शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
3
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
4
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
5
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
6
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
7
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
8
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
9
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
10
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

“विरोधकांमुळे लोकशाही धोक्यात, चर्चेऐवजी अधिवेशनात गोंधळ निर्माण करतात”: रामदास आठवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2023 20:29 IST

Ramdas Athawale News: आगामी लोकसभा निवडणुकीत एनडीएला ४०० पेक्षा जास्त जागा मिळतील, असे रामदास आठवले यांनी म्हटले आहे.

Ramdas Athawale News ( Marathi News ): संसदेतून निलंबित करण्यात आलेल्या खासदारांचा आकडा आता १४६ वर गेला आहे. संसद सुरक्षा त्रुटी, खासदारांचे निलंबन यांवरून विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. गृहमंत्री आणि पंतप्रधान मोदी यांनी दोन्ही सभागृहात येऊन निवेदन, स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी विरोधकांनी लावून धरली. संसद परिसरात निदर्शने केली. मात्र, केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी विरोधकांवर पलटवार केला आहे. विरोधकांमुळेच लोकशाही धोक्यात आहे. तसेच अधिवेशनात चर्चा करण्याऐवजी विरोधक गोंधळ निर्माण करतात, असे प्रत्युत्तर रामदास आठवले यांनी दिले. 

प्रसारमाध्यमांशी बोलताना रामदास आठवले म्हणाले की, देशाचे संविधान मुळीच बदलले जाणार नाही. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संविधानावर विश्वास आहे. संसद भवनाला संविधान सदन असे नाव देण्यात आले. त्यामुळे संविधान बदलण्याच्या गोष्टीत काहीही तथ्य नाही. आगामी लोकसभा निवडणुकीत एनडीएला ४०० पेक्षा जास्त जागा मिळतील, असा दावा रामदास आठवले यांनी यावेळी बोलताना केला.

विरोधकांमुळेच लोकशाही धोक्यात

विरोधकांमुळेच लोकशाही धोक्यात आली आहे. सरकारवर टीका करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. विरोधक चर्चा करण्याऐवजी अधिवेशनात गोंधळ निर्माण करतात. वेलमध्ये उतरून खासदारांनी घोषणाबाजी करणे चुकीचे आहे, अशी टीका रामदास आठवले यांनी केली. सर्वधर्माच्या लोकांचा आदर केला पाहिजे. हे भारतीय संविधानच सांगते. त्यामुळे राम जन्मभूमीच्या कार्यक्रमाचे निमंत्रण आल्यास आपण जाऊ. राम जन्मभूमीसाठी मुस्लीम समाजानेही सहकार्य केले. त्यांनाही पाच एकर जमीन देण्यात आली, असे रामदास आठवले यांनी सांगितले. 

दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना रामदास आठवले म्हणाले की, मराठा समाजातील सर्वच लोक श्रीमंत नाही. त्यामुळे मराठा समाजातील गरिबांना आरक्षण मिळावे. मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीला आमचा पाठिंबा आहे. त्यांच्या मागणीप्रमाणे सरसकट दाखले देऊन प्रश्न सुटणार नाही. जरांगे यांनी राज्य सरकारला वेळ द्यायला हवा. सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करू नये, असे रामदास आठवले यांनी म्हटले आहे.  

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेParliamentसंसदMaratha Reservationमराठा आरक्षणlok sabhaलोकसभाElectionनिवडणूक