शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

अर्धा पगार द्या, आम्ही काम करतो; शासकीय कर्मचारी संपाविरोधात बेरोजगारांचा मोर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2023 12:31 IST

राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी बेमुदत संपाचा पवित्र घेतलाय.

कोल्हापूर - राज्यात गेल्या काही दिवसांपासून सरकारी कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शन सुरू करावी या मागणीसाठी संप पुकारला आहे. अनेक ठिकाणी कर्मचारी कार्यालयात नसल्याने लोकांचे हाल सुरू आहेत. तर सरकारी डॉक्टरही संपावर असल्याने आरोग्य यंत्रणा कोलमडली आहे. राज्यभरात सुरु असलेल्या या संपाविरोधात आता लोकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. त्यात कोल्हापूरात सरकारी कर्मचारी संपाविरोधात बेरोजगार तरुण आणि शेतकऱ्यांनी मोर्चा काढला आहे.

कोल्हापूरच्या दसरा चौकातून बेरोजगार तरूणांचा मोर्चा निघाला. यातील आंदोलक म्हणाले की, मूळात राज्यात सुरू असणारा मोर्चा आमदार खासदारांना पेन्शन मिळते म्हणून आम्हाला पण द्या यासाठी आहे. या कुणालाही पेन्शन देऊ नका. ज्यांना लाख-दीड लाख रुपये पगार आहे ते भविष्यासाठी आर्थिक नियोजन करू शकत नसतील तर त्यांचा उपयोग काय? शेतकऱ्यांना पाहिजे ते उत्पन्न मिळत नाही. १२ तास काम करून त्याला दाम मिळत नाही. कर्मचारी ८ तास ड्युटीतील किती तास काम करतात? जुनी पेन्शन बंद करा ती लागू करू नका. आम्ही अर्ध्या पगारावर कामाला तयार आहे अशा भावना याठिकाणी आंदोलनात आलेल्या तरुणांनी व्यक्त केल्या. 

तर MPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनीही या संपाला विरोध केला. नवीन पिढी अधिकारी होण्यासाठी इच्छुक आहे. त्यांना कामावर घ्या. आम्हाला पेन्शन नको. पगार वेळेवर द्या. रखडलेल्या नियुक्त्या लवकर भरा. कंत्राट पद्धतीने अनेक पदे भरली जातायेत. जे काम लाख लाख पगार घेऊन प्राध्यापक करतात तेच काम कंत्राटावर २० हजारांवर केले जाते. सरकारने संपकऱ्यांच्या मागण्या मान्य करू नये असा सूर स्पर्धा परीक्षा देणाऱ्या तरुणांमधून निघत आहे. 

संप मागे घेण्याचं मुख्यमंत्र्यांचे आवाहनराज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी बेमुदत संपाचा पवित्र घेतलाय. आज या संपाचा चौथा दिवस असून राज्यातील सर्वच विभागात कर्मचाऱ्यांनी काम बंद करुन सरकारचे लक्ष्य वेधले. सरकारी कर्मचारी संपावर विधानसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निवेदन दिले.  राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना आणि जुन्या निवृत्तीवेतन योजनेचा अभ्यास करण्यासाठी त्रिसदस्यीय समिती स्थापना केली जाईल. कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. मंगळवारी विधानसभेत त्यांनी यासंदर्भात सरकारची भूमिका मांडली. तरीही संपकरी कर्मचारी न ऐकण्याच्या मनस्थितीत आहेत. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूर