शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

नियोजनाअभावी नाट्य संंमेलन पुढे ढकलण्याची नामुष्की ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2019 12:24 IST

ना स्थळ, ना तारखा, ना संंमेलनाध्यक्ष जाहीर

ठळक मुद्देराज्य शासनाकडून नाट्य संमेलनाला मिळणारे ५० लाख रुपयांचे अनुदान काहीसे अडकले पुणे आणि कोथरूड नाट्य शाखांनी ३१ ऑगस्टपर्यंत मध्यवर्तीकडे प्रस्ताव सादर

पुणे : शंभरावे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन पुण्यात आयोजित करण्याची इच्छा नाट्य परिषदेच्या पुणे, कोथरूड शाखांसह जिल्ह्यातील अन्य तीन शाखांनी प्रदर्शित केलेली असतानाही, संमेलन सांगली-मुंबई व्हाया तंजावरला नेण्याच्या मध्यवर्ती नाट्य परिषदेच्या अध्यक्षांच्या मनसुब्यामुळे संमेलनाचे संपूर्ण नियोजनच फसल्याचे सांगण्यात येत आहे. ना तारखा... ना स्थळ.. ना संमेलनाध्यक्ष जाहीर करण्यात आले. त्यामुळे राज्य शासनाकडून नाट्य संमेलनाला मिळणारे ५० लाख रुपयांचे अनुदान काहीसे अडकले आहे. आता राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. राज्यात सत्ता कुणाच्या हातात जाणार, याची माहिती नाही. मग, संमेलन कुणाच्या जिवावर करणार? अशा पेचात अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद अडकली आहे. त्यामुळे हे संमेलन पुढे ढकलण्याचीच एकप्रकारे नामुष्की ओढवली आहे.शंभराव्या नाट्य संंमेलनाच्या आयोजनासाठी पुणे आणि कोथरूड नाट्य शाखांनी ३१ ऑगस्टपर्यंत मध्यवर्तीकडे प्रस्ताव सादर केले होते. या दोन शाखांसह जिल्ह्यातील दौंड, शिरूर आणि बारामती या तीन शाखांनीही संमेलन घेण्यासाठी सकारात्मकता दर्शविली होती. नियमानुसार पुणे आणि कोथरूड शाखांच्या प्रस्तावांच्या विचार होणे अपेक्षित होते; मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. हे संमेलन शंभरावे असल्याने ते वेगळ्या पद्धतीने करण्याची मध्यवर्ती नाट्य परिषदेच्या अध्यक्षांची इच्छा होती; मात्र तेही नियोजन फसले. ......ही तत्परता नाट्य परिषदेला जमली नाही१ राज्याच्या विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच उस्मानाबाद शाखेने १०० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संंमेलनाचे स्थळ आणि तारखा निश्चित करून, सरकारचे संंमेलनासाठीचे ५० लाख रुपयांचे अनुदान पदरात पाडून घेतले; मात्र ही तत्परता मध्यवर्ती नाट्य परिषदेला दाखविता आली नाही. स्थळ आणि तारखाच जाहीर झाल्या नसल्याने सरकारकडे अनुदानाचा प्रस्तावच पाठविता आला नाही. २ या सर्व घडामोडी सप्टेंबर-आॅक्टोबरमध्येच होणे अपेक्षित होते; मात्र तसे घडले नाही. आता राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. सत्ता स्थापनेचं घोंगडं भिजत पडलं आहे. त्यामुळे नाट्य संंमेलनाच्या आयोजनासाठी पैसा आणायचा कुठून? मग संमेलन कुणाच्या जिवावर करणार, अशी गोची झाली आहे. त्यामुळे तूर्तास तरी हे संमेलन पुढे ढकलण्याशिवाय गत्यंतरच नसल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.

नाट्य संमेलनाच्या तारखा अद्याप निश्चितच नाहीत. संमेलनाध्यक्ष अजून ठरलेला नाही; मग राष्ट्रपती राजवटीमुळे नाट्य संमेलन पुढे ढकलले, असे कसे म्हटले जाऊ शकते? - प्रसाद कांबळी, अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद  

टॅग्स :PuneपुणेTheatreनाटकState Governmentराज्य सरकारPresident Ruleराष्ट्रपती राजवट