शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

राज्यात कुष्ठरुग्ण शोध मोहिमेंतर्गत आढळले नवे सहा हजार १०० रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2020 01:19 IST

स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियानांतर्गत या वर्षी ‘कुष्ठरोगाविरुद्ध अखेरचे युद्ध’ हे घोषवाक्य असून त्यानुसार कुष्ठरोग निर्मूलनासाठी राज्यात प्रयत्न केले जात आहेत.

मुंबई : राज्यात सध्या १३ हजार ८१५ कुष्ठरुग्ण उपचाराखाली आहेत. दरवर्षी १६ सप्टेंबर रोजी दोन आठवड्यांची कुष्ठरुग्ण शोध मोहीम सुरू केली जाते. गेल्या वर्षी सुमारे साडेसात कोटी नागरिकांची या मोहिमेंतर्गत तपासणी करण्यात आली. त्यामध्ये नव्याने ६ हजार १०० रुग्ण आढळले. यामध्ये प्रामुख्याने विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या जिल्ह्यांतील रुग्णांचा तर पालघर, ठाणे, उस्मानाबाद, लातूर येथूनही रुग्ण आढळून आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी बुधवारी दिली.स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियानांतर्गत या वर्षी ‘कुष्ठरोगाविरुद्ध अखेरचे युद्ध’ हे घोषवाक्य असून त्यानुसार कुष्ठरोग निर्मूलनासाठी राज्यात प्रयत्न केले जात आहेत. राज्यभर कुष्ठरोग निवारण दिनानिमित्त १३ फेब्रुवारीपर्यंत कुष्ठरोग निवारण पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त केंद्र सरकारमार्फत कुष्ठरोग निर्मूलन मोहीम आॅक्टोबर २०२० पर्यंत राबविण्यात येत आहे. दरवर्षी ३० जानेवारीला ‘कुष्ठरोग निवारण दिन’ साजरा केला जातो. त्यानिमित्त जाणीवजागृतीसोबतच कुष्ठरोगाबाबत शास्त्रीय माहिती समाजातील विविध घटकांना देण्यात येत आहे.स्पर्श अभियानासाठी समन्वय समिती- पंधरवड्यानिमित्त ग्रामसभा घेण्यात येत असून त्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या आवाहनाचे वाचन केले जात आहे. सरपंच अथवा गावातील मान्यवर या वेळी कुष्ठरोगाबाबत मार्गदर्शन करतील. गावातील ज्येष्ठ व्यक्ती महात्मा गांधीजींची वेषभूषा करून त्यामार्फत कुष्ठरोग निर्मूलनविषयक संदेश देतील. कुष्ठरोगाबाबत शंकानिरसनही या वेळी केले जाईल.- गावात कुष्ठरोगी असल्यास त्यांच्यामार्फत ग्रामसभेत आभार प्रदर्शन करण्यात येईल. जनजागृती कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांची प्रभात फेरी, पथनाट्य, निबंध, चित्रकला स्पर्धा आदींच्या माध्यमातून कुष्ठरोग निर्मूलनासाठी संदेश दिला जाईल. स्पर्श अभियान राबविण्यासाठी राज्य, जिल्हा आणि तालुका समन्वय समिती करण्यात आल्या आहेत, असेही आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

टॅग्स :hospitalहॉस्पिटल