मुंबई : केवळ अमराठी उमेदवारांनी नोकरीकरिता अर्ज करावे, अशी जाहिरात करणा-या मालाड (प.) येथील युनायटेड ग्रुप या कंपनीविरुद्ध गुरुवारी युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केल्यावर कंपनीचे संचालक राज शेट्टी यांनी आपली जाहिरात मागे घेत बिनशर्त माफी मागितली.युनायटेड ग्रुपने केवळ अमराठी उमेदवारांनी अर्ज करावे, असा स्पष्ट उल्लेख केला होता. युवासेनेने त्याची गंभीर दखल घेत कंपनीच्या कार्यालयाबाहेर निदर्शने केली. कंपनीचे संचालक राज शेट्टी यांना जाब विचारला असता आपण महाराष्ट्रात व्यवसाय करीत असून, आपल्याला महाराष्ट्राबद्दल व मराठी माणसांबद्दल नितांत आदर असल्याचे कबूल केले. आपल्या कार्यालयातील कर्मचारी मीरा शहा यांनी चुकून ही जाहिरात दिली. त्याबद्दल बिनशर्त माफी मागत असल्याचे पत्र दिले.
युनायटेड ग्रुपने मागितली माफी
By admin | Updated: January 30, 2015 05:19 IST