतो. चित्रनिर्मिती करताना त्यांच्या अतिशय चिकित्सक कार्यपद्धतीवर प्रकाश टाकणाऱ्या एका अपूर्ण चित्रासह, काही कच्च्या रेखाटनांच्या माध्यमातून सबावाला यांच्या कलाजीवनाचा सर्वंकष आढावा घेण्यात आला आहे. सबावालांचा आउटडोअर ईझळ, पॅलेट, ब्रशेस आणि त्यांच्या ग्रंथसंग्रहातील काही निवडक पुस्तकांच्या साहाय्याने ‘स्केच, ड्राफ्ट, इमेज’च्या रंगमंचावर उभारलेला प्रातिनिधिक स्टुडिओ फार महत्त्वाची भूमिका पार पाडतो. या विभागाचे शीर्षक कलाकाराची दैनंदिन कलात्मक कृतिशीलता, प्रयोगशीलता त्यातील सातत्य यांकडे प्रामुख्याने निर्देश करते.रेव्री, फंताझीया, क्वेस्ट या विभागात कला प्रवासाच्या मार्गातील निरनिराळ्या प्रवाहांची, प्रेरणास्रोतांची माहिती देण्यात आली आहे. या विभागात सबावालांच्या कलाकृती, त्यांच्या संग्रहातील काही जुनी कौटुंबिक छायाचित्रे व छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयातील ऐतिहासिक महत्त्वाच्या हिमालयीन, जपानी कलाकृती मांडण्यात आल्या आहेत. १९५०च्या दशकात चीनने तिबेटवर केलेल्या आक्रमणामुळे निर्वासित झालेल्या तिबेटी लोकांच्या भारतातील स्थलांतरणामुळे बौद्ध धर्माशी सबावाला यांची ओळख झाली. ही आवड आध्यात्मिक विषयांप्रति वाढत गेली, जी त्यांच्या कलेतून कायम प्रतित होत गेली. या विभागात उटंगवा कूनीसडा या जपानी कलावंताच्या १९व्या शतकातील वूड ब्लॉक प्रिंटचाही अंतर्भाव करण्यात आला आहे.द स्कूल आॅफ बॉम्बे या विभागात ‘जे.जे. स्कूल आॅफ आर्ट’ नावानेच लोकप्रिय असलेल्या मुंबईच्या प्रसिद्ध कलाशिक्षण संस्थेकडे लक्ष वेधले आहे. तर दुसरीकडे सबावालांच्या प्राथमिक कलाशिक्षणाला आरंभ झाला तो प्रवास या ठिकाणी उलगडला आहे. या विभागात काही भारतीय, परदेशस्थ भारतीय आणि भारतात जन्मलेल्या युरोपीय कलाकारांच्या कलाकृती प्रदर्शित करण्यात आल्या आहेत. त्यात १९३८ साली या वस्तुसंग्रहालयाच्या संग्रही अंतर्भूत झाल्यानंतर काचूडूरियान यांची चित्रे पहिल्यांदाच कलारसिकांसमोर येत आहेत. ‘द स्कूल आॅफ बॉम्बे’ या संबंध सबावालांचे समकालीन असलेल्या मुंबईतील इतर चित्रकारांना उद्देशूनदेखील वापरला आहे. सबावाला आणि त्याच्या समकालीन कलाकारांनी आपापल्या पातळीवर आधुनिक दृश्यभाषेत सुस्पष्टता आणण्यासाठी केलेले प्रयत्नही या ठिकाणी पाहायला मिळतात.स्टेजेस् आॅफ व्ह्युविंगप्रदर्शनाच्या अखेरच्या विभागात एका कलाकाराव्यतिरिक्त माणूस म्हणून करण्यात आलेला त्यांचा विचार येथे मांडला आहे. या विभागात जुनी छायाचित्रे आणि जहांगीर आर्ट गॅलरी या प्रकल्पाच्या मूळ वास्तुशास्त्रीय आराखड्यांच्या प्रतिकृती कामु ऐय्यर आणि अर्बन डिझाईन रिसर्च इन्स्टिट्यूट यांच्या सौजन्याने उपलब्ध झाल्या आहेत.