शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नीला ब्लॅकमेल करणाऱ्या उल्हासनगरमधील तरुणीला अटक

By सदानंद नाईक | Updated: March 16, 2023 16:36 IST

Ulhasnagar News: विविध गुन्हात फरार असलेला माजी नगरसेवक अनिल जयसिंघानी यांच्यावरील गुन्हे व आरोप मागे घेण्यासाठी जयसिंघानी यांची मुलगी अनिष्का हिबे थेट उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना ब्लॅकमेलिंग केल्याचा प्रकार उघड झाला.

- सदानंद नाईक उल्हासनगर : विविध गुन्हात फरार असलेला माजी नगरसेवक अनिल जयसिंघानी यांच्यावरील गुन्हे व आरोप मागे घेण्यासाठी जयसिंघानी यांची मुलगी अनिष्का हिबे थेट उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना ब्लॅकमेलिंग केल्याचा प्रकार उघड झाला. याप्रकरणी मुंबई मधील मलबारहिल येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून गुरवारी दुपारी पोलिसांनी तीला अटक केली. यापूर्वीही राष्ट्रपती, सर्वाच्च न्यायालयाचे न्यायाधिश आदींना गुजरात मधून समन्स पाठविणाराही उल्हासनगरचा असल्याचे उघड झाले होते.

उल्हासनगर येथील माजी नागरसेवक व क्रिकेट बुक्की अनिल जयसिंगानी हे विविध गुन्हे प्रकरणी फरार आहेत. त्यांच्या अनिष्का नावाच्या मुलीने राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना ब्लॅकमेलिंग करून १ कोटींची ऑफर देत वडीलावरील गुन्हे मागे घेण्याचा दबाव टाकला. आपल्यासह पती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अडकविण्याचा प्रकार असल्याचे लक्षात आल्यावर, अमृता फडणवीस यांच्या तक्रारीवरून मुंबई येथील मलबार हिल येथील पोलीस ठाण्यात अनिष्का जयसिंगांनी हिच्या विरोधात गुन्हा दाखल झाला. 

गुरवारी सकाळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतची माहिती विधानसभेत दिल्यावर एकच खळबळ उडाली. दुपारी मलबार हिल पोलिसांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने जय सिंगांनी यांच्या उल्हासनगर येथील घराची झडती घेऊन अनिष्काला अटक केली. याप्रकारने खळबळ उडाली असून प्रकारात स्थानिक नेत्यांचा सहभाग आहे का? याबाबत चौकशी करण्याचे संकेत पोलिसांनी दिले. अनिल जयसिंगांनी यांच्यावर क्रिकेट बुक्कीसह विविध पोलीस ठाण्यात विविध गुन्हे दाखल आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून ते फरार आहेत. अनिल जयसिंगांनी यांच्यावरील गुन्हे कमी करण्यासाठी मुलगी अनिष्काने हे कृत केल्याचे बोलले जात आहे. यामध्ये स्थानिक राजकीय नेत्यांच्या सहभाग आहे का? याबाबत चौकशीचे संकेत पोलिसांनी दिले. 

  राष्ट्रपती, सर्वाच्च न्यायाधीशांना समन्स गुजरात न्यायालयातून थेट राष्ट्रपती, सर्वाच्च न्यायालयाचे न्यायाधीश आदींना समन्स काढल्याचा प्रकार काही वर्षांपूर्वी घडला होता. समन्स काढणारा इसम उल्हासनगर मधील बडा इसम असल्याचे उघड झाल्यावर एकच खळबळ उडून गुन्हा दाखल झाला होता. याप्रकाराने पुन्हा खळबळ उडाली आहे. अमृता फडणवीस यांना अनिष्का नावाच्या महिलेनं अप्रत्यक्षरित्या धमकावून, कट रचून 1 कोटींची लाच ऑफर करण्याचा प्रयत्न केला होता.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAmruta Fadnavisअमृता फडणवीसulhasnagarउल्हासनगरCrime Newsगुन्हेगारी