शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

"विद्यापीठे आणि इन्क्युबेटर्स हे नोकरी शोधणारे नव्हे तर निर्माण करणारे बनवणार" 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2025 16:41 IST

भविष्यातही मानवी हस्तक्षेप न ठेवता पारदर्शक पद्धतीने उद्योजकांना राज्यात शासनाबरोबर उद्योग सुरू करण्याची संधी प्राप्त करून दिली जाणार आहे असं मुख्यमंत्री म्हणाले. 

मुंबई - विद्यापीठे आणि इन्क्युबेटर्स महाराष्ट्राच्या नवकल्पना स्टार्टअपला बळकटीकरण देणाऱ्या संस्था  आहेत. ग्रामीण भागातील नव कल्पना असलेल्या तरुणांनाचा उद्योगात सहभाग वाढवणार असून उद्योजकांना मार्गदर्शन, नेटवर्किंग, कायदेशीर सहाय्य इत्यादी सेवा देणाऱ्या इन्क्युबेटर्सना स्टार्टअप सुरू करण्यासाठी सहकार्य करणार. शासकीय आणि खाजगी विद्यापीठे या भविष्यातील स्टार्टअपला बळकटीकरण देणाऱ्या संस्था आहेत. विद्यापीठे आणि इन्क्युबेटर्स हे नोकरी शोधणारे नव्हे तर निर्माण करणारे बनवणार अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. 

बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स येथील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत राज्य नाविन्यता सोसायटीच्यावतीने एम्पॉवरींग इनोव्हेशन, एलिव्हेटिंग महाराष्ट्र (Empowering Innovation,Elevating Maharashtra) या संकल्पनेवर आधारित ‘राष्ट्रीय स्टार्टअप दिवस’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  बोलत होते. ते म्हणाले की, सिडबी (SIDBI) स्मॉल इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया) कडून स्टार्ट अपसाठी दोनशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. प्रत्येक प्रादेशिक  विभागाला तीस कोटी रुपयांची तरतूद करणार आहे. काळाची गरज ओळखून स्टार्ट अप धोरणाचा नवीन मसुदा तयार केला आहे. उद्योजकांना सूचनांसाठी हा मसुदा उपलब्ध करून देण्यात आला आहे हे देशातील आधुनिक धोरण ठरणार  तसेच  राज्यात नाविन्यता शहराची स्थापना करणार आहे असं त्यांनी घोषित केले. 

तसेच नवं उद्योजक आणि महिला उद्योजकांच्या नवकल्पना सक्षम करून महाराष्ट्राची उन्नती करण्यात येणार आहे. देशात स्टार्टअप सुरू झाले तेव्हा ४७१ स्टार्ट अप होते आज देशात १ लाख ५७ हजार आहेत. महाराष्ट्र केवळ भारताच्या स्टार्टअप क्रांतीत  सहभागी नाही तर त्याचे नेतृत्व करत आहे. राज्यात २६००० स्टार्ट अप आहेत. आपण असे अभियान राबवित आहोत की ज्यामध्ये महिला स्टार्टअप मध्ये सर्व पदांवर असतील. देशात जास्त महिला डायरेक्टर असलेले  महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे.  स्टार्टअपमध्ये महाराष्ट्र पहिल्या सात राज्यात आहे असंही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. 

दरम्यान, उद्योजक, दूरदर्शी गुंतवणूकदार,धोरणकर्ते, इन्क्युबेटर्स, विद्यापीठे  हे उद्योग क्षेत्रातील बदलाचे प्रणेते आहेत. इज ऑफ डूईंग बिझनेसमुळे उद्योग कमी वेळात सुरू करण्यामध्ये पारदर्शकता आली आहे. गुंतवणुकीत महाराष्ट्र राज्य हे देशात पहिले आहे. भविष्यातही मानवी हस्तक्षेप न ठेवता पारदर्शक पद्धतीने उद्योजकांना राज्यात शासनाबरोबर उद्योग सुरू करण्याची संधी प्राप्त करून दिली जाणार आहे.उद्योग सुरू करताना मुंबई पुणे मध्ये पोषक वातावरण आहे. मुंबई  निधीमध्ये आघाडीवर असून पुणे तंत्रज्ञान आणि नवकल्पनांचे केंद्र आहे. आपली टियर-२ आणि टियर-३ शहरे महाराष्ट्राच्या विकासात मोठा हातभार लावत आहेत.  नाशिक, नागपूर, औरंगाबाद आणि कोल्हापूर ही शहरे स्टार्टअप्सना प्रोत्साहन देत आहेत आणि इकोसिस्टम निर्माण करतात असं फडणवीसांनी सांगितले. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस