शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

Ulhasnagar: आता उल्हासनगरात गुन्हेगारांवर 'अशी' ठेवली जाणार नजर!

By सदानंद नाईक | Updated: May 20, 2025 18:22 IST

Ulhasnagar Police: शहरातील प्रत्येक घडामोडीवर वॉच राहणार असून नशेखोर, भुरटे चोर आदी गुन्हेगारांचे यामुळे धाबे दणाणले आहे.

सदानंद नाईक, उल्हासनगर: शहरातील घडामोडीवर वॉच ठेवण्यासाठी पोलीस विभागाकडून तब्बल ९८५ सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे काम फास्ट ट्रकवर सुरु आहे. सीसीटिव्ही कॅमेऱ्यामुळे शहरातील प्रत्येक घडामोडीवर वॉच राहणार असून नशेखोर, भुरटे चोर आदी गुन्हेगारांचे यामुळे धाबे दणाणले आहे.

 शहरातील गुन्हेगारी घटनेसह अन्य घडामोडीवर वॉच ठेवण्यासाठी वर्दळीचे ठिकाण, चौक, मुख्य रस्ते, बाजारपेठा, शाळा, महाविद्यालय, रुग्णालये आदी ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची मागणी यापूर्वी होत होती. गेल्या वर्षी शहरांत सीसीटिव्ही कॅमेरे लावण्यासाठी पोलीस विभागाने, महापालिकेला परवानगी मागितली असून महापालिकेचे तत्कालीन अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी तात्काळ परवानगी दिली होती. कॅमेऱ्यासाठी अंडरग्राऊंड केबल वायरी टाकण्याकरिता व पोल बसवण्यासाठी रस्त्याचे खोदकाम करण्यात येत आहे. ठाणे पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या आदेशान्वये बिनतारी संदेश विभागाचे (वायरलेस) सहायक पोलिस आयुक्त प्रदीप कन्नलू यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद बिरारे यांच्या देखरेखीखाली ३९८ पोलवर ५९८ सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे काम सुरू करण्यात आले. 

उल्हासनगर, मध्यवर्ती, विठ्ठलवाडी व हिललाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीत हे कॅमेरे लागणार आहेत. सीसीटीव्ही कॅमेरे हे संवेदनशील भाग, गुन्हेगारी, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर आणि विविध वादग्रस्त घडामोडींवर २४ तास वॉच ठेवणार आहेत. कॅमेऱ्याचे पोल लावण्यासाठी व केबल टाकण्यासाठी रस्ते खोदण्यात आल्याने, सुरवातीला नागरिकांनी नाराजी व्यक्त केली होती. मात्र पोलला कॅमेरे लागताच नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

सीसीटीव्ही कॅमेरांचे दोन कंट्रोल रूम शहरांत लावण्यात आलेल्या सीसीटिव्ही कॅमेऱ्याऱ्यांचे दोन कंट्रोल रूम सज्ज करण्यात येत आहे. महापालिका मुख्यालय व पोलीस नियंत्रण कक्ष याठिकाणी कंट्रोल रूम राहणार असून २४ तास पोलिस ऍक्टिव्ह राहणार आहे. शहरांत घडणारी कोणतीही घटना कॅमेऱ्यात टिपली जाणार असून पोलिस यंत्रणा अॅक्शन मोडवर येणार आहे. असे मत पोलिस उपायुक्त सचिन गोरे यांनी व्यक्त केले.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरMaharashtraमहाराष्ट्रPoliceपोलिस