शहरं
Join us  
Trending Stories
1
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
2
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
3
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
4
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
5
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
7
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
8
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
9
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
10
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
11
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
12
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
13
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
14
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
15
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
16
नोकर भरतीचा गोंधळ आता तरी थांबणार का?; आता केरळच्या धर्तीवर होणार भरती प्रक्रिया
17
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
18
शारदीय नवरात्र म्हणजे निर्मितीशक्तीचा उत्सव; पूजा नऊ दिवसच का? महत्त्व जाणून घ्या
19
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
20
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...

नाशिकच्या शस्त्रसाठ्याचे ‘अंडरवर्ल्ड कनेक्शन’, सतर्क राहण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2017 06:32 IST

उत्तर प्रदेशातून चोरी करण्यात आलेल्या शस्त्रसाठा प्रकरणातील मुंबईतील तीन आरोपींपैकी बद्रीनुजमान अकबर बादशहा उर्फ सुमित उर्फ सुका (२७) याच्याविरुद्ध राज्यभरात ७०हून अधिक गुन्हे दाखल आहेत.

- मनीषा म्हात्रे मुंबई : उत्तर प्रदेशातून चोरी करण्यात आलेल्या शस्त्रसाठा प्रकरणातील मुंबईतील तीन आरोपींपैकी बद्रीनुजमान अकबर बादशहा उर्फ सुमित उर्फ सुका (२७) याच्याविरुद्ध राज्यभरात ७०हून अधिक गुन्हे दाखल आहेत. तसेच तो अंडरवर्ल्डशी कनेक्ट असल्याने या प्रकरणाचे अंडरवर्ल्ड कनेक्शनही समोर येत आहे. तसेच गुन्ह्यांत वापरण्यात आलेली गाडी चोरीची असून ती सरकारी असल्याच्या धक्कादायक माहितीने तपास यंत्रणांही चक्रावल्या आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबईत अलर्ट जारी करण्यात आला आहे.उत्तर प्रदेशातील बांदा जिल्ह्यातील गोदामातून शिवडीत राहणारा बद्रीनुजमान अकबर बादशहा उर्फ सुमित उर्फ सुका (२७), सलमान अमानुल्ला खान (१९) आणि वडाळ्याचा नागेश राजेंद्र बनसोडेने (२३) लाखोंच्या शस्त्रसाठ्याची चोरी करून मुंबईकडे धाव घेतली.या शस्त्रसाठ्यामध्ये १७ रिव्हॉल्व्हरसह दोन परदेशी बनावटीच्या गन्ससह १२ रायफली आणि ४ हजार १४२ जिवंत काडतुसांचा समावेश आहे.शस्त्रसाठ्यासाठी वापरण्यात आलेल्या आलेल्या बोलेरो गाडीवरचा क्रमांक एमएच ०१ एसए ७४६० हा मुंबईतल्याच सरकारी गाडीचा असल्याचे एका वरिष्ठ अधिकाºयाने सांगितले.शिवाय या गाडीमध्ये आणखी एक नंबर प्लेट ( एमएच १५ एव्हाय ५६१९ ) मिळाली आहे. मात्र या दोन्ही गाडी क्रमांकांबाबत कुठलीच माहिती वाहतूक विभागाकडे उपलब्ध नाही. ते जुने क्रमांक असून ही गाडीही चोरीची असल्याचे समजते.सतर्क राहण्याचे आदेशशस्त्रसाठा जप्त केल्यानंतर मुंबई पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी सर्व वरिष्ठ अधिकाºयांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. तसेच २५ डिसेंबर तसेच ३१ डिसेंबर रोजी त्यांची सुट्टीही रद्द करण्यात आली आहे. त्यानुसार सर्वच तपास यंत्रणा कामाला लागल्या आहेत.

टॅग्स :Crimeगुन्हाPoliceपोलिस