शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील केंद्रावर आधारकार्डसाठी विनापावती वसुली

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2017 21:50 IST

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या तळमजल्यावर आधारकार्ड केंद्र सुरू करण्यात आले असून नवीन आधार कार्ड काढणे किंवा जुन्याकार्डमध्ये दुरुस्ती करण्याचे काम त्यावर सुरू आहे.

ठाणे, दि. 7   :  येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या तळमजल्यावर आधारकार्ड केंद्र सुरू करण्यात आले असून नवीन आधार कार्ड काढणे किंवा जुन्याकार्डमध्ये दुरुस्ती करण्याचे काम त्यावर सुरू आहे. मात्र त्यासाठी नागरिकांकडून पैसे घेतले जात असून, त्याची पावती मात्र दिली जात नाही, याची तक्रार विटावा येथील नागरिकाने केल्यावर त्याचे सुमारे 30 रुपये मात्र परत केल्याचे आढळले आहे. आधारकार्ड काढणे, जुन्या कार्डमधील चुकीच्या नावात, पत्त्यात दुरुस्ती करणे आदी कामांसाठी नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील तळमजल्यावर संबंधित कंपनीला आधारकार्ड केंद्र सुरू ठेवण्याची परवानगी दिली आहे. या केंद्रावर येथील एनआयसी विभागाचे मॉनिटरिंग असल्याचे चौकशीअंती कळाले. नागरिकांच्या सोयीसाठी या केंद्रावरून विनामूल्य आधारकार्डसंबंधी सेवा होणे अपेक्षित आहे. परंतु कामानुसार पैसे घेतले जात असून त्याची पावती दिली जात नाही, याशिवाय केलेल्या कार्डच्या दुरुस्तीचे प्रिंटही दिली जात नसल्याची तक्रार विटावा येथील नागरिक नामदेव वाघ यांनी तहसीलदार समीर घारे यांना केली. या तोंडी तक्रारीस अनुसरून पावती देणे अपेक्षित असल्याचे घारे यांनी सांगितले. त्यानंतर त्यांनी एनआयसीमधील आयटीच्या एका कर्मचा-याला वाघ यांना भेटायला सांगितले. संबंधित कर्मचा-याची वाघ यांनी आधार कार्ड केंद्रात बराच वेळ प्रतीक्षा केली. त्यानंतर घेतलेले 30 रुपये परत केल्याचे वाघ यांनी लोकमतच्या निदर्शनात आणून दिले. परिसरात जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा सत्र न्यायालय, शहर पोलीस आयुक्तालय, ग्रामीण पोलीस मुख्यालय एवढेच नव्हे तर लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालय अशी मोठमोठी  सरकारी कार्यालये असतानाही आधार कार्डसाठी नागरिकांकडून मनमानी पैसे घेण्याची भीती नसल्याची चर्चा यावेळी ऐकायला मिळाली. यास वेळीच आळा न घातल्यास काही सामाजिक संघटना त्या विरोधात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.