शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मध्यरात्री गावातील शौचालय अचानक गायब केले; सकाळी उठताच ग्रामस्थ हैराण झाले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2022 21:10 IST

अज्ञात व्यक्तीविरोधात राधानगरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 

राशिवडे :  येथील मारुती मंदिराजवळ जवळ सरकारी जागेत असणारे स्वच्छतागृह (मुतारी) अज्ञात व्यक्तीने जमीनदोस्त करून साहित्याची परस्पर विल्हेवाट लावल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. स्वच्छतागृह पाडल्यामुळे ग्रामपंचायतीचे सुमारे तीन लाखाचे नुकसान झाले. याबाबत ग्रामपंचायतीच्या वतीने अज्ञात व्यक्तीविरोधात राधानगरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 

याबाबत मिळालेली माहिती अशी, मारुती मंदीराजवळील शांतिनाथ लोखंडे व महादेव मगदूम यांच्या घराशेजारी ग्रामपंचायतीच्या मालकीच्या जागेत अनेक वर्षापासून स्वच्छतागृह आहे.  काल रात्री अज्ञातांनी हे स्वच्छतागृह पाडून साहित्याची परस्पर विल्हेवाट लावली. ही घटना आज सकाळी उघडकीस आली. सरपंच कृष्णात पोवार, उपसरपंच रंगराव चौगले, ग्राम विकास अधिकारी विराज गणबावले यांच्यासह ग्रामपंचायत सदस्यांनी घटनास्थळावर जाऊन पंचनामा केला. या पंचनाम्यात सुमारे तीन लाखाचे शासकीय मालमत्तेचे नुकसान झाल्याचे प्राथमिक अंदाज आहे. अज्ञातांनी हे साहित्य परस्पर गावातील माळावर टाकल्याचे पंचनामा करताना निदर्शनास आले.याबाबत अज्ञात व्यक्तीविरोधात ग्रामपंचायतीच्या वतीने राधानगरी पोलीस ठाण्यात तक्रार नोंद करण्यात आली आहे.

राशिवडे येथे दोन स्वच्छतागृहे आहेत. मोठी बाजारपेठ असल्याने आणखी दोन ते तीन स्वच्छता गृहांची आवश्यकता आहे. स्वच्छता गृहे नसल्यामुळे बाहेरून येणारे व्यापारी, प्रवाशांची कुचंबणा होत आहे. याबाबत  ग्रामपंचायतीकडे पाठपुरावा सुरू आहे. अशातच  यातील एक स्वच्छता गृह अज्ञातांनी पाडल्याने परिसरातील ग्रामस्थांच्या कडून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. अज्ञातांनी हे स्वच्छतागृह पाडताना पूर्णपणे काळजी घेतल्याचे दिसून येते. चौकातील स्वच्छता गृह जमीनदोस्त करताना मध्यरात्रीची वेळ निवडण्यात आली. मात्र या मार्गावर असणाऱ्या दोन सीसीटीव्ही त्यांचे कृत्य कैद झाले असण्याची शक्यता आहे.

मुतारी चोरीला गेल्याची सोशल मिडियावर चर्चा

आज सकाळपासून या घटनेची सोशल मिडियावर खुमासदार चर्चा रंगली आहे. कोणी मुतारी चोरीला गेल्याची चर्चा करत आहे तर कोणी गटर बांधण्यासाठी माळावर नेवून ठेवली आहे अशी चर्चा करताना दिसत आहे. मराठी सिनेमात विहीर चोरीला गेल्याचे पाहिले आज प्रत्यक्ष अनुभवल्याचे सोशल मिडियावर लिहिले जात आहे.