शहरं
Join us  
Trending Stories
1
जलप्रलय! पूर आणि भूस्खलनामुळे ३६ जणांचा मृत्यू; लाखो लोक झाले बेघर, ६ जवान बेपत्ता
2
भूकंपामुळे पाकिस्तानी तुरुंगाच्या भिंतींना पडले तडे, संधी साधून कैदी पळून गेले!
3
५ गोष्टी कायम ध्यानात ठेवा, राहु-केतु महादशेत अपार लाभ मिळवा; अशुभ प्रभाव टाळण्यास काय कराल?
4
Howard Lutnick : "मी भारताचा खूप मोठा फॅन"; भारत-अमेरिका व्यापार कराराबद्दल हॉवर्ड लॅटनिक यांनी दिली गुड न्यूज
5
आजचा अग्रलेख: काम, कळा आणि ‘पिशवी’; महिलांच्या शारीरिक आणि भावनिक वेदनांचे वास्तव
6
एकाच दिवशी बुध-मंगळाचे गोचर: ८ राशींचे कल्याण, सुखाची भरभराट; समृद्धी वृद्धी, मंगलमय काळ!
7
आम्ही कोणाच्याही दारात भीक मागायला आलो नाहीत; लंडनमधील कार्यक्रमादरम्यान भाजप खासदाराचा इशारा
8
पतीने जबरदस्तीने दिल्या गर्भपाताच्या गोळ्या, झाला खूप रक्तस्त्राव; २३ वर्षीय महिलेच्या मृत्यूने खळबळ
9
Apple अडून राहिली, पण मस्क झुकले; Tesla नं भारताबाबत बदलला आपला ‘प्लान’
10
कॅन्सर संपूर्ण शरीरात पसरला, केमोथेरेपीचाही फायदा झाला नाही, आता...; मृत्यूनंतर अभिनेत्याच्या शेवटच्या पोस्टने चाहते हळहळले
11
सोने खरेदीदारांसाठी 'सुवर्ण' संधी! दर १२,००० रुपयांनी स्वस्त होणार? 'या' ४ कारणांमुळे पडणार फरक
12
Stock Market Today: ११९ अंकांच्या तेजीनंतर ४०० अंकांनी घसरला Sensex, बँक निफ्टीमध्येही विक्रीचा सपाटा
13
Corona Virus : कोरोनामुळे भीषण परिस्थिती?; जपानी बाबा वेंगा यांची 'भयावह' भविष्यवाणी, सांगितली 'ती' वेळ
14
भारताची राष्ट्रभाषा कोणती? जगासमोर कनिमोळींनी दिलेल्या उत्तराने देशाची मान उंचावली
15
IPL 2025: कोण संपवणार विजेतेपदाचा १८ वर्षांचा दुष्काळ? आज अंतिम लढतीचा रंगणार थरार
16
कमालीची आहे ही स्कीम, महिन्याला ₹४५०० गुंतवा; ६० व्या वर्षी मिळतील ₹१.५६ कोटी, ₹५१,८४८ चं मंथली पेन्शन
17
स्वातंत्र्यवीर सावरकर यांची बदनामी; राहुल गांधीचा जामीन रद्द करण्याची याचिका फेटाळली
18
कधीही निराश झालो नाही, ब्रेक घेत कसून अभ्यास केला... ‘जेईई’च्या दोन टॉपरचे ‘गुपित’
19
हाहाकार! मणिपूरमध्ये पावसाचं थैमान; १९,८०० लोकांना पुराचा फटका, ३,३६५ घरांचं नुकसान
20
एकीकडे लष्करी छावणीवर कोसळला डोंगर, दुसरीकडे चिखलातून वाट तुडवत जवानांचे मदतकार्य

सैन्य भरतीच्या नावाखाली ३५ लाखांचा गंडा

By admin | Updated: October 14, 2015 04:14 IST

सैन्यदलात नोकरी लावून देण्याच्या आमिषाने सात जणांना प्रत्येकी पाच लाखांप्रमाणे ३५ लाखांचा गंडा घालणाऱ्या तीन आरोपींविरुद्ध सिडको एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

औरंगाबाद : सैन्यदलात नोकरी लावून देण्याच्या आमिषाने सात जणांना प्रत्येकी पाच लाखांप्रमाणे ३५ लाखांचा गंडा घालणाऱ्या तीन आरोपींविरुद्ध सिडको एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींपैकी मन्सूर अली हा सैन्यदलात नोकरीस आहे. या पार्श्वभूमीवर सैन्यदलात भरतीचे आमिष दाखवून गंडा घालणारे रॅकेट कार्यरत असल्याचा पोलिसांचा संशय आहे.मन्सूर अली (रा. पुणे) याच्यासह शेख अय्युब शेख महेबूब (रा. डोंबरी, ता. जि. बीड) आणि मालन महेबूब शेख (रा. बीड) यांचा आरोपींमध्ये समावेश आहे. सैन्य भरतीच्या नावाखाली फसवणूक झालेले सर्व युवक अंतरवली (ता. पैठण) येथील रहिवासी आहेत. योगेश्वर हंडे, सोपान हंडे, योगेश ताठे, राजू दवंगे, नकुल निवारे, महेस भोगे आणि योगेश शिरसाठ यांचा फसवणूक झालेल्यांत समावेश आहे.असे फुटले बिंगशेख अय्युब व मन्सूर अली यांनी सात युवकांकडून प्रत्येकी पाच लाख रुपये याप्रमाणे ३५ लाख रुपये घेतले. या युवकांना नगर, औरंगाबाद, पुणे आदी ठिकाणचे नियुक्ती आदेश दिले. अंतरवली गावातील काही जण सैन्य दलात नोकरीस आहेत. कसलीही परीक्षा, शारीरिक चाचणी न घेता, आपली सैन्यदलात नियुक्ती झाल्याची माहिती या युवकांनी त्यांना दिली. नियुक्ती आदेशही त्यांना दाखविले, तेव्हा हे आदेश बनावट असल्याचे त्यांनी सांगितले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पैसे परत करण्याची मागणी युवकांनी केली असता, शेख अय्युब व मन्सूर अली यांनी त्यांना धमक्या देण्यास सुरुवात केली. या युवकांनी अखेर सिडको एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेऊन फसवणूक झाल्याची तक्रार दिली.