शहरं
Join us  
Trending Stories
1
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
2
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
3
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
4
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
5
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
6
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
7
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
8
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
9
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
10
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
11
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
12
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
13
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
14
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
15
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
16
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
17
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
18
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
19
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
20
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं

Maharashtra Politics: उद्धव ठाकरे गटाला पुन्हा खिंडार पडणार? ४ आमदार संपर्कात आहेत; भाजपच्या बड्या नेत्याचा दावा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2022 10:04 IST

Maharashtra News: ठाकरे सोडून महाराष्ट्र, देश आहे ना? ते फक्त मातोश्रीपुरते उरले आहेत, असा टोला भाजपने लगावला आहे.

Maharashtra Politics: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह ४० आमदार आणि १२ खासदारांनी केलेल्या बंडखोरीमुळे शिवसेनेला मोठे खिंडार पडले. टोकाला गेलेल्या संघर्षानंतर आता शिवसेनेचे नाव आणि चिन्ह गोठवण्यात आले आहे. बाळासाहेबांची शिवसेना म्हणजेच शिंदे गटाला राज्यातून प्रचंड पाठिंबा मिळत आहे. यातच आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का बसणार असल्याचे सांगितले जात आहे. भाजपच्या केंद्रातील एक बड्या नेत्याने शिवसेनेचे ४ आमदार संपर्कात असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. 

शिवसेनेमध्ये बंड करून एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांना फोडल्यानंतर शिवसेनेच्या आमदारांची संख्या आता १५ वर आली आहे. अशा वेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील आणखी काही आमदार पक्ष सोडण्याच्या तयारीत असून, त्यातील चार आमदार आपल्या संपर्कात आहेत, असा दावा भाजपचे नेते व केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केला आहे. एका कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.  काही जण पक्षातून बाहेर पडण्याच्या तयारीत आहेत

उद्धव ठाकरे गट आता राहिलेला नाही. शिवसेना संपत चालली आहे. शिवसेना ५६ आमदारावरून आता ६-७ वर आली आहेत. त्यातीलही काही जण पक्षातून बाहेर पडण्याच्या तयारीत आहेत. यातील ४ आमदार माझ्या संपर्कात आहेत. लवकरच माहिती सांगेन, असेही राणे म्हणाले. दुसरीकडे, शिधावाटपाला काहीही उशीर झाला नाही. त्यावर फोटो लावला तर काय बिघडले, फोटोवर आक्षेप घेणे ही संकुचित वृत्ती झाली. यावरून विनाकारण राजकारण सुरू आहे. आता त्यांच्या हातात काहीही राहिले नाही, त्यामुळे घरबसल्या षड्यंत्र करत राहायचे असे एकच काम आहे. ठाकरे सोडून महाराष्ट्र, देश आहे ना? ते फक्त मातोश्रीपुरते उरले आहेत. माझ्यासारखे जे होते ते साहेबाच्या काळात होते. आता कुणी नाही, असा टोला राणे यांनी लगावला.

दरम्यान, आदित्य ठाकरे यांनी राजकारणाचा स्तर घसरला असल्याची टीका केली होती, यावर बोलताना, या म्हणण्यात तथ्य नाही. जे बोलतात त्यांचाच स्तर खालावला आहे. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. त्यामुळे वैचारिक स्तर घसरू नये, असे राणे यांनी सांगितले. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Narayan Raneनारायण राणेUddhav Thackerayउद्धव ठाकरे