शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

'नाटक मत कर, चल फोन रख'; गडकरींनी कट केला होता बिग बींचा कॉल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2019 16:12 IST

नितीन गडकरींनी सांगितला मजेशीर किस्सा

नागपूर: बिग बी अमिताभ बच्चन यांचा फोन एकदा आपण कट केला होता, असा किस्सा केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी सांगितला. फार पूर्वी माझी आणि अमिताभ बच्चन यांची फारशी ओळख नव्हती. त्यावेळी अमिताभ यांनी मला फोन केला होता. मात्र कोणीतरी मुद्दाम गंमत करतंय, असा मला वाटलं आणि मी फोनच कट केला, अशा शब्दांमध्ये गडकरींनी खुमासदार किस्सा उपस्थितांना सांगितला. नागपूरातील दक्षिणामूर्ती मंडळाच्या कार्यक्रमात गडकरी बोलत होते. यावेळी त्यांनी आतापर्यंत घडलेले अनेक प्रसंग, मजेशीर किस्से आणि आठवणी नागपूरकरांना सांगितल्या. काही वर्षांपूर्वी मला एक फोन आला होता. हॅलो, मैं अमिताभ बोल रहा हूँ, असं समोरची व्यक्ती म्हणाली. त्यावेळी माझी आणि अमिताभ यांची फारशी ओळख नव्हती. त्यामुळे कोणीतरी उगाच आवाज बदलून बोलतंय, असा माझा समज झाला. त्यामुळे नाटक मत कर, चल फोन रख असं म्हणत मी फोन कट केला. त्यानंतर पुन्हा समोरच्या व्यक्तीनं मला फोन केला आणि आपण खरंच अमिताभ असल्याचं सांगितलं, असं म्हणत गडकरींनी कित्येक वर्षांपूर्वी घडलेला किस्सा नागपूरकरांसोबत शेअर केला. अनौपचारिक गप्पा मारताना गडकरी महाराष्ट्राच्या खाद्यसंस्कृतीवर भरभरुन बोलले. 'आपण महाराष्ट्रात राहतो. इथले पदार्थ आपल्यासाठी नवीन नाहीत. ते आपल्या दैनंदिन आयुष्याचा भाग आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात असताना त्यांच्याबद्दल फारसं काही वाटत नाही. मात्र राज्याबाहेर, देशाबाहेर गेल्यावर त्यांची आठवण येते,' असं गडकरी म्हणाले. यावेळी त्यांनी बिल गेट्स आणि त्यांच्या पत्नी मेलिंडा यांचा किस्सा सांगितला. एक दिवस गेट्स दाम्पत्य दिल्लीत भेटीसाठी आलं होतं. तेव्हा माझ्या पत्नीनं त्यांच्यासाठी मिसळ पाव केला होता. तो मेलिंडा यांना अतिशय आवडला होता, असं गडकरींनी सांगितलं. दिल्लीतील अनेक नेते, बॉलिवूडचे अनेक कलाकार अनेकदा केवळ मराठी पदार्थांची चव चाखण्यासाठी घरी येतात, असं गडकरी म्हणाले. 'सुषमा स्वराज यांची मुलगी बासुरी थालीपीठ अतिशय आनंदानं खाते. सुरेश प्रभूंनी एकदा माझ्याकडून नेलेल्या रश्यावर जवळपास पाच दिवस ताव मारला होता. जॅकी श्रॉफ एकदा घरी आला असताना तो केवळ वरण प्यायला होता. इतकं त्याला वरण आवडतं. सलमान खान पोहे अतिशय आवडीनं खातो. हेमा मालिनी तर अनेकदा माझ्या जेवणाची वेळ विचारुन येतात,' असे अनेक किस्से गडकरींनी यावेळी सांगितले.  

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीAmitabh Bachchanअमिताभ बच्चनJackie Shroffजॅकी श्रॉफHema Maliniहेमा मालिनीSushma Swarajसुषमा स्वराजSuresh Prabhuसुरेश प्रभूSalman Khanसलमान खान